निमंत्रण----"श्यामरंग...त्या त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!"

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
10 Aug 2018 - 12:51 pm

सस्नेह नमस्कार!
आम्ही सादर करत असलेल्या "श्यामरंग.....त्या, त्यांचे प्रश्न.. आणि कृष्ण" या नाट्य- संगीत-नृत्याविष्काराच्या प्रयोगासाठी आग्रहाचं निमंत्रण!
शुक्रवार दिनांक ३१ ऑगस्ट २०१८. रात्रौ ८.३०ते ११
काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंत विहार, ठाणे येथे अंतर्नाद, ठाणे निर्मित, अपूर्व प्राॅडक्शन प्रस्तुत श्यामरंग सादर होतोय.
कृष्ण आणि त्याच्या आयुष्यातील स्त्रियांच्या नात्यातील काही अनवट पैलूंवर, प्रश्नांवर, त्यातील रंगांवर आधारित ही कलाकृती आहे. अभ्यासपूर्ण निवेदन, नाट्य, संपूर्णपणे नवीन संगीत, त्यावर आधारित नृत्य असा एकूण थाट आहे.
नाट्यक्षेत्राशी काहीही संबंध नसतानाही एक धाडस करतोय. घर पहावं बांधून आणि नाटक पहावं करून हेच खरं. संहिता लिहून बरीच वर्षं झाली. एक प्रसिद्ध चॅनल ते २०१४ मध्येच स्टेजवर आणणारही होतं. थेटर कलाकार सगळं सगळं बुक झालं आणि नंतर काय झालं माहित नाही पण ते बारगळलं ते बारगळलंच. पण एक मूर्खपणा करून बसले होते. संहिता रजिस्टर केली नव्हती. चॅनल वर येणार म्हटल्यावर तिथल्या असंख्य लोकांच्या हाती गेली होती. तेव्हा हितचिंतकांनी सल्ला दिला की आधी ती नावावर रजिस्टर करून घ्या. मग उशीरा का होईना पण ते सर्व सोपस्कार पार पाडले.( असं कळलं की याचा तसा उपयोग नसतो कारण जरा वाक्यरचना बदलली, काळ बदलला की संहिता नवीन होते.) नंतर ते स्वत:च स्टेजवर आणण्याचा थोडाफार प्रयत्न केला म्हणा. पण पैशाचं सोंग आणि प्रायोजकत्व मिळवण्यासाठी लागणारी हुषारी आणता येत नाही ना!. शेवटी अजून समविचारी, वेडे मित्र मैत्रिणी मिळाल्या. आणि हे धाडस करायचं ठरवलं. खूप बरे वाईट अनुभव आले. पण बहुतेक सगळे चांगलेच. खूप चांगली माणसं भेटली.(मिपाकर टका, बोका एक आझम, पैसा ताई, अजया हे तर आहेतच.)पण त्या सगळ्या विषयी नंतर कधीतरी.
आता लक्ष्य ३१आॅगस्टच्या शुभारंभाच्या प्रयोगावर. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा , आणि प्रेक्षकत्व सुद्धा लाभो ही प्रार्थना! तर नक्की या! _/\_

अपूर्व प्राॅडक्शन सादर करीत आहे,
अंतर्नाद ठाणे निर्मित,
"श्यामरंग .... त्या, त्यांचे प्रश्र्न आणि कृष्ण!"
कृष्ण आणि त्याच्या आयुष्यातील स्त्रियांच्या नात्यातील काही अनवट पैलूंवर आधारित नाट्य- संगीत- नृत्याविष्कार.
शुक्रवार दिनांक ३१ ऑगस्ट २०१८. रात्रौ ८.३०ते ११
काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंत विहार, ठाणे
कलाकार- सुखदा भिडे, मंजुषा अमीन, डॉ प्राची जावडेकर
नृत्य - निविदा म्हात्रे, चिन्मय जोशी
लेखन- डॉ प्राची जावडेकर, मंजुषा अमीन
दिग्दर्शन- मंजुषा अमीन
संगीत- डॉ आश्विन जावडेकर
नेपथ्य- शिल्पा बेंडाळे, अतुल जोशी
प्रकाश योजना- अमोघ फडके
गायन- श्रीया सोंडूर, आरोही जावडेकर, माधवी गणपुले, आलाप जावडेकर
गीतकार- संगीता जोशी, प्रदीप कुलकर्णी, यजुवेंद्र गोरे, मंजुषा अमीन, डॉ प्राची जावडेकर, डॉ आश्विन जावडेकर.
साथसंगत- गौरव मूरकर, डॉ हिमांशु गिंडे, किरण वेहले, गंधार भालेराव.
ध्वनीमुद्रण- मिक्सबाॅक्स स्टुडिओ .
तिकीट विक्री दि. १८ आॅगस्ट पासून नाट्यगृहावर.
ऑनलाईन तिकीट विक्री दि. ९ आॅगस्ट पासून www.ticketees.com

Image

नाट्यप्रकटन

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

10 Aug 2018 - 1:09 pm | जव्हेरगंज

शुभेछा!!!

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 7:59 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

प्रचेतस's picture

10 Aug 2018 - 1:23 pm | प्रचेतस

उत्तम उपक्रम.
अभिनंदन आणि खूप सार्‍या शुभेच्छा.

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 7:59 am | प्राची अश्विनी

_/\_

अनिंद्य's picture

10 Aug 2018 - 1:25 pm | अनिंद्य

@ प्राची अश्विनी,

तुमच्या स्वप्नपूर्तीचा क्षणाला आणि हा गोवर्धन पेलणाऱ्या प्रत्येक हाताला खूप खूप शुभेच्छा !

अनिंद्य

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:00 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!
गोवर्धन पेलणाऱ्या प्रत्येक हाताला ...
आवडलं.

कंजूस's picture

10 Aug 2018 - 1:28 pm | कंजूस

शुभेछा!!!

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:01 am | प्राची अश्विनी

_/\_

खूप खूप शुभेच्छा. पुण्याच्या प्रयोगाच्या प्रतीक्षेत...

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:01 am | प्राची अश्विनी

लवकरच.

ज्योति अळवणी's picture

10 Aug 2018 - 1:30 pm | ज्योति अळवणी

मनापासून शुभेच्छा!

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:02 am | प्राची अश्विनी

_/\_

टवाळ कार्टा's picture

10 Aug 2018 - 1:36 pm | टवाळ कार्टा

नवीन उपक्रमाला शुभेच्छा
अवांतर - ते माझ्यावर लाल डबा कमी सांडलाय तेव्हडे बघा जरा :D

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:04 am | प्राची अश्विनी

आत्ता हातात श्यामरंगाचा डब्बा आहे.‌
आणि " सहकुटुंब" यायचा यत्न करावा मग लाल निळा सगळे रंग लावीन हो.

मी पोकळ शुभेच्छा नाही देणार , पुण्यात जेव्हां कार्यक्रम असेल तेंव्हा आवर्जून तिकीट काढून येईल .

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:05 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

माहितगार's picture

11 Aug 2018 - 9:01 am | माहितगार

वेळ बरीच उशीरा संपणारी आहे, नाहीतर ठाण्यापर्यंत प्रवासही केला असता. शुभारंभाच्या कार्यक्रमास शुभेच्छा. पुढील कार्यक्रम केव्हा आणि कुठे ते कळवत रहावे म्हणजे वेळा जुळल्यास पहता येईल.

प्राची अश्विनी's picture

13 Aug 2018 - 12:09 pm | प्राची अश्विनी

अरेच्या, पोस्टायच्या घाईत मदत करणा-या मिपाकरांमध्ये तुमचं नाव लिहायचं -हायलच. असो.
११ पर्यंत नक्की संपेल. बघा जमलं तर.
पुढच्या कार्यक्रमाचे कळवेनच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2018 - 3:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा !! नाट्य- संगीत-नृत्याविष्काराच्या उत्तम यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:06 am | प्राची अश्विनी

धन्यवाद. कुणी ठाणेकर ओळखीचे असतील तंत्र नक्की कळवा त्यांना.

सिरुसेरि's picture

10 Aug 2018 - 4:55 pm | सिरुसेरि

अनेक शुभेच्छा !!! +१००

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:06 am | प्राची अश्विनी

_/\_

वरुण मोहिते's picture

10 Aug 2018 - 8:55 pm | वरुण मोहिते

घरचे असतील. सुखदा ला तुम्ही ओळखता हे आज कळले मला:))शुभेच्छा

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:06 am | प्राची अश्विनी

:) मलाही आत्ताच कळलं.

डँबिस००७'s picture

10 Aug 2018 - 10:09 pm | डँबिस००७

नाट्य- संगीत-नृत्याविष्काराच्या उत्तम यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !

प्राची अश्विनी's picture

11 Aug 2018 - 8:07 am | प्राची अश्विनी

_/\_

नाखु's picture

11 Aug 2018 - 8:58 am | नाखु

आणि टकाचे अभिनंदन

प्राची अश्विनी's picture

13 Aug 2018 - 12:10 pm | प्राची अश्विनी

नाय हो, भविष्य काळ वापरलाय मी.

वा! विषय तर छान आहे! पहायला आवडेल पण पुण्यात.
शुभेच्छा आहेतच.

प्राची अश्विनी's picture

13 Aug 2018 - 12:11 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद..