पुणे मिसळ हॉटेल

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Jun 2019 - 2:59 pm

स्थळ//पुणे मिसळ हॉटेल..बाहेर पावसाची बुरबुर..
त्याने मस्त मिसळ चापली..चहा घेतला..बिलाचा कागद व बाजुला ठेवलेली छत्री घेवुन तो उठला
व समोरच्या इसमाने त्याला हटकले..
माफ करा आपण माधवराव जोशी का?
नाहि..मी हेमंत देशपांडे..
ओह्ह..मी माधवराव जोशी जी छत्री आपण घेतली ति माझी असुन त्यावर नाव पण लिहिले आहे..
त्यावर खजील होऊन देशपांडेे म्हणाले..ओह्ह माफ करा..तरी प्रष्ण उरतो माझी छ्रत्री कुठे गेली असावी?...
तुम्हि असे करा मनोहर लेले ना विचारा बहुतेक त्यांच्या कडे असावी..मागच्या पावसाळ्यात त्याला दिली होति....
पण आपणास हे सारे कसे माहित??? हेमंत
माधवराव म्हणाले..त्याचे असे आहे..मागल्या वर्षी असाच रविवार होता एक ईसम मिसळ खावुन बिल देण्यास उठला व बाजुची छत्री उचलली..
मी त्याला हटकले व म्हणालो...माफ करा आपण माधवराव जोशी का?
त्यावर तो म्हणाला नाहि..मी मनोहर लेले

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

4 Jun 2019 - 7:16 pm | ज्योति अळवणी

बरं! पुण्यात पावसाळा जवळ आला असं समजावं का?

पुणे पावसाळ्याजवळ जाणार नाही ,पावसाळा पुण्याजवळ येत असतो

जालिम लोशन's picture

4 Jun 2019 - 11:22 pm | जालिम लोशन

दोन बहिर्‍यांच्या संवादासारखे वाटते आहे. काय बाजाराला निघालाय? ऊत्तर: नाही बाजारात चालयोय. प्रत्युत्तर : अस होय मला वाटल बाजारात चाललाय!

चौथा कोनाडा's picture

5 Jun 2019 - 5:38 pm | चौथा कोनाडा

छत्री, माधवराव जोशी, हेमंत देशपांडे, मनोहर लेले .... छान ! छान, छान !

छान, सॉरी, चान, चान !

पुणेकरांच्या समंजसपणाचे, चिकाटीचे नेहमीच कौतुक वाटते.