!अनंत मी !
निर्गुण, निराकार, निर्विचार, अवस्था केव्हा प्राप्त होते. मनाने एकचित्त होऊन गुरुचरणी लीन होऊन स्मरण केल्यानंतर आलेली प्रचीती!
त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा. तेव्हा नितळता आपोआप अनुभवायास मिळते. जेथे संसारिक मोठ्या वाटणार्या समस्या अगदी यःकशचित होऊन क्षुल्लक वाटतात. त्यासाठी चिंतन मनन आवश्यक आहे. प्रत्येकाचे असे छोटे मोठे आकाश आहेच. फक्त आवश्यकता आहे ते शोधण्याची.
म्हणूनच 'मनाचिये द्वारी उभा क्षणभरी' अनुभावून तर बघा! किती प्रसन्न वाटते ते !
आपणास सर्व दिवस आरोग्य संपन्न तथा मंगल जावो!
शुभम भवतु !