क्रिमिनल जस्टीस

Primary tabs

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
19 Apr 2019 - 9:42 am

सध्या कोणत्याही सिरीज मध्ये ड्रग्स, सेक्स पंकज त्रिपाठी यांची फोडणी मारली कि ती हमखास यशस्वी होते असा सिरीज बनवणाऱ्यांचा समज आहे. मग कथा कितीही कच्ची असो पंकज त्रिपाठी आहे ना तो हमखास अभिनयाच्या जोरावर सिरीज तारून नेतो. The Night Of चं भारतीय रूपांतर असलेल्या 'क्रिमिनल जस्टीस' या 'क्राईम-कोर्टरूम ड्रामा' मध्ये सशक्त कथा सोडून वरच्या तिन्ही गोष्टी आहेत. पण शेवटी जो धक्का दिलाय फक्त त्यासाठी हि सिरीज पहावी.

कॅब चालावणारा एक मुलगा त्याच्या कॅब मध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या मुलीचा फोन गाडीत राहतो म्हणून परत करायला जातो. तिथे ती त्याला घरात बोलवते, ते पार्टी करतात, ड्रग्स घेतात नंतर मुलाला शुद्ध येते तेव्हा त्याला मुलीचा खून झालेला दिसतो तो तिथून पळ काढतो आणि पोलिसांच्या तावडीत सापडतो. तिथून वकिलांनी केलेले त्याच्या सुटकेचे प्रयत्न, त्याचा जेल मधला प्रवास यांची म्हणजे क्रिमिनल जस्टीस.
सध्या इंटरनेटच्या मुबलक उपलब्धतेमुळे जगभरातला उत्तोमत्तम कंन्टेन्ट आपल्याला उपलब्ध झालाय. त्यात सिरीज बनवतांना अगदी बारीक गोष्टींचा पण विचार केला जातो आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला या गोष्टी पाहतांना लगेच जाणवत राहतात, उदा. 'शेरलॉक', 'सूट्स', ' पर्सन ऑफ इंटरेस्ट'. नेमक्या याच डिटेलिंगचा किमिनल जस्टीस मध्ये अभाव आहे. अगदी बारीक सारीक गोष्टी मध्ये लूपहोल सोडले आहेत, त्यामुळे पाहतांना थोडा विरस होतो. कोणत्याही आरोपीला पकडल्यानंतर त्याची सर्वात वैद्यकीय तपासणी होते, पुराव्यात सापडलेल्या वस्तू संशयित आरोपी कडे दिल्या जात नाहीत. बिल्डिंग मधल्या माणसाने वर वर केलेल्या वर्णनावरून खुनी म्हणून ड्रायव्हर ला पकडतात, त्याची उलट तपासणी पण घेतली जात नाही आणि कोर्ट सुद्धा मान्य करते. पण अख्या सिरीज मध्ये त्यातल्या एकाही पात्राला CCTV कॅमेरा फुटेज चेक करावं असं वाटलं नाही या गोष्टी कॉमन आहे. या सुद्धा त्यांना दाखवाव्या वाटू नये हे आश्चर्यचकित करणारं आहे. त्या ड्रायव्हर च्या फॅमिलीचा समांतर चालणारा ट्रॅक फक्त ८ चे १० एपिसोड करण्यासाठी घुसडला आहे असं वाटते.

असो, सिरीज पहायची असल्यास फक्त पंकज त्रिपाठीच्या 'माधव मिश्रा' साठी पहा.

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

19 Apr 2019 - 3:39 pm | विजुभाऊ

कशाला??????

अभ्या..'s picture

19 Apr 2019 - 6:04 pm | अभ्या..

एक पार्ट पाह्यला, पैसे मागतंय राव हॉटस्टार.
३६५ रु. वर्षाला. ट्याम्प्लीज म्हणलं मग. ;)

महासंग्राम's picture

22 Apr 2019 - 12:21 pm | महासंग्राम

अभ्या भौ टोरेंट अभि जिंदा है

लई भारी's picture

30 Apr 2019 - 4:59 pm | लई भारी

घरी लावली होती, जाता येता बघितली. आपण म्हटल्याप्रमाणे लूपहोल्स जाणवले आणि असंही वाटलं कि उगाच खूप ताणली आहे, लवकर संपवता आली असती. 'The Night Of' बद्दल नव्हतं माहित.
'पंकज त्रिपाठी' बद्दल अगदी सहमत :)