अतृप्त आत्मा -१
काल रात्री अचानकच आम्हाला आम्ही निवर्तल्याचं समजलं .म्हणजे आम्ही झोपलेलोच होतो आणी आजुबाजुला थोडी कुजबुज ऐकु आली.हळुहळु कुजबुजीचं रुपांतर मुसमुसण्यात आणी नंतर गदारोळ आणी गोंगाटात झाले.त्यामुळे झोप चाळावली.डोळे उघडले तर आम्ही सिलींगला आणि द्रोण कॕमेरातुन दिसतं तसं दृष्य दिसायला लागलं. आम्ही अंथरुणातच अर्धी लुंगी वर गेलेल्या आणी भोकं पडलेल्या गंजीफ्रॉकात उताणे पडलेलो.आणी भोवती आमचे हवे नको ते सर्व नातेवाईक ,सगे संबंधी,मित्रमंडळी ,आमच्या उधार्या थकलेले बरेचसे वाणगट,गवळी ,न्हावी सगळे हजर.
ओढुन ओढुन आणलेली सुतकी तोंड .काहींच्या मनातला आनंद न दिसताही जाणवत होता.