नाट्य

गेम ऑफ थ्रोन्स पार्श्वभूमी

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
13 Feb 2019 - 4:05 pm

गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात -

वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल .

मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .

कलानाट्यलेख

गोदाक्का

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 Jan 2019 - 1:07 pm

मे महिन्यात सारे जमले होते
राम मामा -वैशाली मामी त्यांची २ मुले -मधुकाका -वासंती काकू
राधा मावशी
आमरसाचा तुडुंब जेवण झालं होत
राधाक्कां सार आवरा आवर केली
मंडळी जमेल तशी मिळेल त्या जागेवर पडून घोरत होती
गोदाक्का ने मोकळी जाग शोधली व जमिनीला पाठ टेकवली व घोरु लागली
बाहेरून राम मामा आला त्यानं गोदाक्काला घोरताना पाहिलंत
तिच्या भोवती डास घोंघावत होते त्याने बाजूला पडलेली नवी कोरे पांढरी चादर तिच्या अंगावर टाकली
राधा मावशी बाजारात गेली होती तिने पूजेसाठी फुले हार बुक्का हळद कुंकू आणले होते

नाट्यलेख

सकाळी सकाळी

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
2 Jan 2019 - 12:28 pm

ग्लोबल इंटरनॕशनल स्कुलच्या प्री प्रायमरी सेक्शनच्या गेटवर आज एक नाट्य बघायला मिळालं.मी नेहमी सकाळी कामाला जाताना धवल मधे चहा प्यायला थांबतो .आजही चहा घेत असताना.समोर एक गाडी थांबली.आतुन एक पारोसा झोपाळलेला ,केस विस्कटलेला बाबा त्याचं गोंडस पिल्लु घेउन बाहेर पडला.गुबगुबीत जर्कीनच्या आतलं तेवढंच गोंडस गोरंगोरं बाहुलं बापाच्या गळ्याला मिठी मारुन बसलं होतं.एका खांद्यावर त्या बाहुल्याचं शिक्षण बांधलेली धोपटी आणी दुसर्या खांद्यावर बाहुली असा लवाजमा घेत कसंबसं गाडीचं दार लावुन आणी बाहुल्याची पप्पी घेत गप्पागोष्टी करत बाप शाळेच्या गेटकडे पोहचला.गेटवरच्या वॉचमन कडे सॕक देत बापाने लेकराला खाली उतरवले

नाट्यलेख

अतृप्त आत्मा 13

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
17 Dec 2018 - 7:24 pm

एरवी आमच्याशी प्रेमाचे धड चार शब्दही न बोलणारी आमची बायडी आज आमच्या विरहाने एवढी व्याकुळ झालेली बघुन आम्हालाही गलबलुन आलं.

थोड्या वेळात सावरलेली बायडी अचानक सावध होत तिथुन उठली.आणी आलेच असं म्हणत स्वयंपाकघरात गेली.तीच्या एकंदर हलचाली संशयास्पद वाटल्याने आम्हीही तरंगत तीच्या मागे गेलो.आत सर्व सन्नाटाच होता .भराभरा तांदुळाचं पिंप उघडत तीने आतुन रुमालाचं एक छोटंस गठुडं बाहेर काढलं.

अॉ ! आम्ही आश्चर्याने बघत होतो.तीथेच ओट्यावर ते उघडत तीने पुडक्यातल्या नोटा त्यात उपड्या केल्या.एकंदरीत प्रकार बघुन आम्ही हादरलोच.

नाट्यलेख

अतृप्त आत्मा 12

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
16 Dec 2018 - 7:37 pm

नान्याला छळण्यात आम्हाला आता काहीही स्वारस्य उरलं नव्हतं.अपेक्षित दहशत त्याच्या मनात बसलेली असल्याने तो आता आमचं सर्व ऐकायला बांधील होता.

नाना नानीची वरात पुन्हा प्रेसजवळ पोहचल्यावर नाना थंडीने आणी भितीने थरथर कापत जीन्यावरुन घरात गेला.आता त्याला आरामाची गरज होती.एकंदर सर्व घटनाक्रमाचा त्याच्या मनावर ताण निर्माण झाला होता .आता पुन्हा जर काही घडते तर तो देखील नानीला विधवा करुन आमच्याबरोबर वावरायला मोकळा झाला असता.आणी आम्हाला ते नको होते.

त्याला तात्पुर्त सोडुन आम्ही त्याच्या अॉफीसमधे आता पुढे काय करायचं याचा विचार करीत त्याच्याच खुर्चीत रेलुन बसलो.

नाट्यआस्वाद

अतृप्त आत्मा 11

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
9 Dec 2018 - 10:23 pm

खुप कंटाळुन आम्ही टेबलवरुन उडी मारली .आणी खुर्ची शेजारी उभं राहुन एक हात नान्याच्या खांद्यावर ठेवत दुसऱ्या सहाताने टेबलवरचं रजिस्टर उचललं.

"नान्या हरामखोर ! मुडद्याच्या टाळुवरचं पण चाटतोस ? साल्या लाज वाटली पाहिजे तुला ." त्याचं मानगुट पकडत आम्ही ओरडलो.
दचकलेला नाना एकदम भयभीत नजरेने बघु लागला. डायरी ,कॕलेंडर सगळं बंद करुन त्याने ड्रॉवर उघडुन 100/- च्या नोटांच बंडलच काढुन टेबलवर ठेवलं.

"हे घे बाबा ! आणी सोड मला .तुझा तीन महिन्याचा पगार घे आणी जा एकदाचा इथुन " नान्या गयावाया करु लागला.

नाट्यआस्वाद

आणि... डॉ काशीनाथ घाणेकर

मकरंद घोडके's picture
मकरंद घोडके in जनातलं, मनातलं
28 Nov 2018 - 11:09 am

मराठी नाट्यसृष्टीतला पहिला नाही तर अखेरचा सुपरस्टार!
घाणेकरांच्या पत्नी कांचन घाणेकर यांच्या "नाथ हा माझा" वर आधारित हा biopic सिनेमा अक्षरशः लोकांना ओढू ओढू नेतोय सिनेमाघरात!
काय चुम्मा कामं केलीत सर्वांनी!!!
सुबोध बद्दल काय बोलावं? आपली पात्रताच नाही ती!
त्याने फक्त अशी सुंदर कामं करत राहावीत आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ती पाहत राहावीत इतुकीच आपली पात्रता!!
मला दोन लोकांबद्दल विशेष बोलायचं आहे

नाट्यप्रतिक्रियासमीक्षा

अतृप्त आत्मा -10

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
18 Nov 2018 - 3:19 pm

आमच्याकडे बघताना नानाची नजर आजीबात स्थिर नव्हती.भयचकीत नजरेने आणी विदीर्ण चेहऱ्याने बघत नाना किंचाळला.
"बाप्या भडव्या ! हा काय चावटपणा लावलायस "

" हॕ हँ !! मालक माझा बोनस आणी मागच्या महिन्याचा पगार राहिलाय तो घ्यायला आलोय. देताय ना ?" आम्ही विचारलं

"पण तु इथं कसा आला परत ? तु तर मेलायस ?? आत्ताचा तर तुला पेटवुन आलो आम्ही " नाना गोंधळल्या घाबरल्या आवाजात बोलला.

" नाना ! तु आणी तो म्हातारा गोखल्या जो पर्यंत जिवंत आहात ना तो पर्यंत या बापु जोश्याला मुक्ती नाही. तुझं आणी आप्प्याचं सगळं बोलणं ऐकलय मी " आम्ही जरा जरबेतच बोललो.

नाट्य

ॲडमिशन Engineeringची : एक नाट्यछटा

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
17 Nov 2018 - 11:24 pm

लेखक : कोणी का असेना.
स्थळ : इशान्य भारतातील एक राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कार्यालय
पात्र : सरकारी बाबू ( श्री. ना.पा. सघोडे)
पिता ( श्री. फा.र. चतापलेले)
पुत्र ( संदर्भास)
इतर सोयीनुसार

पार्श्वभुमी : अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागांचे सुयोग्य आणि यथार्थ वाटप व्हावे, म्हणून केंद्र सरकारने CSAB - NEUT ( Central Seat Allotment Board - North East & Union Territories) ची निर्मिती केली आहे. सदर प्रक्रियेनुसार जागांचे वाटप व भरती होऊन आता जवळपास दोन महीने लोटले आहेत.

नाट्यवाङ्मयमुक्तकविनोदसमाजप्रकटनआस्वादविरंगुळा

अतृप्त आत्मा -९

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
17 Nov 2018 - 5:47 pm

आप्पाला चाळीपाशी सोडुन नानाच्या गाडीने यु टर्न घेतला आणी ती प्रेसकडे पळु लागली.उद्या दोन तीन डिलीव्हरीज द्यायच्या असल्याने आणी आमदारपुत्राच्या लग्नपत्रीका प्रिंट करायच्या असल्याने नानाने रात्रपाळी चालु ठेवलेली.दिवाळीच्या काळात ही धावपळ नेहमीचीच होती.

मागच्या सिटवरुन आम्ही नानुच्या शेजारी स्थानपन्न झालो.आणी आमचं अस्तित्व जाणवुन देण्यासाठी आम्ही एकच क्षण नानाच्या खांद्यावर हात टाकला.

नाट्य