गेम ऑफ थ्रोन्स पार्श्वभूमी

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
13 Feb 2019 - 4:05 pm

गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात -

वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल .

मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .

टार्गेरियन घराण्याचे सुरुवातीचे बहुतेक राजे पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष होते , प्रजेला त्यांच्याबद्दल प्रेम आदर होता . ड्रॅगन या महाकाय शक्तिशाली प्राण्याला काबूत ठेवण्याची आणि त्याचा आपल्याला हवा तसा युद्धात वापर करण्याची क्षमता वंशपरंपरेने फक्त या घराण्यात होती . महाकाय अशा ड्रॅगन्सच्या जोरावरच त्यांनी सातही राज्यांवर आपली एकछत्री सत्ता स्थापन केली होती . पण कालांतराने सततच्या बंदिवासामुळे ड्रॅगनच्या पुढील पिढ्यांचा आकार लहान लहान होत शेवटी ती प्रजात नष्ट झाली . तरीही या घराण्याची सत्ता कायम राहिली . सुरुवातीचे पराक्रमी राजे वगळता या घराण्यातील पुढील काही राजे अत्यंत क्रूर , जुलमी असे निपजले . त्यात सगळ्यात क्रूर राजा म्हणजे किंग रॉबर्टची सत्ता निर्माण होण्यापूर्वी सत्ताधीश असलेला एगॉन टार्गेरियन .

व्हिसेरिस व डॅनेरिस दोघांचा जन्मदाता असलेला एगॉन टार्गेरियन हा प्रचंड जुलमी व अत्याचारी राज्यकर्ता होता , त्याच्या डोक्यावर जवळपास परिणामच झालेला होता , ( ह्या राजाला मॅड किंग म्हटलं जाऊ लागलं ) त्याला सगळीकडे शत्रू दिसू लागले होते , सगळ्यांबद्दल संशय निर्माण झाला होता आणि त्याने चक्क स्वतःच्या राजधानीत ठिकठिकाणी अंडरग्राउंड भयानक स्फोटकाचे साठे ठेवले होते अर्थात हे त्याच्या राज्यात कोणाला माहीत नाही , ते पुढे समजतं प्रेक्षकांना .. पण त्याच्या जुलमाने त्रस्त झालेल्यांनी बंड पुकारलं , युद्ध झालं .. या युद्धाचं नेतृत्व किंग रॉबर्टसने केलं , त्याचा जिवलग मित्र ज्याने युद्धात खांद्याला खांदा लावून त्वेषाने लढाई केली तो एड्डार्ड स्टार्क शॉर्टफॉर्म नेड स्टार्क ..

विंटरफेलच्या स्टार्क घराण्यातील एड्डार्ड स्टार्कची बहीण लियाना हिचं बरॅथिऑन घराण्याच्या रॉबर्टशी लग्न ठरलं असताना टार्गेरियन घराण्याचा वारस , मॅड किंगचा सगळ्यात मोठा मुलगा आणि आधीच विवाहित असलेल्या आणि 2 मुलांचा बाप असलेल्या राजकुमार ऱ्हिगारने तिला पळवून नेली . त्यात लियानाचा मोठा भाऊ ब्रॅन्डन राजाला जाब विचारायला गेला असता राजाने त्याला अटक केली व त्याची सुटका व्हावी अशी इच्छा असेल तर दरबारात या म्हणून त्याच्या वडिलांना दरबारात पाचारण केले पण ते येताच वडील व मुलगा दोघांची हत्या केली .. ही घटना मॅड किंगच्या जुलमांनी त्रस्त झालेल्या 7 राज्यांमध्ये बंडाची ठिणगी टाकायला कारणीभूत झाली .. आणि उघड बंडाला सुरुवात झाली . याचं नेतृत्व लियानाचा लहान भाऊ एड्डार्ड आणि ज्याच्याशी तिचं लग्न ठरलं होतं त्या रॉबर्टने केलं . त्या दोघांचे गुरू / मार्गदर्शक जॉन ऍरीन हे होते . टली घराण्याची राजकुमारी कॅटलिनशी ब्रॅन्डनचं लग्न ठरलं होतं , तो मरण पावल्यामुळे लहान भाऊ एड्डार्ड / नेडशी तिचं लग्न झालं आणि तिची लहान बहीण लिसा हिचं वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या जॉन ऍरीनशी लग्न झालं . 7 पैकी अर्ध्याहून अधिक राज्यं बंडवाल्यांच्या बाजूने होती तर टायरेल सारखी काही राजाच्या बाजूने लढली .. 1 वर्ष युद्ध सुरू होतं .. या युद्धात राजकुमार ऱ्हिगारला रॉबर्टने स्वतः ठार केलं .

टार्गेरियन घराण्याचा वजीर / प्रधान लॅनिस्टर घराण्यातील टायविन लॅनिस्टर हा अत्यंत बुद्धिमान माणूस होता , लॅनिस्टर घराणं सगळ्यात श्रीमंत घराणं आहे . टायविनचा मुलगा जेमी याला त्या जुन्या राजाने आपला अंगरक्षक नेमला .. राजाच्या अंगरक्षकाला लग्न करता येत नाही त्यामुळे टायविनचा वंश खुंटल्यात जमा होता .. या घटनेमुळे टायविन लॅनिस्टर नाराज झाला होता .. राजाचा मोठा मुलगा ऱ्हिगार तरी निदान आपली मुलगी सरसी हिच्याशी लग्न करेल व नात्याने जोडले जाऊ अशी त्याला आशा होती तीही पूर्ण झाली नाही , राजाने ऱ्हिगार याचं डॉर्ने नावाच्या राज्याच्या राजकुमारी इलियाशी लग्न लावून दिलं होतं .. शिवाय खुद्द टायविनवरही त्याला संशय होता की तो आपल्याला दगा देईल म्हणून त्याने अंगरक्षक झालेल्या टायविनच्या मुलाला निष्ठेची परीक्षा म्हणून आपल्या वडिलांना ठार मारायला सांगितलं , राजाने ज्यावेळी राजधानी उडवून द्यायचा निर्णय घेतला तेव्हा तो ज्या मोजक्या लोकांना माहीत होता त्यात त्यावेळी 16 - 18 वर्षांचा असणाऱ्या जेमीचा समावेश होता ...

ह्या सगळ्या परिस्थितीत राजाला म्हणजे मॅड किंगला संपवणं ही अपरिहार्य गोष्ट होऊन बसली होती . टायविनने बंडवाल्यांशी संधान साधलं . राजाला राजधानीच्या संरक्षणाची जबाबदारी आपण घेऊ असं सांगितलं , राजाने त्याच्यावर विश्वास ठेवून राजधानीचे दरवाजे टायविनच्या सैन्यासाठी उघडले .. या कुशल सैन्याने राजधानीवर हल्ला चढवून ती जिंकून घेतली ... विश्वासघात आणि हार झाल्यामुळे मॅड किंगने स्फोटकांचे सगळे साठे पेटवून संपूर्ण राजधानी उडवून देण्याचा निर्णय घेतला .. ही आज्ञा अंमलात आणली गेली असती तर फक्त शत्रूच नाही तर लाखभर नागरिक / रहिवासीसुद्धा मरणार होते .. त्याला थांबवायला जेमीने त्याच्या पाठीत तलवार खुपसून त्याला ठार मारलं ... अंगरक्षकाला जी एकनिष्ठतेची शपथ घ्यावी लागते ती शपथ जेमीने या कृत्याने भंग केली ... शिवाय स्फोटकांबद्दल त्याने पुढे कोणाशी वाच्यताही केली नाही ...

बंडवाल्यांनी राजधानीत प्रवेश केला तेव्हा राजधानी आधीच शरण आली होती ... रॉबर्टने राजपदासाठी दावा केला , त्यानेच आधीच्या वारसाला ठार केलं होतं आणि बंडाचंही नेतृत्व केलं होतं .. नेड स्टार्कला राजा होण्यात फारसा रस नव्हता .. इतर सर्व घराण्यांनी हा दावा स्वीकारला आणि रॉबर्टचा राज्याभिषेक झाला . आपली मदत केल्याबद्दल राजा झालेल्या रॉबर्टने टायविनची मुलगी सरसी हिच्याशी विवाह करण्यास संमती दिली पण मनाने तो नेहमीच लियानात गुंतलेला होता . नेड स्टार्क आपल्या विंटरफेल या राज्याचा उत्तराधिकारी बनला आणि रॉबर्टचा मांडलिक म्हणून राज्यकारभार पाहू लागला , त्यांची जिवलग मैत्री रॉबर्ट राजा झाल्यानंतरही बदलली नाही . जेमीने रॉबर्टचं अंगरक्षक पद स्वीकारलं . कारण त्याला लग्न संसार वगैरे करायचा नव्हता ..

सरसी आणि जेमी हे जुळे भाऊबहीण होते , त्यांचा सगळ्यात लहान भाऊ टिरियन हा ठेंगु होता , त्याला जन्म देताना त्यांची आई मरण पावली होती ... ह्याच्यामुळे आपली आई गेली हा राग मनात ठेवून सरसीने आयुष्यभर टिरियनचा द्वेष केला .. तर जेमीच्या मनात मात्र आपल्या निष्पाप भावाबद्दल राग नव्हता तर एक मृदू कोपरा होता , त्याने नेहमीच सरसीच्या रागापासून टिरियनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला . वयाच्या 14 व्या वर्षांपासून जेमी आणि सरसीमध्ये अनैतिक संबंधांची सुरुवात झाली . अशा तऱ्हेचे संबंध पूर्ण वेस्टरोज मध्ये अत्यंत निषिद्ध मानले जात .. पूर्वी राजपदावर असलेल्या टार्गेरियन घराण्यात मात्र वांशिक पवित्रता जपण्यासाठी भाऊ - बहिणींचे विवाह ही रुळलेली प्रथा होती .

टायविनच्या मनात आपल्या पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत झाला म्हणून आणि बुटका - कुरूप , लढण्यास अपात्र म्हणून अशा कारणांमुळे टिरियनबद्दल कधीच प्रेम नव्हतं . अतिशय कडवट वागणूक टिरियनला मिळाली . पण टिरियनची धारदार बुद्धिमत्ता , राजकारणाची समज , वाचन - व्यासंगाने आलेली समज , माणसांची अचूक पारख , मनाचा चांगुलपणा असे अनेक गुण त्याला एक महत्त्वाचं पात्र बनवतात .

ऱ्हिगारची पत्नी मार्टेल घराण्याची राजकुमारी इलिया आणि तिची 2 मुलं ही बंडाच्या वेळी राजधानीत होती .. मार्टेल घराण्याने या युद्धाच्या प्रसंगात आपल्याशी एकनिष्ठ राहावं आणि शत्रूला मिळू नये यासाठी त्यांना सुरक्षित गुप्त ठिकाणी हलवण्याऐवजी मॅड किंगने त्यांना आपल्यापाशी राजधानीत राजवड्यातच ठेवलं होतं.. टायविनने राजधानी जिंकून घेतल्यावर त्याच्या आज्ञेनुसार तिच्या दोन लहान मुलांना तिच्या नजरेसमोर क्रूरपणे ठार करण्यात आलं त्यानंतर तिच्यावर पाशवी बलात्कार करून नंतर तिलाही ठार केलं गेलं . मात्र रॉबर्ट राजा होताच टायविनने हे क्रूर कृत्य घडत असताना आपण संपूर्ण अनभिज्ञ होतो असं सांगितलं आणि त्या युद्धात मरण आलेल्या 1 - 2 सरदारांची नावं गुन्हेगार म्हणून सांगितली .. प्रत्यक्षात इलिनावर बलात्कार करणारा व तिच्या दुसऱ्या बाळाला मारणारा सेवक जिवंत होता .. त्याच्या पाशवी शक्ती , आज्ञापालन , क्रूरपणा वगैरे गुणांमुळे त्याला गमवायची टायविनची इच्छा नव्हती , त्याने त्याला पाठीशी घातला .. रॉबर्टला संशय आला असला तरी इलिया व तिच्या मुलांबद्दल फारशी सहानुभूती नव्हतीच .. ऱ्हिगारने लियानाचं अपहरण केल्याचा राग त्याच्या मनातून कधीच कमी झाला नाही .

बंडाच्या रक्तरंजित गदारोळातही मॅड किंगची गर्भवती पत्नी आणि तिचा लहान मुलगा विसेरिस टार्गेरियन यांना सुरक्षित बाहेर काढण्यात मॅड किंगच्या विश्वासू सेवकांना यश आलं .. राजधानीतून निसटणं शक्य झालं . किंग रॉबर्टच्या सैनिकांपासून , अधिकाऱ्यांपासून , त्याच्याशी एकनिष्ठ असलेल्या लोकांपासून लपतछपत राणी आणि मुलगा राहू लागले , लहान मुलीला जन्म दिल्यानंतर राणी लवकरच मरण पावली . जसजशी रॉबर्टची सत्ता प्रबळ होत गेली आणि टार्गेरियन्स सत्तेची पुनर्स्थापना अशक्य बाब आहे हे लोकांच्या लक्षात येत गेलं तसंतशी व्हिसेरीस आणि त्याची छोटी बहीण डॅनेरिस यांना आश्रय देऊ पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटत गेली .. किंग रॉबर्टचे गुप्तहेर सतत त्यांचा शोध घेत होते , अशा परिस्थितीत त्यांना आश्रय देऊन राजाची वाकडी नजर आपल्याकडे वळवून घेण्याची कुणाची इच्छा नव्हती .. एकेकाळच्या राजकुमाराला अन्नासाठी लोकांपुढे हात पसरायचीही वेळ आली ... या मानहानीमुळे त्याचा स्वभाव कडवट , क्रूर , स्वार्थी , संतापी बनत गेला ... डॅनेरिसला त्याच्या संतापाची झळ अनेकवेळा भोगावी लागली ... जगाकडून झालेल्या सगळ्या अपमानाचा वचपा बिचाऱ्या डॅनेरिस वर निघत असे .. ती आपल्या भावासमोर सतत दबलेली , दहशतीखाली वावरत असे , त्याची हरेक गोष्ट बिनविरोध मान्य करत असे , तिला स्वतःचं असं काही मत , हक्क नव्हते .. डॅनेरिस 13 - 14 वर्षांची झाल्यावर या भाऊ बहिणीची राहण्याची सोय खर्च सर्व एका श्रीमंत व्यापाऱ्याने आपल्या अंगावर घेतला .. व्हिसेरीसचं एकच स्वप्न होतं ते म्हणजे आपलं गेलेलं राज्य परत मिळवून , राजगादी / आयर्न थ्रोन मिळवणं पण जिथे डोक्यावर छप्पर असण्याची मारामार होती तिथे सैन्य वगैरे कुठे असणार ? शिवाय त्यांच्यामध्ये राजा / नेता होण्यासाठी लागणारे शौर्य , पराक्रम , चातुर्य किंवा संघटन कौशल्य , नेतृत्वगुण , प्रभावी व्यक्तिमत्त्व यातले कोणतेही गुण नव्हते .... फक्त आपण राज्याचे रक्ताने खरे वारसदार आहोत आणि ते आपल्याला मिळणारच हे पोकळ स्वप्न तो डोक्यात घेऊन बसला होता ... डॅनेरिसचा एखाद्या पराक्रमी बलशाली सैन्यबळ असलेल्या राजाशी विवाह करून देऊन त्याच्या साहाय्याने आपली पूर्वीची सत्ता मिळवता येईल असा प्लॅन त्याच्या डोक्यात होता . व्हिसेरीस व डॅनेरिसला आश्रय दिलेल्या व्यापाऱ्याने डोथ्राकी या रानटी क्रूर जीवनपद्धती जगणाऱ्या जमातीच्या एका टोळीच्या प्रमुखाशी डॅनेरिसचा विवाह करण्याचा प्रस्ताव व्हिसेरीस समोर ठेवला ... हा प्रमुख प्रचंड बलवान होता आणि त्याची टोळीही .. त्याच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात होतं आणि सर्व योद्धे अतिशय, कसलेले , कुशल आणि क्रूर होते . व्हिसेरिसने हा प्रस्ताव मान्य केला , डॅनेरिसच्या इच्छेचा विचार करण्याचा तर प्रश्नच नव्हता . विवाहानंतर टोळीचा प्रमुख खाल ड्रोगो हा आपल्या सैन्यासह राजधानी म्हणजे किंग्ज लँडिंगवर चालून जाणार आणि राज्य जिंकणार आणि हे जिंकलेलं राज्य अलगद व्हिसेरिसच्या ओंजळीत टाकणार अशी गोड दिवस्वप्न व्हिसेरिस पाहत होता . पण प्रत्यक्षात मात्र हे युद्ध करण्याचा ड्रोगोचा कोणताही मानस नव्हता .. डोथ्राकी जमातीत समुद्र प्रवास निषिद्ध मानला जात होता . त्याला उच्च राजवंशातली राजकुमारी पत्नी म्हणून हवी होती , ती मिळाली होती , त्यासाठी त्याने व्हिसेरिस राहत असलेल्या श्रीमंत व्यापाऱ्याला भरपूर संपत्ती दिली होती आणि व्हिसेरिस तयार व्हावा म्हणून आपल्या सैन्याच्या जोरावर तुझं गेलेलं राज्य मिळवून देऊ असं मधाचं बोट त्याला लावलं होतं , साफ खोटं आश्वासन दिलं होतं .

इकडे राजधानीमध्ये रॉबर्टच्या नजरेआड सरसी आणि जेमी यांचे अनैतिक संबंध चालू होतेच . सरसीची 3 मुलं ही खरी जेमीची असून संपूर्ण राज्य मात्र ती राजाची मुलं आहेत असं समजत आहे . सरसीचा पराकोटीचा क्रूर आणि स्वार्थी , विकृत स्वभाव तिचा मोठा मुलगा जॉफ्री याच्यात पुरेपूर उतरला आहे , मधला मुलगा टॉम्मन आणि छोटी मुलगी मात्र शुद्ध निर्भेळ मनाचे आहेत .

राजा झाल्यानंतर रॉबर्टने आपले मार्गदर्शक जॉन ऍरीन यांना वजीर / प्रधान ( हँड ऑफ द किंग ) हे पद दिलं होतं .. व जवळपास 14 - 15 वर्षे सर्व कारभार ते व्यवस्थित सांभाळत होते . राजा झाल्यानंतर रॉबर्टने राज्यकारभारकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष केलं , तो विलासात मग्न झाला . सुदैवाने जॉन ऍरीन व इतर कार्यक्षम अधिकारी त्याला लाभल्यामुळे राज्याचा गाडा अगदीच बिघडला नाही ... शिवाय रॉबर्ट्स फारसा जबाबदार राजा नसला तरी क्रूर किंवा अत्याचारी नव्हता ... युद्ध , परराष्ट्रीय धोरण आदी बाबत त्याचे निर्णय अचूक असत , शिवाय तो राज्यकारभारही ठाकठीक सांभाळत होता .

मालिकेची सुरुवात होते तेव्हा जॉन ऍरिनचा मृत्यू झाल्यामुळे नेड स्टार्कला प्रधानपद स्वीकारण्याची विनंतीवजा आज्ञा करण्यासाठी किंग रॉबर्ट आपल्या कुटुंबासहित विंटरफेलला येतो . त्याच रात्री नेडची पत्नी कॅटलिन हिची बहीण लिसा जिचं जॉन ऍरिनशी लग्न झालं होतं तिचं गुप्त पत्र कॅटलिनला येतं की आपल्या नवऱ्याचा मृत्यू नैसर्गिक नाही तर लॅनिस्टर घराणं म्हणजे राणी आणि तिचे नातेवाईक त्याला जबाबदार आहेत , आपल्या लहान मुलाच्या जीवाचंही बरंवाईट करायला ते मागेपुढे पाहणार नाहीत या भीतीने मी मुलाला घेऊन राजधानी सोडून आमच्या म्हणजे नवऱ्याच्या राज्यात जाऊन तिकडचा कारभार हाती घेत आहे , पत्र वाचून होताच नष्ट करणे .. अशा कारस्थानांनी भरलेल्या ठिकाणी न जाता नेड स्टार्कने राजाची आज्ञा नाकारावी अशी कॅटलिनची इच्छा होती .

पण या पत्राने नेड स्टार्कच्या मनात राणी व लॅनिस्टर घराण्याबद्दल संशयाची बीजं रोवली गेली आणि त्याने राजाच्या सुरक्षिततेसाठी आपण वजीरपदाचा प्रस्ताव स्वीकारणं अधिकच आवश्यक आहे , तिथे राहूनच आपल्याला सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवता येईल हे कॅटलिनला पटवलं व जाण्याचा निर्णय घेतला .

नेड स्टार्क व कॅटलिन यांना पाच मुलं होती , रॉब , सान्सा , ब्रॅन्डन / ब्रान , आर्या आणि रिकॉन . आणि नेड स्टार्कला युद्धावर असताना दुसऱ्या स्त्रीपासून झालेला मुलगा जॉन . जॉनसारख्या कायदेशीर विवाहसंबंधातून न उपजलेल्या मुलांना वेस्टरोज मध्ये बास्टर्ड ही संज्ञा आहे , तो अपमानकारक किंवा शिवीसदृश्य शब्द नाही ...पण अर्थात बहुतेक ठिकाणी बास्टर्ड मुलांना कमीपणाची वागणूक दिली जाते . पण या कुटुंबात मात्र जवळपास सर्व लोक जॉनला कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने , प्रेमानेच वागवत असत .. कॅटलिनच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नव्हतं , ती त्याला दूर ठेवणंच पसंत करत असे आणि आईचं पाहून मोठी मुलगी सान्साही जॉनशी फार बरी वागत नसे.. पण रॉब , आर्या , ब्रॅन , रिकॉन ह्यांचं जॉन वर भावासारखंच प्रेम होतं . पुढे जॉन हा नेड स्टार्कचा अनौरस मुलगा नसून बहीण लियानाला ऱ्हिगार टार्गेरियन पासून झालेला मुलगा होता , एवढंच नाही तर लियानाचं अपहरण झालेलं नसून ती स्वखुशीने विवाहित ऱ्हिगार बरोबर पळून गेली होती हे सत्य प्रेक्षकांना समजतं ... म्हणजे ज्या कारणाने रॉबर्टने बंड केलं ते कारणच खोटं निघतं . लियाना व ऱ्हिगारने गुप्तपणे विवाहही केलेला असल्यामुळे जॉन हा बास्टर्ड सुद्धा नाही तर टेक्निकली तो टार्गेरियन घराण्याचा वारस आणि जन्मसिद्ध हक्काने आयर्न थ्रोनचा वारसदार आणि संपूर्ण वेस्टरोजचा राजा आहे . अर्थात या सत्यापासून सर्व जग व तो स्वतःही अनभिज्ञ आहेत . लियाना आणि ऱ्हिगारच्या मुलाच्या अस्तित्वाचं सत्य रॉबर्टला कळलं तर तो जॉनला कदापि जिवंत राहू देणार नाही म्हणून नेड स्टार्कने आयुष्यभर या सत्याची वाच्यता केली नाही , अगदी स्वतःच्या पत्नीलाही याचा थांगपत्ता लागू दिला नाही .

नेड स्टार्कची मोठी मुलगी सान्सा ही 12 - 14 वर्षांची म्हणजे किंग रॉबर्टचा मुलगा जॉफ्री या 16 -17 वर्षांच्या राजकुमाराला वधू म्हणून साजेशा वयाची होती . जॉफ्रीच्या खऱ्या स्वभावाची तिला सुतरामही कल्पना नव्हती .. देखण्या राजकुमाराशी आपलं लग्न होईल , आपण वेस्टेरोजची भावी राणी बनू , राजपुत्र आपल्यावर खूप प्रेम करेल , आपली सुंदर मुलं पुढे राजगादीवर बसतील अशा अत्यंत भोळ्याभाबड्या सोनेरी स्वप्नांमध्ये ती मग्न होती .. त्यांचा विवाह ठरणे ही अगदी शक्यतेच्या कोटीतली गोष्ट होती , स्टार्क घराणं राजाच्या घराण्याच्या तोलामोलाचं होतंच शिवाय रॉबर्ट आणि नेड स्टार्कचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते .

मधला मुलगा ब्रॅन आणि मुलगी आर्या हे जवळपास एकाच व्हायचेच 7 - 8 वर्षांचे होते . आर्याला राजघराण्यातील मुलींना दिलं जाणारं शिक्षण म्हणजे विणकाम , भरतकाम , चित्रकला , संगीत , वेगवेगळ्या कला , शिष्टाचार , नाजूक हसणं बोलणं या सगळ्यात अजिबात गोडी नव्हती ... तिला तलवारबाजी , निशाणेबाजी , युद्धाशी संबंधित कलांमध्ये रस होता . पण अर्थात लहान मुलगी म्हणून तिच्या आवडीनिवडी कोणी फार सिरियसली घेत नसत . तरी पुढे तिची हौस भागवण्यासाठी तिच्या वडीलांनी तलवारबाजी शिकवण्यासाठी एक शिक्षक नेमला .

ब्रॅन हा 10 वर्षांचा गोंडस खेळकर मुलगा सगळ्यांचा लाडका होता .. त्याला झाडं , उंच इमारती , मनोरे वगैरे खाचा असलेल्या इमारतीत पाय ठेवून सरसर वर चढून उंचावरून सगळं न्याहाळण्याची आवड होती .. याबद्दल त्याने अनेकदा आईची म्हणजे कॅटलिनची बोलणी खाल्ली होती पण तो काही स्वतःला रोखू शकत नसे .. रॉबर्ट आणि त्याचं कुटुंब विंटरफेलमध्ये वास्तव्यास आलेलं असतानाही ब्रॅन आपल्या नेहमीच्या टॉवरवर चढला .. हा टॉवर साधारण दुर्लक्षित अवस्थेत असे , तिथे क्वचितच वर्दळ असे . एरवी चिडीचूप शांत असलेल्या या टॉवर मध्ये त्यादिवशी मात्र कसलेतरी आवाज येत होते .. बालसुलभ कुतूहलाने आत डोकावून पाहताच त्याला किंग रॉबर्टची राणी सरसी आणि तिचा भाऊ जेमी नको त्या अवस्थेत दिसले .. त्या दृश्याचा अर्थ कळण्याएवढीही त्याची समज नव्हती . पण अचानक आपलं रहस्य उघड होण्याचा धोका उभा राहिलेला पाहताच राणी आणि जेमी भयंकर अस्वस्थ झाले . ही घटना जर किंग रॉबर्टला कळली असती तर त्या दोघांनाही भयानक मृत्युदंड दिला गेला असता . आपली कातडी वाचवण्यासाठी जेमीने ब्रॅनला त्या उंच टॉवरच्या खिडकीतून धक्का देऊन खाली पाडलं .

या अपघातात ब्रॅनचा मृत्यू होईल ही त्या दोघांची अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही . ब्रॅन काही काळासाठी कोमासदृश्य अवस्थेत गेला .. कॅटलिन दिवसरात्र त्याच्या उशापायथ्याशी बसून त्याची काळजी घेत असतानाच अज्ञात हल्लेखोराने प्रत्यक्ष किल्ल्यात , त्या शयनकक्षात येऊन निद्रिस्त ब्रॅनचा जीव घेण्याचा प्रयत्न केला . या झटापटीत कॅटलिन स्वतः जखमी झाली पण ब्रॅनच्या पाळीव लांडग्याने हल्लेखोराच्या नरडीचा घोट घेऊन मालकाच्या प्राणांचं रक्षण केलं . परिणामी ब्रॅनने अशी कोणतीतरी गोष्ट पाहिली असावी जी कोणापर्यंत पोहोचू नये यासाठी त्याला संपवण्याचा प्रयत्न केला गेला हे कॅटलिनच्या लक्षात आलं . मधील काळात नेड आपल्या सान्सा व आर्या या दोन मुलींना घेऊन रॉबर्टच्या सर्व कुटुंब व सैनिकांसहित राजधानीतील वास्तव्यास निघून गेला होता . हल्लेखोराने वापरलेला खंजीर अतिशय किमती दुर्मिळ धातूचा केवळ राजघराण्यातील लोकांनाच परवडू शकेल असा होता आणि त्याच्यापाशी मोहरांचा बटवाही सापडला होता .. त्यामुळे राजधानीतून जे लोक आले होते त्यांच्यापैकीच कोणाचंतरी हे काम असावं हा संशय कॅटलिनच्या मनात निर्माण झाला , लिसाची चिट्ठीही त्याला कारणीभूत होतीच . तेव्हा तो खंजीर घेऊन आपणच गुप्तरीतीने राजधानीत जाऊन नवऱ्याला भेटावं व खंजीर कोणाचा याचा शोध घ्यावा यासाठी कॅटलिन आपल्या अगदी मोजक्या विश्वासू माणसांना याची माहिती देऊन राजधानीकडे रवाना झाली ..

वेस्टरोज आणि बाहेरच्या प्रदेशाची सीमारेषा म्हणजे नाईट वॉल ही प्रचंड बर्फाची भिंत आहे .. इथे काही सैनिक / पहारेकरी नियुक्त केले जातात .. या पहाऱ्याला नाईट वॉच म्हटलं जातं . एकदा नाईट वॉचची शपथ घेतली की ती आयुष्यभर पाळावी लागते , व मरेपर्यंत तिथेच राहावं लागतं .. या पहारेकऱ्यांना विवाह , कुटुंब हे वर्ज्य आहे .. लग्न न करण्याची , स्वतःचं कुटुंब निर्माण न करता नाईट वॉचचे इतर सहकारी हेच कुटुंब आणि नाईट वॉचची ड्युटी हेच आयुष्याचं कर्तव्य मानण्याची शपथ त्यांना घ्यावी लागते . त्यांना परत मुख्य वस्तीच्या प्रदेशात म्हणजे 7 पैकी कुठल्याही राज्यात येण्याची परवानगी नाही , अखंड नाईट वॉचची ड्युटी पार पाडावी लागते . त्या वेशीपलीकडे मुक्त जीवन जगणारे आदिवासी / शिकारी सदृश्य लोक राहतात .. त्यांच्यापासून राज्याचं संरक्षण करणे हे नाईट वॉचचं काम आहे . जर एखादा पहारेकरी हे कर्तव्य सोडून कुठल्याही राज्यात आढळला तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा आहे . हे काम स्वीकारण्यास कोणीही उत्सुक नसतात ... मृत्युदंड किंवा हात पाय तोडणे अशी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांसमोर ती शिक्षा किंवा नाईट वॉचचा पहारेकरी होणे असे दोन पर्याय ठेवले जातात , त्यावेळी ते नाईट वॉच स्वीकारतात .. किंवा अतिशय दरिद्री लोक पोटाची सोय होईल म्हणून नाईलाजाने हा पर्याय स्वीकारतात .

कलानाट्यलेख

प्रतिक्रिया

खंडेराव's picture

13 Feb 2019 - 4:53 pm | खंडेराव

आठवा भाग येतांना हि समरी अगदी कामाची आहे ..

विनिता००२'s picture

13 Feb 2019 - 4:59 pm | विनिता००२

छान ! ओघवती भाषाशैली :)

टवाळ कार्टा's picture

13 Feb 2019 - 5:13 pm | टवाळ कार्टा

आयला....मी आत्ताच तिसरा सीझन संपवलाय.... इथे बरेच स्पोईलर्स आहेत म्हणून वाचत नाहीये

उगा काहितरीच's picture

13 Feb 2019 - 5:15 pm | उगा काहितरीच

ग्रेट ! पुभाप्र !

तुषार काळभोर's picture

13 Feb 2019 - 6:12 pm | तुषार काळभोर

हॅरी पॉटर तसं तोंडपाठ आहे कित्येक पारायणं करून.
गेऑथ्रो बद्दल काही माहिती नाही.
ही मालिका मला तरी उपयोगी पडेल.
(रायटर्स ब्लॉक सध्या ब्लॉक करा, आणि हे पूर्ण करा)

सर्वांना धन्यवाद . या लेखात एक चूक झाली आहे , ती म्हणजे मॅड किंगचं नाव एगॉन नाही एरिस II असं होतं . एगॉन हे त्याच्या एका पूर्वजाचं नाव आहे .

जव्हेरगंज's picture

13 Feb 2019 - 10:14 pm | जव्हेरगंज

एवढं किचकट आहे का हे!!

मालिका अजिबात आवडली नाही. चार भाग बूघून झाले आहे आणि बाकीचे डिलीट मारले. :((

मी गेम ऑफ थ्रोन्सचा पहिला भाग साधारण 3-4 वर्षांपूर्वी पाहिला होता .. त्यावेळी तो कसाबसा पाहिला आणि डिलीट केला , पुढचे पाहण्याचा विचारही पुढची 3 वर्षं मनाला शिवला नाही . एकतर अतिशय हिंसक दृश्यं , ती एकवेळ परवडली म्हणायची वेळ आणणारी नग्नता असलेली दृश्यं , ते कमी की काय म्हणून एकीकडे भावा-बहिणीतील अनैतिक संबंध तर दुसरीकडे सख्ख्या बहिणीचा सैन्यप्राप्तीकरता सौदा करणारा भाऊ या सगळ्यामुळे पहिल्या भागानेच मालिकेबद्दल मनात तिरस्कार निर्माण झाला .

पण काही महिन्यांपूर्वी मी या मालिकेला आणखी एक चान्स द्यायचं ठरवलं . माझ्या फेसबुकवरच्या इतर काही आवडत्या मालिका / पुस्तकांच्या वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये आवडती मालिका कोणती अशा कुणीतरी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कितीतरी जणांनी गेम ऑफ थ्रोन्सचाही उल्लेख केला होता . तेव्हा आपल्याला आवडणारी पुस्तकं / मालिका आवडणाऱ्या इतक्या जणांना ही मालिका एवढी आवडते तर ती आधी वाटली तितकी वाईट / गलिच्छ असणं कसं शक्य आहे ? असा प्रश्न मला पडला . इकडे मिपावरील एका धाग्यातही बऱ्याच जणांनी गेम ऑफ थ्रोन्स आवडत असल्याचं म्हटलं होतं . शेवटी किमान 10 एपिसोड पहायचेच जरी नाही आवडले तरी आणि तरी नाही आवडली तर मग बघणं बंद करायचं असं पक्कं ठरवून पाहायला सुरुवात केली .. तरी पहिले काही एपिसोड फारसे आवडले नव्हते , एकतर वर म्हटलेली कारणं शिवाय किचकटपणा .. नक्की काय चालू आहे समजायचं नाही . तेव्हा मालिकेच्या फॅनडम विकीचं पेज आहे , तिथे जाऊन शंका निरसन करायला सुरुवात केली आणि ह्या पोस्टमध्ये जी लिहिली आहे त्यातली थोडी पार्श्वभूमी हळूहळू लक्षात येऊ लागली . स्टार्क कुटुंबाच्या सदस्यांशी कधी भावबंध निर्माण झाले कळलंच नाही , पराक्रमी , विशाल हृदयाचा , कर्तव्यासाठी जीवही द्यायला तयार असलेला , चारित्र्याला / ऑनरला प्राणांपेक्षाही जास्त महत्व देणारा नेड स्टार्क , बालिश रोमँटिक कल्पनांनी भारलेली सान्सा , छोटेसे आर्या आणि ब्रॅन , बास्टर्ड म्हणून मनात सल असलेला जॉन , भावाच्या स्वार्थापायी खाल ड्रॉगोशी लग्न करावं लागलेली पण नवऱ्याला प्रेमाने जिंकून घेऊन स्वतःचं सामर्थ्य वाढवलेली डॅनी या सगळ्यांमध्ये मन गुंतत गेलं , त्यांचं पुढे काय होतं नि काय नाही याची हुरहूर लागली ... शिवाय कथानक इतकं जबरदस्त खिळवून ठेवणारं आहे की न्यूडीटी सारख्या गोष्टी क्षुल्लक वाटू लागल्या , त्या खटकेनाशा झाल्या ... नजर मेली . त्यात काय आहे एवढं असं वाटू लागलं ... राणीच्या आणि जॉफ्रीच्या क्रूर आणि दुष्ट वर्तनामुळे त्यांच्याबद्दल राग निर्माण झाला , राणीचं वैयक्तिक आयुष्य ही तुलनेने क्षुल्लक बाब वाटू लागली ... 67 एपिसोड 10 - 15 दिवसात संपवले , तेही त्यावेळी डेटा पॅक फक्त डेली 1 जीबीचा होता म्हणून नाहीतर त्याहीपेक्षा कमी वेळात संपवले असते . एकदा कथानकात काय चालू आहे नक्की याची आपल्याला नीट ग्रिप आली की एक एपिसोड पाहिल्यानंतर पुढे काय घडतं याची अनिवार उत्सुकता पुढचा एपिसोड पाहायला भाग पाडते .

जव्हेरगंज, कृपया टाळू नका. एक अप्रतीम महान गाथा रचलीये मार्टिनऋषींनी. एक सिझन पूर्ण पहाच.

श्वेता२४'s picture

14 Feb 2019 - 12:31 am | श्वेता२४

आणि कळेल असं. हि मालिका मी बघण्याची अजिबात शक्यता नाही. तुम्ही याची किचकट स्टोरी पूर्ण लिहा. अँच्यासारख्याना कळेल तरी हे काय प्रकरण आहे. लिखाणाला तुम्ही खूप कष्ट घेतलेत त्याबद्दल धन्यवाद

nishapari's picture

14 Feb 2019 - 1:28 am | nishapari

धन्यवाद :)

किसन शिंदे's picture

14 Feb 2019 - 12:55 am | किसन शिंदे

बरोब्बर दोन महिन्यांनी आठवा आणि शेवटचा सिझन येतोय. त्यापूर्वी पुन्हा एकदा पाहावी म्हणून आत्ता सध्या तिसऱ्यांदा पारायण करतोय. रविवारपासून आत्तापर्यंत पहिले तीन सिझन संपवलेत, आणि बहुधा पुढच्या आठवड्यापर्यंत सगळे सातही पाहून होतील. ज्यांनी ही मालिका पाह्यलेय, पण त्यातल्या इंग्रजीमुळे त्यांना तितकीशी कळाली नाही त्यांच्यासाठी तुमचा हा लेख म्हणजे मेजवानी ठरेल.

धन्यवाद :) ऍक्सेंट मलाही कळत नाही , मी सगळे एपिसोड सबटायटल वापरून पाहिले .. इंग्रजी फारसं कठीण नाही आहे . गेम ऑफ थ्रोन्स ज्या पुस्तक-मालिकेवर आधारित आहे त्यातलं पहिलं पुस्तक वाचायला घेतलं आणि 50 पानातच दमछाक झाली ते सोडून दिलं तेवढ्यातच... जटील भाषा आहे , ऍडव्हान्सड इंग्लिश , मलातरी अजून झेपण्यासारखी नाही . त्यामानाने मालिकेतील इंग्रजी अगदी सोपी आहे , सगळ्या देशातील थोडीफार इंग्रजी समजणाऱ्यांना व्यवस्थित समजेल असेच डायलॉग तयार केले आहेत .. तुम्ही याआधी सबटायटल वापरले नसल्यास एक एपिसोड सबटायटल वापरून पहा , खूप फरक जाणवेल .

किसन शिंदे's picture

14 Feb 2019 - 7:30 pm | किसन शिंदे

प्रत्येक वेळी मी सबटाईटल्स वापरून पाहिली आहे. बर्यापैकी कळतंच.

संजय पाटिल's picture

17 Feb 2019 - 3:28 pm | संजय पाटिल

इथे काही हिंदी मध्ये डब केलेले सिजन आहेत....
बाकिचे इंग्रजी मध्ये आहेत!!!

लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट's picture

14 Feb 2019 - 10:16 pm | लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट

मालिका पहिली असेल तर पुस्तकही एकदा वाचून पहा...ज्या पद्धतीने पात्रे बारीक तपशील देऊन रंगवली आहेत त्याला तोड नाही....

कंजूस's picture

15 Feb 2019 - 9:38 am | कंजूस

या लेखामुळे गोष्ट फार गुंतागुंतीची आहे एवढं कळलं.
हा चानेल नसल्यास पाहण्याची सोय नाही.

एवढा इतिहास कुणाच्या लक्षात राहतो का?

हॉट्स्टार प्रिमिअमवर पाहता येईल. किंवा इतर इल्लिगल स्रोत चालणार असतील तर नेटवर ढिगाने मिळतील.

मालिका पाहिल्यावर लक्षात राहणं सहज शक्य आहे .. मुद्दाम ठरवून काही लक्षात ठेवावं लागत नाही , स्टोरी आहे ती ... आपोआप लक्षात राहते . सध्या चॅनेल वर इंग्रजी मालिका बघणारे फार कुणी असतील असं वाटत नाही . एकतर नेटफ्लिक्स व तत्सम इतर सुविधा वापरून बघतात .. किंवा सरळ डाउनलोड करून बघतात . मला वाटतं नेटफ्लिक्स पीसी / लॅपटॉप वरही चालत असावं , बहुतेक वापरणारे लोक स्मार्ट टीव्हीवर नेटफ्लिक्स घेतात . त्याचा खर्च महिना 650 ते 800 इतपत असतो .. त्याव्यतिरिक्त त्याला डेटा भरपूर लागतो , तासाला 1 ते 3 जीबी .. हे लोक नक्की कुठला ब्रॉडबँड / वायफायने चालणारा डेटा प्लॅन वापरतात आणि किती खर्च येतो याबद्दल मला काही माहिती नाही .

स्वस्तातला मार्ग म्हणजे एपिसोड डाउनलोड करून बघणे .. माझ्या 480 महिना च्या नेटपॅक मध्ये डेली 3.20 जीबी डेटा मिळतो .. मी टॉरेंट वरून एपिसोड डाउनलोड करते , एका एपिसोडची साईझ कमीतकमी 200 ते 40-500 mb असते , बऱ्यापैकी हाय डेफिनेशन क्वालिटी मध्ये . सिरियल पिक्चरच्या बाबतीत लीगल इल्लीगलचा विचार मी करत बसत नाही ... 5 - 6 वर्षं टॉरेंटच वापरते आहे .

पीसी आणि ब्रॉडबँड कनेक्शन असेल तर त्यावर डाउनलोड करू शकता , तिथे सेव्हही करून ठेवता येतात , नंतर कधीतरी परत पाहण्यासाठी . किंवा मोबाईलवर डाउनलोड केलेत तर माझ्या नेटपॅकप्रमाणे 3 जीबी मध्ये 4 - 5 एपिसोड सहज डाउनलोड होतात . 1 जीबी डेली असेल तर किमान 2 तरी होतातच . 5 - 6 इंचाच्या मोबाईल स्क्रिनवर पाहताना काहीही त्रास झाला नाही . किमान 4 - 5 मालिकांचे मिळून 500 - 600 एपिसोड मी मोबाईल वरच पाहिले आहेत . पीसीपेक्षा फारसा फरक जाणवला नाही . फक्त मोबाईल मध्ये पाहून झाल्यावर डिलीट करावे लागतात , पुढचे एपिसोड डाउनलोड करण्यासाठी जागा व्हावी यासाठी . पीसी असेल तर तुम्ही मोबाईल मध्ये डाउनलोड झालेले एपिसोड त्यात ट्रान्सफर करू शकता यूएसबी केबल वापरून .

मधुरा कुलकर्णी's picture

14 May 2019 - 2:05 pm | मधुरा कुलकर्णी

चॅनल उपलब्ध असणे नसण्याचा काय फारसा संबंध नाही ...

क्रोम वर index of ... सीरिज च नाव न सिझन टाका डाऊनलोड लिंक्स मिळतील तुम्हाला ...
पण मी पण ही सीरिज कधी पाहिली नाहीय ...
N हा लेख वाचून avd कळलय की खूप किचकट आहे ...

असो एखादा सिझन पाहण्याचा प्रयत्न करेन

प्रशांत's picture

15 Feb 2019 - 1:18 pm | प्रशांत

उजळणी झाली

nishapari's picture

15 Feb 2019 - 6:23 pm | nishapari

धन्यवाद :)

पुजारी's picture

15 Feb 2019 - 3:43 pm | पुजारी

पुस्तके वाचाच.. पुस्तकातलं अगदी ढोबळ ढोबळ असलेलं सिरीज मध्ये दाखवलंय .

हे अगदी हॅरी पॉटर सारखंच झालं

धागालेखक जी .. अहो तुम्ही पार्श्वभूमी म्हणता म्हणता पहिले काही भागच लिहले =))
विनन्ती अशी कि त्या त्या घराण्याचे उगम पण लिहिता आले तर पहा कि , तेवढाच फायदा वाचकांना !

पुस्तकं वाचण्याची इच्छा आहे पण मालिकेतील इंग्रजी खूप सोपी होती ... पुस्तक वाचताना पूर्ण एकाग्रतेने ओळ न ओळ वाचावी लागते , तेव्हा कुठे अर्थ लागतो , अनेक शब्दांचे अर्थ समजत नाही ... अद्याप माझं इंग्लिश पुस्तकं वाचता येईल एवढं चांगलं नाही , पुढे हळूहळू सुधारेल अशी आशा आहे , तेव्हा वाचेन नक्की.

पुजारी's picture

15 Feb 2019 - 4:01 pm | पुजारी

बारीक विनंती कि , यात व्हाईट वॉकर्स , नाईट किंग इ चा उल्लेख राहिलाय . तो आवश्यक अशासाठी कि सिरीज मध्ये देखील पहिल्याच भागात , खरंतर सिरीज सुरुवातच व्हाईट वॉकर च्या हल्ल्याने झालेली दाखवली आहे आहे .

हो . पुढच्या भागात लिहिते .

विनिता००२'s picture

15 Feb 2019 - 4:24 pm | विनिता००२

राजे रजवाड्यांच्या मालिका मला आवडतात. तुमचा लेख वाचून उत्सुकता निर्माण झाली. :)

नक्की पाहिन ही मालिका!! ओघवते व उत्कंठावर्धक लिहीलेत त्याबद्दल धन्यवाद __/\__

nishapari's picture

15 Feb 2019 - 6:25 pm | nishapari

धन्यवाद :)

विनिता००२'s picture

15 Feb 2019 - 4:25 pm | विनिता००२

सुरुवातीचे प्रसंग मला कळले नाहीत. ते तिघे बर्फाळ भिंत ओलांडून बाहेर पडतात, मग तिथे भूते असतात का?

एक अॅप टॅारेक्स फॅार बिट् टॅारेंट मोबाइलात घेतलय पण त्यात एपिसोडची लिंक टाकायची आहे. सर्च वेब >> तिथून एक कॅापी केली ती इनवॅलिड मेसेज आला.
आइस्क्रीमच्या फ्लेवर्सपेक्षा जास्ती आहेत टॅारेंटात.

हे कुठलं म्हणत आहात ते माहीत नाही . युटॉरेंट आणि बिटटॉरेंट ही 2 ऍपच सर्वाधिक वापरली जातात . तुम्ही कॉम्प्युटर वर करत आहात की मोबाईल वर ? कॉम्प्युटर वर करत असाल तर या साईटवरून विंडोज किंवा जी कुठली सिस्टीम असेल त्यासाठीचा ऑप्शन शोधून इन्स्टॉल करा , इथे विंडोज साठीची लिंक देत आहे -

https://www.utorrent.com/downloads/win

मोबाईल वापरत असाल तर प्लेस्टोअर वर आहे . टॉरेंट साठी मी सध्या पायरेटप्रोक्सि डॉट बेट ही साईट वापरत आहे , ती डेस्कटॉप मोड मध्ये ओपन करा , सगळ्यात जास्त सीडर्स आणि लीचर्स असलेले टॉरेंट समोर येतील , त्यातून हवं ते सोयीप्रमाणे निवडा . लिंक इथे दिली असती पण अलौड आहे की नाही माहीत नाही , कॉपीराईट भंग म्हणून कदाचितइश्यूज होतील अशी भीती वाटते .

हे कुठलं म्हणत आहात ते माहीत नाही . युटॉरेंट आणि बिटटॉरेंट ही 2 ऍपच सर्वाधिक वापरली जातात . तुम्ही कॉम्प्युटर वर करत आहात की मोबाईल वर ? कॉम्प्युटर वर करत असाल तर या साईटवरून विंडोज किंवा जी कुठली सिस्टीम असेल त्यासाठीचा ऑप्शन शोधून इन्स्टॉल करा , इथे विंडोज साठीची लिंक देत आहे -

https://www.utorrent.com/downloads/win

मोबाईल वापरत असाल तर प्लेस्टोअर वर आहे . टॉरेंट साठी मी सध्या पायरेटप्रोक्सि डॉट बेट ही साईट वापरत आहे , ती डेस्कटॉप मोड मध्ये ओपन करा , सगळ्यात जास्त सीडर्स आणि लीचर्स असलेले टॉरेंट समोर येतील , त्यातून हवं ते सोयीप्रमाणे निवडा . लिंक इथे दिली असती पण अलौड आहे की नाही माहीत नाही , कॉपीराईट भंग म्हणून कदाचित इश्यूज होतील अशी भीती वाटते .

टॉरेंटचं पान उघडल्यावर मध्ये मॅग्नेटचं लहानसं चिन्ह दिसेल 2 ठिकाणी , वर एकदा आणि खाली एकदा .. त्याच्यासमोर गेट मॅग्नेट लिंक असं लिहिलेलं असेल , त्यावर क्लिक केलं की तिथून युटॉरेंट किंवा बिटटॉरेंट ऍप मध्ये फाईल ओपन होईल .

गेट धीस टॉरेंट असं हिरव्या रंगाच्या लिंक मध्ये असतं , मॅग्नेट लिंक मध्ये .

कपिलमुनी's picture

15 Feb 2019 - 8:29 pm | कपिलमुनी

लेखाच्या सुरुवातीला स्पॉयलर अलर्ट टाका ही णम्र ईनंती

कंजूस's picture

15 Feb 2019 - 8:44 pm | कंजूस

धन्यवाद.
मोबाइल (विंडोजचे) अॅप आहे. फुंकुंन पीत आहे. अॅपमधून जेवढे होईल तेवढे करेन, साइटबद्दल साशंक असतो.
पण उत्सुकता वाढत आहे.

प्लेस्टोअर वर यूटॉरेंट आणि बिटटॉरेंट ही ऍप आहेत , ती टॉरेंट डाउनलोड साठी सर्वाधिक प्रमाणावर वापरली जातात , ऑफिशियल , नामांकित कंपनीची आणि सेफ आहेत . फक्त ब्राउजर मध्ये टॉरेंट साईट वापरताना काही वेळा पॉप अप्स , कुठल्यातरी साईट ओपन होतात , त्या धोकादायक असण्याची शक्यता असते , त्या पटकन बंद करून टाकायच्या ..क्वचित कधीतरी चटकन बंद होत नाहीत त्यावेळी सगळ्या विंडो बंद करून ब्राऊजरमधून बाहेर पडायचं . मी किमान 2 वर्षं वापरते आहे , व्हायरसवगैरे चा काहीही प्रॉब्लेम झालेला नाही . वर जी पायरेट प्रोक्सि डॉट बेट साईट सांगितली आहे तिच्यात तर असले पॉप अप्सही येत नाहीत तेव्हा ती 100 % सेफ आहे .

या सिरीयल ची पंखा आहे. वाटच बघत्ये एप्रिल ची. मराठीतून वाचताना छान वाटतंय. अगदी तपशीलवार लिहिलंय

चांदणे संदीप's picture

16 Feb 2019 - 7:47 am | चांदणे संदीप

पार्श्वभूमी म्हणता म्हणता संपूर्ण सात सीजन उतरवले तुम्ही. वर प्रतिसाद इतके मोठे मोठे लिहिलेत की अजून दोन-चार वेगळे लेख झाले असते त्यात. काही लहनसहान तपशील राहिलेत आणि घटनाक्रमही मागेपुढे झालाय. मुळात, पार्श्वभूमी म्हणता येईल असा हा लेख नाही. असो, जे लिहिलंय ते चांगलच झालंय आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या चाहत्यांना नक्की आवडेल.

गेम ऑफ थ्रोन्स माझी ब्रेकिंग बॅड नंतरची अतिशय आवडती सिरीज आहे. इतकं सगळं वाचून उजळणी झाली.

Sandy

nishapari's picture

16 Feb 2019 - 9:55 am | nishapari

हो , बरोबर आहे .. तपशील राहिलेत , घटनाक्रम मागेपुढे झालेला असू शकतो . ब्रेकिंग बॅड मी इथे मिपावरच तिचं कौतुक वाचून पाहिली .. जवळपास सगळे सिजन पाहिले , शेवटचे 2 एपिसोड मात्र नाही पाहिले .. मनुष्यस्वभावाचं चित्रण , वास्तवदर्शी चित्रण वगैरे सगळे गुण लक्षात घेऊनसुद्धा आवडली नाही ... मालिका ग्रेटच आहे निर्विवाद कलात्मक मूल्य लक्षात घेता पण शेवटी शेवटी इतकी निराश दुःखद शेवटाकडे गेली की पाहवेनाच माझ्याने ... शेवटच्या सिजनमध्ये अगदी लहान घटनांच्या तोलावर पुढचं सगळं भवितव्य बदलतं .. बौद्धिक आनंदापेक्षा मानसिक त्रास झाला ते सगळं बघून . बौद्धिक आनंदही मिळाला मालिकेतून नाही असं नाही पण डोक्याला तापाचं पारडं जड झालं . शिवाय खुद्द मुख्य पात्र वॉल्टबद्दलची सहानुभूती बऱ्याच प्रमाणात कमी होत गेली , तरी तो आणि त्याचं कुटुंब आणि जेस्से यांना यापुढे शांतपणे सुखात राहता यावं ही इच्छा होती , भयंकर अपराधबोधाच्या भावनेने ग्रासलेला जेस्से सगळ्या सेटल झालेल्या परिस्थितीची माती करायला कारणीभूत होतो आणि हँकचा वॉल्टला शिक्षा करण्याचा अट्टाहास ... जेस्सेला त्याच्याविरुद्ध भडकवण्यात आणि त्याचा वापर करून त्याला मिळालेलं यश हे सगळं पाहताना त्रास झाला , शेवटचे एपिसोड पाहावेसेही वाटले नाहीत .. सुरुवातीच्या काळात स्कायलरने नवऱ्याचा बेकायदेशीर गुन्ह्यातला सहभाग समजल्यावर जी प्रतिक्रिया दिली ती मला वैयक्तिकरित्या आवडली नाही , प्रेमविवाह , 16 - 17 वर्षांचा संसार असताना 15 वर्षांचा मुलगा असताना नवरा बायकोतले संबध दृढ असायला हरकत नव्हती , शिवाय मोडकळीला आलेली आर्थिक परिस्थिती , कॅन्सर , सेरेब्रल पाल्सी असलेला मुलगा आणि येऊ घातलेलं बाळ या सगळ्या परिस्थितीमुळे नवऱ्याने हा मार्ग स्वीकारला असेल हे समजून घेण्याचाही तिने प्रयत्न केला नाही ... एवढ्या वर्षांचं प्रेम बिम शेवटी तकलादू निघालं .. पुढे त्यांचे बिघडलेले संबंध , तुझा कॅन्सर परत येण्याची मी वाट पाहते आहे असं सांगणं ...

एकूण ही सिरिअल पाहायला निवडण्याचा मला पश्चातापच आहे , नसती पाहिली तरी काही बिघडणार नव्हतं . :(

चांदणे संदीप's picture

16 Feb 2019 - 10:10 am | चांदणे संदीप

चालायचचं!

Sandy

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Feb 2019 - 5:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

सध्या वेंजॉयिंग तुपारे आहे.
पैजारबुवा,

विनिता००२'s picture

25 Mar 2019 - 4:24 pm | विनिता००२

तुमचा लेख वाचून गेम ऑफ थ्रोन्स पहात आहे. काही सीन्स सोडले तर आवडतेय :)

आवडती पात्रे म्हणजे नेड स्टार्क, जॉन, आरीया, टिरीयन, कॅटलिन, डॅनिरस व तिचे ड्रॅगन :) रॉब, स्टार्केचे विश्वासू सहकारी!

हाउंड चे पात्र अजून तितके लक्षात आले नाही. बेलिफ पक्का दलबदलू आहे.

जेम्स वांड's picture

28 Mar 2019 - 2:33 pm | जेम्स वांड

बेलीफ नाय हो बेलीश, पीटर बेलीश उर्फ लिटिलफिंगर

mrcoolguynice's picture

25 Mar 2019 - 5:38 pm | mrcoolguynice

२१ व्या शतकातील आधुनिक महाभारत आहे , गेम ऑफ थ्रोन्स

तिमा's picture

18 May 2019 - 6:20 am | तिमा

गेम ऑफ थ्रोन्स ची कथा जरी महाभारताइतकी गुन्तागुंतीची असली तरी त्याची तुलना महाभारताशी योग्य वाटत नाही. महाभारतात, एक द्रोपदी वस्त्रहरण सोडलं तर जी किमान सभ्यता पाळली आहे तशी यात नाही. अतिशय रानटीपणाचे सेक्स संबंध, बायकांविषयी असभ्य भाषा, हे त्यावेळेच्या परिस्थितीला धरुन असेलही, पण महाभारताची भव्यता आणि धर्माचरणाचा आग्रह इथे फार कमी दिसतो.
हे फक्त तुलनेबद्दल आहे. स्वतंत्रपणे बघायला गेलं तर मालिका आवडण्यासारखीच आहे. उत्तम संवाद, मानवी स्वभावातील हिंस्र प्रवृत्ती आणि चांगल्या प्रवृत्तींचे बारकाईने चित्रण आहे. एकदा बघायला सुरवात केली, तर तुम्ही सोडू शकत नाही.

जेम्स वांड's picture

28 Mar 2019 - 2:34 pm | जेम्स वांड

स्टार वर्ल्ड वर एअर होणार का?

काय वांडोबा, कुठं गायब होतात?

जेम्स वांड's picture

28 Mar 2019 - 4:41 pm | जेम्स वांड

जरा कामात होतो, अजूनही एखाद महिना हाच सीन. तीन प्लॉट टकुऱ्यात येऊन कापरावाणी उडून गेले , बघू आता लवकरच परत लेखनानंद घेता आला तर.....

प्रचेतस's picture

28 Mar 2019 - 5:10 pm | प्रचेतस

सक्रिय व्हा भो परत.

जेम्स वांड's picture

28 Mar 2019 - 6:03 pm | जेम्स वांड

शिरसावंद्य !

हॉटस्टारवर अनकट बघायला मिळेल.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

30 Mar 2019 - 5:57 pm | घाशीराम कोतवाल १.२

माझ्याकडे पहिले दोन सिजन चे सगळे भाग आहेत
पुधील सिजन चे लिन्क अस्तील तर द्या हिन्दि मध्ये

श्रीरंग's picture

3 Apr 2019 - 10:45 pm | श्रीरंग

* कथेशी अत्यंत प्रामाणिक राहून ही मालिका बनवली आहे. उगाच "प्रेक्षकांना हेच आवडतं"असल्या गोंडस थापा मारून ठराविक व्यक्तिरेखांना जास्त फुटेज देणे वगैरे थिल्लरपणा केलेला नाही. काही प्रमुख पात्रांना तर कथेला कलाटणी देताना अचानक मारलंय. हे धाडस याच मालिकेत पाहायला मिळेल. रेड वेडिंग, पर्पल वेडिंग बघून तर अवाक व्हायला होतं.

*भरपूर पात्रांची जंत्री असूनही कथेची वीण फारच सुंदर जमवली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला व्यवस्थित न्याय दिला आहे. पहिल्या सीझनपासून फक्त "होडॉर" एवढेच बोलणार्या पात्राबद्दल थेट सहाव्या सीझनमध्ये जो गौप्यस्फोट दाखवलाय, तो केवळ अप्रतिम. तो प्रसंग पाहून न हळहळण शक्यच नाही.
* जबरदस्त व्यक्तिचित्रण. जेमीचा character ग्राफ म्हणजे टेलिव्हिजन इतिहासातील सर्वोत्तम लिखाणापैकी एक असावा. पहिल्या एपिसोडमध्ये "प्रेमासाठी वाट्टेल ते" या सबबीखाली लहान पोराचा जीव घेऊ पाहणारा जेमी, ते नंतर स्वतःचा जीव धोक्यात घालून, चतुराईने ब्रिएनला वाचवणारा, प्रजेच्या रक्षणासाठी स्वतःच्या कर्तव्याशी प्रतारणा करून अवहेलनेच धनी झाल्याचे शल्य मनात बाळगणारा, सतत हेटाळणी झालेल्या लहान भावासाठी खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा, सत्तांध सरसीमुळे हताश होऊन किंग्स लँडिंग सोडून जाणारा जेमी लाजवाब. या लेखनाला साष्टांग दंडवत. अवखळ खेळकर मुलीपासून ते अत्यंत खतरनाक assasin, थंडपणे आपल्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेणाऱ्या आर्याचा प्रवास पण असाच थक्क करणारा.

आता फक्त शेवटचे 6 भाग राहिलेत ही अस्वस्थता शेवटचा सीझन सुरू होण्यापूर्वीच वाटणे, हेच या मालिकेचे सर्वात मोठे यश होय.

विनिता००२'s picture

4 Apr 2019 - 4:38 pm | विनिता००२

सहमत !!

जेमीचा सुरुवातीला राग येत राहिला तरी नंतर त्यातला माणूस अजून जिवंत आहे हे जाणवायला लागले. :)

आरिआ बद्द्ल काय लिहू....अजाण, निष्पाप पोर...वडीलांना जिवंत करण्याबद्दल ती जेव्हा विचारते, अश्रू आवरत नाहीत :(

याआधीही गेम ऑफ थ्रोन्स बद्दल ऐकले होते , पण मिपावरील हा लेख वाचून उत्सुकता चालवली आणि या मालिकेचे सर्व भाग १२ दिवसात संपवून नवीन सीझनचा पहिला एपिसोड आज बघितला. वरील लेखामुळे सर्व एपिसोडस समजण्यास सोपे झाले.

विंटरफेल
आजच्या भागात सर्व सैन्य विंटरफेलमध्ये जमा होत आहे. डोथ्राकी, अनसुलीड, जॉन, डॅनेरिस तिच्या ड्रॅगनसहित विंटरफेलमध्ये प्रवेश करतात. ड्रॅगन पाहून विंटरफेलची जनता घाबरते. आर्या आणि जॉन यांची भेट होते. सॅमवेल टार्लीही विंटरफेलमध्ये पोहचतो. डॅनेरिस आणि जोराह, सॅमला भेटतात. डॅनेरिस सॅमची प्रशंसा करते, त्याचवेळेस त्याला त्याच्या वडिलांची आणि भावाची मृत्यूची बातमीदेखील सांगते. तो प्रसंग डोळ्यात पाणी आणतो.
ब्रान सांगतो की ईस्टवॉचला खिंडार पडले असून डॅनेरिसच्या ड्रॅगनला नाईट किंगने पुर्नजीवित करुन त्यावर ताबा मिळवला आहे.
जॉन आणि डॅनेरिस ड्रॅगनवर रपेट करतात. नंतर ब्रान सॅमला सांगतो की जॉनला त्याचा जन्माचा सत्य सांगायची वेळ आली आहे आणि सॅमला ती जबाबदारी देतो. सॅम जॉन तळघरात एकटेच असताना त्याच्या जन्माचे रहस्य उघड करतो, परंतु आधी जॉनचा विश्वास बसत नाही तेव्हा सॅम त्याला सांगतो की त्याने सिटाडेलमधे ग्रंथालयातील जुन्या नोंदीत त्याने वाचले आहे.
जेमी विंटरफेलमध्ये प्रवेश करता होतो आणि समोर खुर्चीमध्ये ब्रान असतो.

किंग्स लॅण्डिंग्स (राजधानीत)
ईस्टवॉच व्हाईट वॉकरने नष्ट केल्याची बातमी कायबर्न सर्सीला सांगतो त्यावर ती स्मितहास्य करते. युरोण ग्रेजॉय, गोल्डन कंपनीचा कंमाडर हॅरी स्ट्रीकलँड सोबत आणि २०००० सैनिकांसहित येतो, परंतु हत्ती नसल्यामुळे सर्सी नाराज होते. कायबर्न जोफ्रीचा क्रॉसबो ब्रॉंनला देतो आणि टीरियन, जेमीला मारायची राणीची आज्ञा सांगतो. थियॉन ग्रेजॉय, युरोण ग्रेजॉयच्या जहाजावर येऊन यार ग्रेजॉयची मुक्तता करतो. थियॉन विंटरफेलला जाऊन स्टार्क कुटुंबाची मदत करण्याचे ठरवतो आणि यारा आयर्न बेटांवर जाऊन तेथील ताबा मिळवण्याचे ठरविते.

श्रीरंग's picture

15 Apr 2019 - 8:32 pm | श्रीरंग

Spoilers ahead..

वरकरणी जरी आजच्या भागात विशेष काही घडले नाही असे वाटत असेल, तरी काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी घडल्या..

१. जॉन ड्रॅगनवर आरूढ झाला ही अत्यंत महत्वाची घटना आहे. ड्रॅगनला काबू मध्ये फक्त Targaryen वंशातील लोकच ठेवू शकतात हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे जॉनला ड्रॅगनवर बसलेले पाहून टीरिअन आणि वेरीस यांना तरी त्याच्या बद्दल नक्कीच अंदाज आला असेल.
२. आपल्या जन्माचे रहस्य उलगडल्यावर जॉनची चांगलीच गोची झाली असणार. थेट सिंहासनावर दावा सांगता येईल, त्याने उत्तरेकडील हौसेस परत पंखाखाली आनंदाने येतील, पण डेनेरीसबरोबरच्या संबंधाबद्दल वाच्यता करता येणार नाही. (डेनेरीसला पुढे गचकवले तर सर्वांचेच काम सोप्पे होईल).
३. ब्रॅन "जुन्या मित्राची" वाट पाहत असल्याचे सांगतो, तेव्हा आपल्याला आधी वाटतं तो सॅमबद्दलच बोलत असावा. शेवटी जेमी त्याच्यासमोर आल्याचा प्रसंग अफलातून जमून आलाय.

जॉन - आर्यांची भेट, जॉनची स्वतःच्या जन्माचं रहस्य समजल्यावरची प्रतिक्रिया, हे जास्त उत्कट/ नाट्यमय घेता आलं असतं असं वाटतंय. असो. पुढील 5 भागात काय घडतंय याबद्दल औत्सुक्य कायम आहे.

चांदणे संदीप's picture

16 Apr 2019 - 11:22 am | चांदणे संदीप

पण डेनेरीसबरोबरच्या संबंधाबद्दल वाच्यता करता येणार नाही.

काहून भौ? त्यांच्यात चालतंय की!

जॉन - आर्यांची भेट, जॉनची स्वतःच्या जन्माचं रहस्य समजल्यावरची प्रतिक्रिया, हे जास्त उत्कट/ नाट्यमय घेता आलं असतं असं वाटतंय.

याच्याशी बाडीस. :)

Sandy

काहून भौ? त्यांच्यात चालतंय की!

{मै जानता हूं, की रिव्हाल्वरमें गोली नही हैं, तुम जानती हो, की रिव्हाल्वरमें गोली नही हैं.......
लेकिन पुलिस नही जानती की रिव्हाल्वरमें गोली नही हैं....... }

च्या धर्तीवर ...

जॉन जानता हैं, की वो "टारगेरीयन + स्टार्क" हैं, डिनेरिसजानती हैं, की जॉन "टारगेरीयन + स्टार्क" हैं.......
लेकिन जमाना नही जानता की वो "टारगेरीयन + स्टार्क" हैं.......

जमानेके हिसाबसे वो किंग इन नॉर्थ मटेरियल हैं ...

चांदणे संदीप's picture

14 May 2019 - 3:23 pm | चांदणे संदीप

जमान्याला सांगणारचं ते आता.

असो, आर्या आयर्न थ्रोन वर बसली तर! असा एक आर्याचा डाय हार्ड फ्यान या नात्याने विचार मनात आला.

आणि डॅनीबै ने आपल्यातला ड्रॅगन बाहेर काढला ते खूपच दुर्दैवी होतं. :(

Sandy

मी पुढ़चा एपिसोड पाहिला आहे,
पण स्पॉयलर नको महनुंन गप हाय...म्या

चांदणे संदीप's picture

14 May 2019 - 5:08 pm | चांदणे संदीप

लिंक द्या, पि...ली...ज्य!
:)

Sandy

mrcoolguynice's picture

14 May 2019 - 5:34 pm | mrcoolguynice

व्यनि तपासा

चांदणे संदीप's picture

14 May 2019 - 7:17 pm | चांदणे संदीप

धन्यवाद!

नोव यौर तुर्न तो चेक्क.

Sandy

प्रसाद_१९८२'s picture

16 Apr 2019 - 10:27 am | प्रसाद_१९८२

GOT चे या आधीचे सर्व सिझनचे एपिसोड हिंदीमधे पाहायला मिळतात का इंटरनेटवर ?

एमी's picture

9 May 2019 - 5:17 am | एमी

छान लिहलंय.
मी नुकतंच (इस्टर रविवारपासून) ही मालिका पहायला सुरवात केली. आतापर्यंत ३ सिझन बघून झालेत. पहिला सिझन बघत असताना याची एवढी हाईप का झालीय कळत नव्हतं. दुसरा सिझन पाहिल्यावरतर आपल्याला हेकाही आवडणार नाही असे वाटू लागले होते (नग्नता, हिंसा, सेक्स, इन्सेस्ट हे न आवडण्यामागचे कारण नव्हते). पण तिसरा सिझन बऱ्यापैकी आवडला.
पुढे बघू काय होतंय.
मालिका पुस्तकांच्या पुढे गेली तेव्हापासून पीपलप्लिजर झाली आहे असे म्हणतात. ते काही अंशी खरे आहे असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2019 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या काही ओळी वाचल्या आणि मग पास.
आमची पिढी मागे राहिलीय. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

विनिता००२'s picture

18 May 2019 - 10:51 am | विनिता००२

माझे ५ सीझन बघून झाले. राजकारण भयानक आहे. आवडतेय मालिका :)

आठव्या सिजनने प्रेक्षकांची भयंकर निराशा केली आहे , आधीच्या सिजन्सशी तुलना करता अगदीच उथळ रायटींग आहे .. सगळ्या कॅरॅक्टर्सनी आपल्या कॅरॅक्टरशी विसंगत वर्तन करताना दाखवलं आहे .. संपूर्ण सिजनच दुसऱ्या लेखकांनी लिहिलेली कथा वापरून परत बनवावा असं एक पिटीशन पाचव्या एपिसोड नंतर चेंज.ऑर्ग या साईटवर निर्माण करण्यात आलं आहे , त्यावर 10 लाखाहून अधिक लोकांनी साईन केलं आहे .

खरोखर सिजन पुन्हा बनविला जाण्याची शक्यता फार कमी वाटते कारण एका एका एपिसोडला 40 - 50 कोटी रुपये खर्च येतो , भारतीय चलनात हिशेब काढला तर . पण लोकांचा हा आपली नाराजी एकसंघ समुहाच्या रूपातून दिग्दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे .

चांदणे संदीप's picture

19 May 2019 - 11:27 pm | चांदणे संदीप

एवढ्या लोकांनी साईन केलं म्हणजे लोकप्रियता सिद्धच झाली एकाप्रकारे. शिवाय, सामान्य प्रेक्षकांचा अपेक्षाभंग हा पहिल्या सीजनपासूनच चालत आलेली परंपरा आहे. नेड स्टार्कचा बळी हे उत्तम उदाहरण.

ऑर्ग ह्या साईटवर सह्या करणाऱ्यांचे मुद्दे कळाले असते तर बरं झालं असतं पण माझ्या मते, पाचव्या सीजनमध्ये बऱ्याच कॅरेक्टर्सनी जसे वागले ते तसे वागणे ही त्यांची नियतीच होती.
उदा.
जेमी / सर्सी = एक दूजे के लिए
हाऊंड / माऊंटन = एक दूजे के लिए
टिरियन = पहिल्यापासूनच एका चांगल्या राज्याच्या उभारणीसाठी प्रयत्नशील माणूस
लॉर्ड व्हॅरीस = डिट्टो
आर्या = नेव्हर वांटेड टू बी अ लेडी. ॲज सिम्पल ॲज दॅट.
डॅनेरियस = तिच्या ह्या वागण्यामुळेच जॉनला कारण मिळेल सिंहासन मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी
जॉन = रक्तातल्या दोन्ही चांगल्या तगड्या हाऊसेसचे गुण वेळेवेळी भाऊने दाखवलेच. डॅनीप्रती निष्ठा किंवा आयर्न थ्रोनचा तिटकारा हाही पहिल्याच पासून होता. कुटुंबाचीही काळजी होती म्हणूनच स्वतःच्या मस्तकाची पर्वा न करता भाऊ नाईट वॉच मधून एकदा मरायच्या आधी बाहेर पडलेला. इथेही त्याने फॅमिलीला महत्व देत आपल्या जन्माचे रहस्य त्यांच्यापाशी डॅनीचा रोष पत्करून उघड केलेच.
सान्सा = ह्या बै ला आधी अक्कल नव्हती पण जॉनचे गुपित सगळ्यात करून विंटरफेलला परत आल्यानंतरपासून कमावलेल्या शहाणपणावर तिने कळस चढवला.
ड्रॅगन = हां. ह्या गैबुकडे इतकी जास्त आग आणि चपळता कुठून आली अचानक, हा शोधाचा विषय होऊ शकेल.
अज्जून कोण राह्यलं?? राहू दे आता बाकीची दुनिया.

पुढच्या एपिसोडमध्ये काय वाढून ठेवतील ह्याबद्दल जबरदस्त उत्सुकता आहे.

GOT चा उन्हाळी cooler
Sandy

उद्या सकाळी साडेसहालाच बघा भो नैतर लै स्पॉयलर येऊन जातील.

चांदणे संदीप's picture

20 May 2019 - 12:19 am | चांदणे संदीप

आपला हुकूम डोक्याडोळ्यांवर. :)

Sandy

चांदणे संदीप's picture

20 May 2019 - 12:41 pm | चांदणे संदीप

म्या बघिटलो... आज्जून कोण हाय का?

Sandy

महासंग्राम's picture

20 May 2019 - 12:45 pm | महासंग्राम

म्या बी टिरीयन ने त्याचं वाक्य खरं केलं म्हणायचं

प्रचेतस's picture

20 May 2019 - 1:45 pm | प्रचेतस

लै निराशा केली शेवटच्या भागाने.

महासंग्राम's picture

20 May 2019 - 1:52 pm | महासंग्राम

जॉर्ज आर आर आबा मार्टिन यांच एक ट्विट आहे

Art is not a democracy. People don't get to vote on how it ends.
चांदणे संदीप's picture

20 May 2019 - 4:16 pm | चांदणे संदीप

Art is not a democracy. People don't get to vote on how it ends.

खरं आहे आबांचं.

मालिका संपली आहे, गोष्ट नाही.

गॉट चा जबरा फॅन
Sandy

महासंग्राम's picture

21 May 2019 - 1:54 pm | महासंग्राम

तिकडे लोक्स स्पॉयलर्स दिले म्हणून एकमेकांना शिव्या घालायचे आणि
इकडे आर आर मार्टिन आबांनी पूर्ण शो च स्पॉईल केला

किती काही झालं तरी हाऊस ऑफ कार्ड्स ची सर नाही म्हाराजा

महासंग्राम's picture

20 May 2019 - 10:57 pm | महासंग्राम

डेनेरियस मरताना जॉन स्नो ला काय म्हणाली असेल ?
.
.
.
.
.
.
.
.
कभी हम में तुम में भी चाह थी कभी हम से तुम से भी राह थी
कभी हम भी तुम भी थे आश्ना तुम्हें याद हो कि न याद हो
वो जो हम में तुम में क़रार था तुम्हें याद हो कि न याद हो
वही या'नी वा'दा निबाह का तुम्हें याद हो कि न याद हो

डेनेरियस मरताना जॉन स्नो काय म्हणाला असेल ?
.
.
.
.
.
.
.
.

जग हे भाजले अग्नीकुंडे अजि जरी

क्रोधउन्मादी मन तें तृषार्थ मजवरी

मिटता तव लोचन क्षणिक चुंबनापरी

मज-कट्यार काळजात घुसू दे तुझ्या महाराज्ञी

गेम ऑफ थ्रोन्सच्या फसलेल्या शेवटच्या सीजनमुळे आता ब्रेकिंग बॅड निर्विवादपणे प्रथम स्थानावर गेली आहे.