कढी गोळे

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Jun 2019 - 11:29 pm

साधारण पावणे सात वाजले कि तो तयारीस लागायचा

केसाचा झुपकेदार कोंबडा -जीन टी शर्ट -परफ्युम लावून आपली क्रुझर काढायचा

मिनिटाच्या आत एक सिग्नल लागायचा तिथे तो थांबायचा

त्याच वेळी ती पण होंडा वर यायची

सुंदर होती दिसायला जीन टॉप मानेपर्यंत रुळणारे केस गोड्ड चेहरा

सिग्नल सुटेपर्यंत ती त्याच्या कडे बघत असे

त्याला खूप ऑकवर्ड व्हायचे

असे वारंवार घडत असे

त्याला वाटले ही आपल्या पाळतीवर तर नाही ना>?

आणि नेमकी हि त्याच वेळी कशी येते ?

-

त्याने वेळ बदलायची ठरवले

पाच वाजता तो निघाला -तेव्हा पण ती हजर

त्याने अनेक वेळा वेळ ठिकाणे बदलली पण ती पाठलाग करतच होती

-

कोण असेल ती ? मीच का? त्याला प्रश्न पडले

एकदा त्याने तुच्या कडे बघत मनातल्या मनात विचारले तू कोण? मीच का?

तिने त्याच्या कडे बघितले पण नाही

-

रात्री दोन वाजता तो खडबडून जागा झाला

चेहरा घामानं डबडबला होता

ती स्वप्नात आली होती खूप सुंदर दिसत होती

पण चेहे-यावर उदास भाव होते

ती म्हणाली मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते तुला हे सांगायचं होत पण

माझा अपघात झाला व मी जागेवर गतप्राण झाले

मी आता यादुनियेत नाही

मी तुझ्या जगात येऊ शकत नाही

पण तू येऊ शकतो

येणार ना?

असे म्हणताच तो जागा झाला

-

३-४ रात्री त्याला हेच स्वप्न पडत होते

-

थ्यन्क्यु तू माझ्या विनंतीला मान देत माझ्या दुनियेत आला

असे म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली आय लव्ह यु सो मच

आपणास आता कुणीच विलग करू शकणार नाही

-

साने काकू स्वयंपाक गृहात स्वयंपाक करत होत्या

निखिल ला कढी गोळे आवडतात म्हणून त्या कधी कारणात होत्या कढी

फ्रीज मधून त्यांनी दह्याचा सट काढला

-

काकू रमेश ओरडत आत आला

काकू निखिल ला अपघात झाला

आम्ही त्याला हॉस्पिटल मध्ये नेट असताना तो देवाघरी गेला

हे ऐकतात साने काकूंची शुद्ध हरपली व त्या जमिनीवर कोसळल्या

नाट्य

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

22 Jun 2019 - 11:44 pm | श्वेता२४

कथेच्या नावाचा आणि कथेचा काहीतरी संबंध आहे का?

ज्योति अळवणी's picture

22 Jun 2019 - 11:50 pm | ज्योति अळवणी

Exactly. कथा चांगली आहे. पण कढी गोळे का?

जॉनविक्क's picture

23 Jun 2019 - 12:10 am | जॉनविक्क

प्रेमाची व्याकुळता दाखवणारे असे लिखाण बरेच दिवस झाले वाचनात आले न्हवते. विशेषतः कथेच्या शेवटी वाचकाने हसावे(मिलन झाले म्हणून) की रडावे (मृत्यू ची चाहूल बघून) यावर लेखकाने निर्माण केलेली कठोर उत्सुकता हा या कथेचा मास्टरस्ट्रोक वाटतो.

कहा मिलेगा इतना कंटेंट ?

सस्नेह's picture

23 Jun 2019 - 3:01 pm | सस्नेह

मला वाटलं, पाकृ :(

नाखु's picture

23 Jun 2019 - 5:53 pm | नाखु

मच्छर असत नाहीत तसेच शीर्षक वाचून पाककृती शोधणार त्याला अकु शिक्षा देणार.

अखिल मिपा अवकाळी पौस आणि त्यात लिखाणाची हौस संघाच्या दिव्याखाली अंधारच अंधार या पाक्षिकातून साभार

वामन देशमुख's picture

24 Jun 2019 - 11:30 am | वामन देशमुख

नुसता कचरा !

वामन देशमुख's picture

24 Jun 2019 - 11:31 am | वामन देशमुख

नुसता कचरा !

Rajesh188's picture

25 Jun 2019 - 1:41 pm | Rajesh188

ह्या कथेची जी मध्य वरती कल्पना आहे .
तीच असलेल्या खूप कथा अगोदर वाचण्यात आल्या आहेत.
ह्या कथेत नावीन्य नाही

विटेकर's picture

26 Jun 2019 - 2:51 pm | विटेकर

प्रतिभेचा इलोकविलक्शन्क्श्ण अविश्कार गेल्या १० हजार वर्शात मझ्या पाहाण्यात नाही !

आखिर कहना क्या चाहते हो भाई?

धर्मराजमुटके's picture

26 Jun 2019 - 6:49 pm | धर्मराजमुटके

कथा वाचून पायातच गोले आले !

खिलजि's picture

29 Jun 2019 - 3:53 pm | खिलजि

हि तुमची शेवटपर्यंत लाटकर ठेवण्याची ढब आहे ना , तिच्यावर आपण जाम फिदा आहे .. कढीगोळे आणि कथेचा शटमारी संबंध नाही .. हक है भाय .. आप मेरे आका हो .. प्यारे प्यारे अकुकाका हो ..