पारा असा चढला
पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते
माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ?
नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली
उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला
काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली
कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला
सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला