प्रतिशोध

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Jul 2019 - 6:08 pm

सुलभा ब्रह्मे नी कुलूप उघडले अन वस्ती गृहाच्या खोलीत प्रवेश केला
बारावीला टॉपर असलेली सुलभा न पुण्याच्या बी जे मेडिकल मध्ये प्रवेश घेतला होता
डॉक्टर होण्याचं मुख्य कारण म्हणजे समाज सेवा हे तिचे सुप्त ध्येय होत
-
२ दिवसांनी प्युन आला अन तिला एक फॉर्म दिला त्यात तिला तिची माहिती जसे नाव पत्ता फोन नंबर इत्यादी भरायला सांगितला व एच ऑ डी साने सरांची त्यावर स्वाक्षरी घेण्यास सांगितले
-
ती ते कागदपत्रे घेऊन सरांच्या ऑफिस मध्ये आली -
सर मे आय कमं इन ?
या - तिने ती कागद पत्रे साराच्या जवळ दिली व आदबीने उभी राहिली वाट पाहात
सरांनी ती वाचली व तिच्या कडे बघितले
त्यांची नजर तिच्यावरून फिरत होती
सुलभा दिसायला खूप सुंदर होती
अबोध असल्याने चे-यावर एक नैसर्गिक गोडवा होता
तिने सरांची नजर ओळखली व तिला भान आले
अंगावरून काहीतरी किळसवाणे अभद्र सरपटत आहे असे तिला वाटत होते
साने खुर्ची वरून उठले व तिच्या कडे येत म्हणाले कागद पत्रे ठीक आहे
तू खूप सुंदर आहे दिसायला सर म्हणाले
सुलभाला तो स्वर आवडला नाही
पण ती बोलली नाही
बोल ना काहीतरी असे साने म्हणाले अन तिला बाहुपाशात घेत तिच्यावर चुम्बना चा वर्षाव केला
त्यांच्या अश्या वागण्याने ती संतप्त झाले
सर हे काय करता आहात ? शोभते का तुम्हाला ?
साने नी ते न ऐकता तिला बाजूच्या खोलीत नेले अन अर्धा तास ते त्यांना हवे ते ओरबाडून मिळवत होते
ती रडत बाहेर आली
तू कितीही बोंब मारली तरी तुझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही
नॉव गेट आऊट ऑफ माय रूम
सुलभा संतापली होती
तिला सारे अनपेक्षित होते
ती अवाक होती तिला धक्का बसला होता
ती तशीच पळत पळत रुमी वर आली
-
तिला तो प्रसंग आठवला
अन तिच्या डोक्यात संतापाचा अग्नी पेटला
थोड्या वेळातच तो संताप अश्रू वाटे तिच्या डोळ्यातून ओघळू लागला
-
२-३ दिवसांनी प्युन एक नोटीस घेऊन तिच्या कडे आला
कारणे दाखवा नोटीस होती
गैरवर्तन -हॉस्टेल मध्ये मद्यपान आदी आरोप तिच्यावर करण्यात आले होते -व तिला भेटायला बोलावले असा निरोप दिला
ते वाचताच ती हादरली
कुठल्या तरी षड्यंत्रा त आपल्या अडकवण्याचा हा कट आहे हे तिला उमगले
तिला साने सरांना भेटायला सांगितले होते
काय होणार याची तिला कल्पना आली
सर आपण मला बोलावले -
साने सर काहीतरी वाचत होते त्यांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही
ब=याच वेळानी ते म्हणाले तुमच्या बाबत तक्रार आहे गैरवर्तन बाहेर मुलांना भेटले इत्यादी
सर ते सारे खोटे आहे -मी संस्कारी मुलगी आहे
ठीक आहे तुंला पंधरा दिवसासाठी हॉस्टेल मधून रस्टीकेट करत आहे -शोधा पुण्यात जागा वा नाशिक ला रवाना व्हा
हे ऐकताच ती हादरली आपल्या असाह्यतेची तिला जाणीव झाली
सर प्लिज असे करू नका माझे करियर बरबाद करू नका -तिने विनवणी केली
असं म्हणताय मग माझे ऐकणार ?
ती बोललीनाही सरांना काय पाहिजे ते तिला यांच्या नजरेतून कळले होते
त्याने तिला आतल्या खोलात नेले
अर्धा तास तो तिला ओरबाडत होता
*
ती रूम वर आली
डोळ्यात संताप होता
अवस्था असहाय होती
सारा संताप तिच्या डोळ्यातून अश्रू रूपे बाहेर पडला
त्यानंतर दोन अडीच महिने तिची व साने ची गाठ भेट नव्हती
*
त्या दिवसही तिला बरे वाटत नव्हते
तिला चेक केले गेले
तू प्रेग्नन्ट आहेस --नर्स तिला सांगत होती
तिच्या हातापायातले बळच गेले
*
ती रूम वर आली अन विचार करू लागली
काहीतरी ओंगळ अमंगल असे आपल्या शरीरात वळ्वळते आहे असे तिला वाटल
*
ती साने सरांच्या ऑफिस मध्ये आली
बोला काय समस्यां ?
सर मी प्रेग्नेंट आहे
हे ऐकताच साने हादरला
पण सावरत तो म्हणाला -आपण ऍबॉर्शन करून टाकू
लाज नाही वाटत असे बोलायला ती कडाडली
तिचा रुद्रावतार पहाताच साने घाबरला व त्याने हे प्रकरण नरमाईने हाताळायचे ठरवले
ऍबॉर्शन नाही करणार तर काय मुलं वाढवणार ?
अश्या गरोदर कुमारिकेस व्यवस्थापन तुला कॉलेज मध्ये ठेवतील ?
मोठे झाल्यावर मुलांनी बाप कोण असे विचारल्यावर काय सांगणार ?
शहाणपणा यांच्यात आहे तू ऍबॉर्शन करून घे -तू हुशार करियर माईंडेड मुलगी आहेस
भावनेच्या व रागाच्या भरात निर्णय घेऊ नकोस
शेवटी काय तुला योग्य वाटते तेच कर
आज १० वाजता मी ऑपरेशन थिएटर जवळ वाट पाहात आहे
मी गायनो सर्जन आहे
अर्धा पाऊण तासात तुला मोकळी करेन
मोकळी शब्द तिचे हृदय चिरून गेला
*
तिने डोळे उघडले
समोर साने होता
सारे ठीक पार पडले आहे
मात्र ऍबॉर्शन करताना आढळले की तुझ्या गर्भाशयावर पुरळ उठली आहे
इतर भागात इन्फेक्शन होऊ नये म्हणून गर्भाशय काढून टाकले आहे
तू आता कधीच आई बनू शकणार नाही
असे म्हणत साने निघून गेले
*

*
सुलभा रूम वर आली
झाल्या मुळे तिच्या डोक्यात शोक संतप्त विचारांचे थैमान माजले होते
विचाराचा डोळ्यातून अश्रू होते निचरा होत होता
साने चा काळा चेहेरा व कृत्ये व्यवस्थापनाच्या समोर आणण्याचा तीन निर्धार केला
*
ती साने सरांच्या ऑफिस मध्ये आली
मे आय काम इन म्हणत ती आता आली
आता आल्यावर दुसरेच सर खुर्चीवर बसलेले आढळले
सर साने सर आले नाहीत का ?
नाही -त्यांची बदली आता कॉलेज मध्ये झाली आहे -मी तुझी मदत करू शकतो का ?
थँक्स सर पण माझे त्यांच्या पाशीच काम होते
मग फोन कर त्यांना --
नको सर मला त्यांच्या पाशीच काम होते
ठीक आहे-ते आता नागपूर ला गेले आहेत -कधी बोलणे झाल्यास मी निरोप पोहोचवेल
धन्यवाद म्हणत ती ऑफिस बाहेर पडली
-
रूम वर आल्यावर तिने ठरवले आता साने प्रकरण बाजूला ठेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करू असे म्हणत ती अभ्यासाला लागली
सुलभान एम. डी मेडिसीन केले
एनेस्थेशिया मध्ये स्पेशलायझेशन केले
मान्यता मिळाल्यावर तिने अनेक नामांकित डॉ बरोबर काम सुरु केले
तिने आपल्या क्षेत्रात नाव व पैसा कमावला
तिला साने प्रकरण आठवत असे
पण काळ पुढे सरकल्या मुळे त्याची दाहकता काहीशी कमी झाली होती ते विचार डोक्यात आले कि ती अस्वस्थ होत असे
तिला वाटे साने ला उसा करून चौकात फटके मारावेत अन मग पिस्तुलाच्या गोळ्या त्याच्या मेंदूत उरावर उतरवत त्याला सम्पवावे
असे विचार आले कि ती स्वतःशीच हसत असे
अश्या गोष्टी सिनेमात होतात जीवनात नाही
असे समजले कि तिला स्वताच्च हसू येत असे
-
ती आता साठी ला आली होती
आपण जमेल तशी सेवा केंली आता आपण आपल्या साठी जगायचे असा विचार करत तिने निवृत्ती जाहीर केली
*
सुलभाच्या बाबा नी ती शाळेत असतानाच मुंबई पुणे हाय वे वर एक एकर जागा घेऊन ठेवली होती व तिथे टुमदार बंगला बांधला होता
बाजूला विस्तीर्ण पठार होते मागच्या अंगाला घनदाट झाडे होती
पठार आरक्षित होते
रोड वर बरेच अपघात होत असतात
जखमींना नेण्यासाठी २ ऍम्ब्युलन्स होत्या
मृत व्यक्ती साठी दोन शव वाहिका पण होत्या
कार रिपेयर साठी एक ग्यारेज होते
गाडी टो करण्यासाठी व्ह्यान होती
बाजूला पेट्रोल पम्प होता
एरिया व्ही आय पी असल्याने तास पाणी लाईट आदींची सोय होती
हाय स्पीड नेट कनेक्शन होते
तिच्या बंगल्यात तिथूनच सारी कनेक्शन्स आली होती
सुलभा न आपला व्यवसाय गुंढाळला अन तिने इथे राहण्याचे ठरवले
*
बंगल्यात आल्यावर वा-याची थंडगार झुळूक तिला स्पर्शून गेली
खंडाळा एरिया होती
सारे आसमंत थंडगार होते
खालच्या अंगाला दहा बारा कातकरी कुटुंबे राहात होती
त्यातल्या एकीला तिने बोलावले अन बंगला साफ करून घेतला
पंखे लावले
अन बंगला प्रकाशात उजळून गेला
बाहेरच्या व्हरांड्यात तिने खुर्ची टाकली अन मस्त गरमागरम कॉफी चे घोट घेत रस्त्यावरील वहातुक न्याहाळत राहिली
अचानक तिला साने आठवला
काय करत असेल तो ?
बहुतेक रिटायर्ड झाला असेल
तो भेटण्याची शक्यता नव्हती
कुठल्या शहरात असेल ते पण तिला माहीत नव्हते
पण होऊन गेलेले प्रसंग तिच्या मनात कोरले गेलेले होते
*
तिला वहातुक न्याहाळणे आवडले
वेगात जाणा-या सुसाट गाड्या
वेगवान वाटत होते सारे
*
पाच चा सूमार असेल
तिच्या घरापासून एक सर्व्हिस रोड मुख्य हाय वे जोडणारा होता
कार उभी होती हलकासा पाऊस सुरु होता
आसमंत ढगाळले होतेमोठ्या पावसाची शक्यता होती
इकडचा पाऊस खूप लहरी
कदाचित बरसेल वा नाही
मात्र सोसाट्याचा चारा वाहात होता
विजा कडकडाट करत होत्या
*
तिने खिडकीतून पाहिले एक ६८-७० च्या वयाचा माणूस कारमधून खाली उतरला व घराच्या दिशेने येऊ लागला
व तो दाराजवळ आडोश्याला थांबला
सुलभा ने दार उघडले
तिला पाहाताच तो म्हणाला माफ करा माझी कार बंद पडली आहे पावसाची पण चिन्हे आहेत-त्या मु ळे आडोश्याला थांबले तर चालेलं ना
कार कशी बंद पडली ? पेट्रोल सम्पले ?
नाही हो मी बाजूच्या पंपावरून टाकी फुल्ल करून घेतली होती
बाहेर का ? आपण आता यांना --
धन्यवाद म्हणत तो आत आला
ती बघत होती त्याच्याकडे --ती म्हणाली तुमचे केस भिजले आहेत
वोश रूम मध्ये जा न तिथे टॉवेल आहे फ्रेश व्हा
अरे क्या बात -सो नाईस ऑफ यु --
सुलभा सोफया वर बसली होती
ती विचार करत होती ---चेहेरा पाहिल्या सारखा वाट होता
तो फ्रेश होऊन आला -व समोरच्या खुर्चीवर बसला
धन्यवाद म्याडम -जोराचा पाऊस पडायची चिन्हे आहेत -आणि नेमकी माझी कार बंद पडली -इकडे नेहमी एव्हढाच पाऊस असतो का ?
हो साधारण असतो- त्याच्य कडे रोखत ती म्हणाली आपला परिचय
हो तर मी डॉ साने गायनो सर्जन आहे
मी मुबई मेडिकल कॉलेज मध्ये डीन होतो आता रिटायर्ड
पहिल्या पासून मुंबईलाच ?
नाहो दहा वर्षे नागपूर ला होतो
हो का-तुमचा फोटो मी एका म्यगझिन मध्ये पाहिला होता -
बहुतेक कौतुक सोहळा असावा तो -
पण तुम्ही मेडिकल म्यगझिन का वाचता-आय मिन तुम्ही पण डॉ आहात का ?
नाही हो -माझी जिवलग मैत्रीण आहे सुलभा ब्रह्मे -तिने दाखवाला
खूप स्मार्ट दिसता डॉ साने तुम्ही त्या फोटोत
साने हसला व म्हणाला आहो तो तरुण पणाचा फोटो आता मी सत्तरीला आलो
म्हणून काय झाले ?-तुम्ही अजून हि स्मार्टच दिसता
साने तिच्या कौतुकाने सुखावला व म्हणाला मॅडम तुम्ही पण सुंदर आहात
ती काहीच बोलली नाही
बराच वेळ दोघेही शांत होते
सुलभा ने ओळखले होते हाच तो नराधम साने
तिने डोके शांत ठेवत हाताळायचे ठरवले
मांजर जस उंदराला खेळवत घायाळ करत करते व नंतर शिकार करते तास करायचं तीन ठरवलं हॉलिवूड चा स्ल्यूथ नावाचा सिनेमा तिला आठवला
त्यात मायकेल केन पण असाच खेळ करत व्हील न ला बेजार करतो
सो हँडसम ---तु मुंबई हुन रिटायर्ड झाला -अरे हो तुम्हाला तू म्हटलं तर चालेल ना ?
चालेल -
मात्र साने तू मला अरे तुरे केलेलं खपणार नाही
तिच्या शब्दांना धार होती
ओके मॅडम --
रेवती जोशी नाव आहे माझे
साने तू मुंबई हुन रिटायर्ड झाला तू कधी पुण्याच्या बी जे मेडिकल ला होता का ?
हो खूप वर्षे झाली त्याला २-३ महिने होतो -एच ओ डी म्हणून --
पण तुम्हाला कसे माहीत ?
माझी सुलभा ब्रह्मे नावाची शाळकरी जिवलग मैत्री होती -ती होती बी जे मेडिकल ला
साने बाहेर पाऊस व गारवा आहे -मी टोमॅटो सूप केले आहे -ते आपण घेऊ यात
क्या बात है जरूर -तिचा मड बदललेला पाहून तो हरकला तिने सूप सर्व्ह केलं;-मस्त चवदार झाले आहे
थ्यान्क्यु साने
अन्नदाता सुखी भाव
तथास्तु म्हणत ती हसली
सूप घेतल्या मु ळे साने ला तरतरी आली होती
तिने सुरु केले -तर साने बी जे मेडिकल ला सुलभा ब्रह्मे नावाची विद्यार्थिनी होती ते आठवतंय का ?
सुलभा ब्रह्मे -चेहेरा नाही पण नाव ओळखीचे वाटते --साने म्हणाला
चेहेरा का नाही आठवत ?
अहो शेकड्यांनी मुले मला भेटत असत -कस शक्य आहे चेहेरा लक्षात रहाणे ???साने म्हणाला
ते पण खरंच आहे -पण साने सुलभाचा चेहरा लक्षात राहायला हवा
तुला आठवत असेल -तू तिच्यावर बळ जोरी करत तिच्यावर बलात्कार केला होता
सार खोट आहे रेवती मॅडम --ती ब्रह्मे खोटारडी आहे -साने म्हणाला
साने असं आहे मी तिला कित्येक वर्षात भेटली नाही
ती काय करते माहीत नाही
ती डॉ झाली कि मधेच शिक्षण सोडले कल्पना नाही
त्या मुले तिची बाजू माहीत नाही -त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवणे मला मंजूर आहे
अहो रेवती ती मुलगी एक नंबर चालू आहे -तिला गैरवर्तना वरून रस्टीकेट केला होत -त्या वेळी हि निर्लज्ज माझ्या गळ्यात पडली तुम्हाला हवं ते घ्या पण मला वाचावा अशी गळ घातली
दोघेही गप्प होते
बाहेर पाऊस थांबला होता पावणे सात वाजायला आले होते
अंधार पडू लागला होता
बाहेर झोम्बरा गारवा होता
साने मी कॉफी करते --
करा पण मला ल्युक वोर्म लागते -मी ती एका घोटात संपवतो
नो प्रोब्लर्म -
तिने कॉफी आणली -सानेंनी तो मग एका घोटात संपवला
साने तुझी कॉफी पिण्याची पद्धत युनिक आहे
हो ना अहो मी डीन अस्ताना प्यून कॉफी आणून ठेवायचा -काम करता करता तो कप कधी गार होत असे मला हि कळत नसे -मग मी तो काप एका दमात संपवायचे
अन पुढे त्याची सवय लागली व टीकली
साने तू काय म्हणत होता ती सुलभा चालू अन गळेपडू आहे ?
हो ना --
अरे नालायका तुला लाज नाही वाटत तिच्या चारित्र्याचे वर शिंतोडे उगवायला ???हराम खोरा तू तिच्यावर बलात्कार केलास तिला दिवस राहिले तिला मोकळी केली तिचे गर्भाशय काढले --
तुला कसे माहीत हे सारे ??
मला कसे माहीत-अरे ती दुर्दैवी मुलगी दुसरी -तिसरी कोणी नसून मी आहे
तू मला बरबाद केले मला सेक्स व पुरुषांविषयी तिरस्कार निर्माण झाला ---माझा मातृत्वाचा अधिकार तू काढून घेतला
पण मी घाबरले नाही मी एम डी मेडिसिन केले निष्णात डॉ च्या हाताखाली काम करत नाव व आदर कमावला -सन्मानित झाले
तू डॉकटर शिक्षक पेशास काळिमा आहेस
तुला ह्या समाजात राहण्याचा अधिकार नाही --तुझे दिवस भरले आहेत नीच माणसा ---ती त्वेषाने बोलत होती
तू काय करणार मला मारणार अन फाशी जाणार ?
एव्हढी दुधखुळी नाही मी --
तुझ्या कॉफीत मी ट्रकविलायझर मिसळलं आहे ते द्रव रूपात आहे --
नवीन बाजारात आले आहे
पुढच्य एक मिनटात तुझा मेंदू बधिर होईल
व तू बेशुद्ध पडशील
*
साने ची मान सोफ्यावर कलंडली -तो पूर्ण बेशुद्ध झाला होता
सुलभा ने त्याच्या खिशातल्या कारच्या चाव्या काढल्या
*
त्याच्या गळ्यात हात घालून त्याला उभे केले व फरफटत कार पर्यंत आणले
कार चे दार उघडत त्याला ड्रायव्हर सीट वर बसवले -बेल्ट लावला
अन दार बंद केले
मागच्या सीटखाली असलेला पेट्रोल चा कॅन व रबरी नळी काढली
टाकीच झाकण उघडलं -कॅन मध्ये पेट्रोल भरलं अन मागच्या सीट वर शिंपडले पुढच्या सीट वर व सानेंच्या डोक्यावर तिने पेट्रोल ओतले
कारच्या चाव्या टाकीच्या नळीतून आत सोडल्या
गळ्यात रुमाल होता त्याची वात करत ती पेट्रोल मध्ये भिजवत अर्धी वात नळीत सोडली
एक दीर्घ श्वास घेतला
गाऊन च्या खिशातून काडेपेटी काढली
गुड बाय साने
बॉन व्हॉयेज टू हेल म्हणत वाट पेटवली
व दारा समोर उभी राहिली लेल्या गाडीनं पेट घेतला
गाडी जाळून खाक झाली होति साने जळाला होता जळक्या मासाचा दर्प पसरत होता
काही वेळात गाडी पूर्ण जळाली
-
ती घरात आली दरवाजा लावून घेतला
वॊश रूम जाऊन फ्रेश झाली
व सोफ्यावर शांतपणे पुस्तक वाचत बसली
*
प्रतिशोध संपला होता

-

-

नाट्य

प्रतिक्रिया

करावे तसे भरावे म्हणतात ते उगाच नाही असे उगाच वाटून गेले. कथा आवडली हे काय सांगितलं पाहिजे ?

सुबोध खरे's picture

3 Jul 2019 - 6:45 pm | सुबोध खरे

उगाच काहींच्या काही

धर्मराजमुटके's picture

3 Jul 2019 - 7:32 pm | धर्मराजमुटके

धत्त तेरे की ! ब्रह्मे मला वाटलं काही स्कुटर चा किस्सा आहे ! मजा नाही आली !
त्याऐवजी "औषध 'नळ'गे मजला" टायपचा बदला घेतला असता तर ते "विषया" ला धरुन झाले असते !

चांदणे संदीप's picture

3 Jul 2019 - 9:14 pm | चांदणे संदीप

आणि लुनावाल्यांची आठवण आली. मग पुढचं काहीही न वाचता फिस्सकन हसून घेतलं. आता हा प्रतिशोध नंतर सावकाश वाचणेत येईल.

Sandy

तेच म्हणतो.. आणि वरती मुटके यांच्याशी पण सहमत आहे..
नळ गे मजला वगैरे काही केले असते तर मजा आली असती

नाखु's picture

3 Jul 2019 - 10:31 pm | नाखु

मुळापासून सोडवावेत असं अकुंना वाटत नसावे

nishapari's picture

3 Jul 2019 - 11:06 pm | nishapari

भंगार रद्दी आहे ..

उपयोजक's picture

4 Jul 2019 - 9:49 am | उपयोजक

मराठीत 'प्रतिशोध' नव्हे तर बदला घेणे,वचपा काढणे,सूड घेणे असे शब्दप्रयोग आहेत.
जय महाराष्ट्र _/\_

Rajesh188's picture

4 Jul 2019 - 1:04 pm | Rajesh188

तो साने ६०-७० नाही तर ८० वर्षाचा झाला असला पाहिजे.
तो असा पण थोड्या दिवसात मेलाच असता .
उलट ते त्याला सुखाचे मरण देवून उपकारच झाले .

गवि's picture

4 Jul 2019 - 1:11 pm | गवि

अगदी हेच.

बाकी मला तर क्षणभर वाटलं होतं की ऐंशीव्या वर्षीही त्या खंडाळ्याच्या बंगल्यात परत बाजूच्या खोलीत नेतोय की काय.

खिलजि's picture

5 Jul 2019 - 12:38 pm | खिलजि

=))

गवि's picture

4 Jul 2019 - 1:08 pm | गवि

वा..

गीदड की जब मौत आती है तो वो खंडाळा की तरफ भागता है।

Bj मेडिकल वाल्यांनी ही कथा वाचली तर.
तर ते कथा लीहऱ्याचाच प्रतिशोध घेतील

प्रसाद_१९८२'s picture

4 Jul 2019 - 5:58 pm | प्रसाद_१९८२

मस्त कथा.
अजून लिहा.

श्वेता२४'s picture

4 Jul 2019 - 6:03 pm | श्वेता२४

:)

शेजार्याचा रेडिओ जर मोठ्याने वाजायला लागला तर तो आपल्यासाठीच आहे असे समजून त्याचा आनंद घ्यायचा असतो.

कळलं SSSSSS?

ज्योति अळवणी's picture

5 Jul 2019 - 1:03 am | ज्योति अळवणी

नाही आवडली कथा

एकतर शुद्धलेखनाच्या प्रचंड चुका असल्याने सतत अडकल्या सारखे होत होते आणि एकूण मांडणी देखील सुमार वाटली

धर्मराजमुटके's picture

5 Jul 2019 - 7:56 am | धर्मराजमुटके

कथा आवडली नसणे शक्य आहे पण कृपया शुद्धलेखनाच्या नावे टाहो फोडू नका हो :)
अशुद्धलेखन हा आजकाल मिपाचा युएसपी बनून राहिला आहे :)

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

5 Jul 2019 - 12:39 pm | प्रलयनाथ गेंडास...

"थ्रिलरकॉम" जॉनरचं लिखाण मराठीत वाचायला मिळण्याची संधी ... अकु मुळे मिळाली.

कथा वाचताना, माझ्या सबकॉन्शस मन सागराकडून .. कॉन्शस किनाऱ्याकडे ...
"कॉमेडी आहे "... "कॉमेडी आहे "... अश्या बेभान लाटांवर लाटा , वाक्यावाक्यावाक्यावर धडकत होत्या ...
पण कॉन्शस किनारा मात्र .. पत्थराच्या पुरंदराप्रमाणे अविचल भक्कम कणखरपणे , त्या परतवून लावत ...
"थ्रिलर आहे".... "थ्रिलर आहे".... चा जप जपत होता ...
त्यांचं हे द्वंद्य अद्यापही चालू आहे ....

अभ्या..'s picture

5 Jul 2019 - 12:48 pm | अभ्या..

अप्रतिम
सत्तरीच्या दशकातला निरागसपणा, वातावरण, समाजकारण, व्यक्तीमत्वे, भावभावना आणि वाचकांचे मनोरंजन फक्त आपणंच आपल्या खोलीत बसून केलेल्या लिखाणाने करतोय हा अविर्भाव साधणे सोपे नाही.
यु आर ग्रेट अक्कु.

गड्डा झब्बू's picture

5 Jul 2019 - 7:40 pm | गड्डा झब्बू

तुमच्या सर्व जिलब्यांचा "पांचट कथा" नावाचा कथा संग्रह प्रकाशित करावा असे विचार डोक्यात घोंगाऊ लागलेत. साहित्य सूर्य पुरस्कार नक्की मिळेल.

फुटूवाला's picture

5 Jul 2019 - 11:10 pm | फुटूवाला

टाॅयलेट

नावाने एक कथा आलेली दुपारपारी ती लगेच संपा मंडळाने उडवली बहुतेक

गड्डा झब्बू's picture

7 Jul 2019 - 11:27 pm | गड्डा झब्बू

अरेरे ति पांचट कथा वाचायला न मिळाल्याची रुखरुख लागून राहिली आहे.

पिंट्याराव's picture

7 Jul 2019 - 9:15 pm | पिंट्याराव

केवळ सुलभाला भविष्यात सानेचा बदला घेता यावा, म्हणून तिच्या बाबांना त्या घटनेच्या कितीतरी आधी मुंबई-पुणे हायवे वर जागा घ्यायला लागावी, यापेक्षा अजून किती अवघड आयुष्य असावं... हाय रे दैवा !

बाकी ते ट्रकविलायझर नावाचं द्रव केवळ विलायतेच्या ट्रकातच मिळतं की भारतातल्या इतर वाहनांतूनही मिळतं, याचा शोध घेणं मात्र रोचक ठरावं.