वैद्यकीय 'मेवा'

अँड. हरिदास उंबरकर's picture
अँड. हरिदास उंबरकर in जनातलं, मनातलं
9 Dec 2017 - 9:58 am

वैद्यकीय 'मेवा' !
डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे. वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही. नीतिमत्तेचे सर्व संकेत गुंढाळून रुग्नाचा खिसा कापण्याचे उद्द्योग या क्षेत्रात इमाने-इतबारे सुरु झाले. रुग्नाची लुबाडणूकच नाही तर सामाजिक संकेत पायंदळी तुडवून अवैध गर्भपातासारखे कृत्य करण्यासही मग हि मंडळी मागे राहिली नाही. रुग्नांच्या सुविधेसाठी आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पैसा कमविण्यासाठी केल्या जाऊ लागला.लिंगचाचणी स्त्री भ्रूणहत्या सारखे प्रकार समोर येऊ लागले. त्यामुळे कायद्यानेही या क्षेत्राकडे आपले डोळे वटारले. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विविध नियम कायदे बनविल्या गेले. मात्र मेव्याच्या लोभापुढे कायदेही खुजे पडत असल्याचे दिसत आहे. लोणार येथील अवैध गर्भपाताची घटना, तद्वातच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे उघडकीस आलेलं बेकायदेशीर गर्भपात केंद्र, या घटना वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

भ्रूणहत्या,अवैध गर्भपाताच्या समश्येचं एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा आणि सुरक्षित गर्भपात कायदा येऊन वीस वर्षांहून अधिक काळ गेला. मात्र त्याचा गैरवापर अजूनही थांबलेला नाही, हे वास्तव आहे. आठ दिवसापूर्वी लोणार तालुक्यात अवैध गर्भपातादरम्यान एका १५ वर्षीय मुलीचा मृत्य झाल्याची घटना समोर आली. या बातमीची शाली वाळते ना वाळते तोच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे बेकायदेशीर गर्भापात केंद्र सूर असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. जिल्हा श्यल्य चिक्तिस्तकांनी या दवाखान्यावर छापा टाकला असता याठिकाणी राजरोसपणे गर्भापात केले जात असल्याचे समोर आले. गर्भपातासाठी लागणारे साहित्य, औषधें, किट असे भले मोठे साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले आहे. गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठीच गर्भपात कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. गर्भपात करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कायद्याने घालून दिले आहेत.. त्यानुसार गर्भपात करता येतो. मात्र तरीही लोक अवैध गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर गर्भपात करतात. यासाठी जेवढा दोष डॉक्टरांना दिला जातो, तितकाच दोष त्यांच्याकडे जाणाऱ्यानाही दिला गेला पाहिजे.

कुठल्याही अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा पुरेसा नसतो तर त्याला समाजाचा धाकही आवश्यक असतो. लिंगनिदान, स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भपात सारख्या सामाजिक समश्याना प्रतिबंध घालण्यासाठी समाजालाच पुढाकार घ्यावा लागेल. मानसिकतेत बदल झाल्याशिवाय या समश्या संपणार नाहीत. त्यासाठी व्यापक मोहीम उघडण्याची गरज आहे. अर्थात, याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागरन केल्या गेले, आजही केल्या जात आहे. मात्र अपेक्षित यश अजून दृष्टीक्षेपात आलेलं नाही. मध्यंतरी जिल्ह्यात 'लेक माझी' नावाने मोठी मोहीम उभारली गेली होती. समाजसेवी डॉक्टर, सामाजिक कार्यकतें यांच्या या टीमने अनेक अवैध सोनोग्राफी केंद्राचा परदाफाश केला. परंतु कालांतराने 'लेक माझी' चळवळ ही थंडावली. शासनाच्याही विविध मोहिमा निघाल्या, पण त्यांचाही अपेक्षित परिणाम समोर आला नाही. एखादी अशी घटना समोर आली कि दोन दिवस त्यावर चर्चा होते. तपासण्या कारवाईच्या एक दोन मोहिमा पार पडतात. आणि पुन्हा काहीजण आपला गोरखधंदा सुरु करतात, हे उघड गुपित आहे. रोहिणखेडच्या घटनेनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या माहिती देणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत तीन पटीने वाढ करत ही रक्कम एक लाख करण्यात आली आहे. निश्चितच यामुळे अजून काही अशी बेकायदेशीर केंद्रे उघड होण्यास मदत होईल. परंतु समश्या संपणार नाही.

'तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाही वाद आपणासी' या वचनातून तुकाराम महाराजांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला आज समाजाने तद्वातच डॉक्टर मंडळींनी आत्मसात करण्याची गरज आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत का ? याचा शोध घेतलेला तर उत्तर सहजपणे सापडू शकेल. अर्थात, संपूर्ण समाजाचं भ्रष्ट होत चालला असताना, आम्ही एकट्यानेच सोवळे का राहायचे, असा सवाल काही डॉक्टर मंडळी उपस्थति करतीलही, पण अशानी वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य लाखात घेतले पाहिजे. डॉक्टर होतेवेळी घेतलेल्या शपथेचेही समरण केलं तर पुरेसं ठरेल. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद अंगीकारून, व्यवसाय नव्हे तर एक मिशन म्हणून काम करणाऱ्या ध्येयनिष्ठ डॉक्टरांची संख्या आजही कमी नाही. त्यामुळे समाज आजही डॉटरांना देवच मानतो. पण अशा काही अपप्रवृत्तीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडे बोट दाखविल्या जाते, हे दुर्दैव.. त्याचमुळे वैद्यकीय 'सेवा' करणाऱ्या डॉक्टरांनी मेव्याची अभिलाषा ठेवणाऱयांचा प्रतिबंध घालण्यासाठी येणाऱ्या काळात पुढाकार घेण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आता या क्षेत्रातील डॉक्टरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.!!

आरोग्यलेख

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

9 Dec 2017 - 10:17 am | सुबोध खरे

विशिष्ट चष्म्यातून पाहू नका
http://www.newsweek.com/sex-selection-abortion-rife-us-447403

प्रकाश घाटपांडे's picture

9 Dec 2017 - 10:25 am | प्रकाश घाटपांडे

गिरिश लाड यांनी या क्षेत्रात बरेच सामाजिक व तांत्रिक काम सातत्याने केले आहे. त्यांचे अनेक लेख या बाबत प्रकाशित आहेत. http://magnumopusindia.in/

सुबोध खरे's picture

9 Dec 2017 - 10:31 am | सुबोध खरे

ऍक्टिव्ह ट्रॅकर सपशेल नापास झाला आहे. कारण सोनोग्राफी करताना गर्भाचे लिंग साधारणपणे दिसतेच. तेंव्हा ते रुग्णाला सांगायचे कि नाही हे त्या डॉक्टरच्या नैतिकतेवरच अवलंबून राहते. हे म्हणजे सी सी टी व्ही लावला कि चोरी होणारच नाही असे म्हणण्यासारखे होते. धंदेवाईक चोर सी सी टी व्ही वर चिकटपट्टी किंवा च्युईंग गम चिकटवून सर्रास चोरी करताना आढळतात. बाकी सायलेंट ट्रॅकर वाल्यानी मधल्या काळात "पैसा कमावून" घेतला.

आनन्दा's picture

9 Dec 2017 - 12:29 pm | आनन्दा

एक प्रश्न आहे, सोनोग्राफी करताना डॉ ने पण बाळाचे लिंग पाहू नये अशी सरकारची अपेक्षा आहे की काय?

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 4:30 pm | अँड. हरिदास उंबरकर

किमान अवैध गर्भापात करू नये, एवढी तरी अपेक्षा आहेच

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 4:29 pm | अँड. हरिदास उंबरकर

खर आहे.. लिंगनिदान डॉक्टरांना समजते.. त्यानी सांगावे की सांगू नये हा नैतिकतेचा भाग.. परंतु गर्भपात करण्यासाठी तर नकार देता येईल की डॉक्टर मंडलीना.. बुलडाणा जिल्ह्यात ५ महिन्याच्या अल्पवयीन मुलीवर गर्भपात करत असताना तिचा मृत्यु झाला.. रुग्नाची अर्थात त्या मुलीची शाररिक क्षमता डॉक्टरांच्या लक्षात आली असेलच की.. तरीही सर्व संकेत कायद्याचे मेडिकलचे आणि समजाचेही मोडून गर्भापात केला गेला.. याला चुकीचेच म्हणावे लागेल..

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 4:39 pm | पगला गजोधर

बुलडाणा जिल्ह्यात ५ महिन्याच्या अल्पवयीन मुलीवर गर्भपात करत असताना तिचा मृत्यु झाला..

वाचून हळहळ वाटते...
परंतु ५ महिन्याच्या मुलीचा गर्भपात ? हे काही कळलं नै साहेब आम्हाला...

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 11:06 pm | अँड. हरिदास उंबरकर

माफ़ करा ज़रा लिहताना चूक झाली.. अल्पवयीन मुलगी ५ महिन्याची गर्भवती अस लिहायच होत..

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 10:36 am | पगला गजोधर

फक्त डॉ लोकांना दोष देने चूक.

१ गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉ मागे, १०० गर्भलिंगनिदान करणारी समाजातील मातब्बर घरे असतात, त्यांना बखोटीला धरून आणा आधी आरोपीच्या पिंजऱ्यात...

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 4:32 pm | अँड. हरिदास उंबरकर

जबाबदारी सर्वांचीच आहे...

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 4:37 pm | पगला गजोधर

सहमत, म्हणून फक्त डॉ लोकांचे इथें विचहंटिंग होऊ नये ....

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 11:13 pm | अँड. हरिदास उंबरकर

बिलकुल केल नाही.. जितके डॉक्टर जबाबदार तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक त्यांच्याकडे आशा गोष्टी साठी जाणाऱ्याना जबाबदार धरावे अस माझ मत आहे.. लेखातही व्यक्त केल आहे.. पण गर्भपात करताना डॉक्टर मंडळीची जबाबदारी जास्त.. त्यांनी नैतिक अनैतिक चा विचार करावा, ही अपेक्षा.. कारण कुणी काहीही सांगितल तर शेवटी काय योग्य आहे हे डॉक्टरच ठरवू शकतात.. लोकांची एखाद्या वेळी मज़बूरी असेलही पण डॉक्टर लोकांची यात काही मज़बूरी असते का? ते थेट नकार देवु शकतात.. हेच निदर्शनास आणण्याचा प्रयत्न आहे..

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 10:39 am | पगला गजोधर

सेवाभावी वृत्ती चा ओढा नसताना, भरमसाठ डोनेशन देऊन
डॉ मध्ये आपल्या पाल्याला ढकलणार्या पालकांना विचारा जाब...

प्रकाश घाटपांडे's picture

9 Dec 2017 - 10:45 am | प्रकाश घाटपांडे

वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आता या क्षेत्रातील डॉक्टरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.!! याच्याशी सहमत आहे. असे काही डॊक्टर्स एकत्र आले आहेत व ते रुग्णहक्कासाठी काम करतात. पहा

http://medimitra.org/

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 11:15 pm | अँड. हरिदास उंबरकर

उपयुक्त लिंक आहे

babu b's picture

9 Dec 2017 - 10:52 am | babu b

या देशाच्या एका पंतप्रधानानी त्यांच्या एकुलत्या एक मुलीवर समाधान मानले व तिलाही त्या पदापर्य्ंत जाण्याइतपत प्रगत केले. बापाचे आणि मुलीचे घराणे ही एक महान जोडगोळी झालेली आहे.

हे समोर घडलेले दिसूनही अनेक अपत्यांसाठी जनता चढाओढ करत राहिली. त्यातून लोकसंख्येचा स्फोट , गरिबी , तंटे , अशांतता , पुरुषप्रधान संस्कृउती , स्त्रीयांची कुचंबणा , स्त्री भ्रूणहत्या असे भीषण परिणाम समाजावर झाले.

पंतप्रधानांचे जिवंत उदाहरण बघूनही न सुधारलेली जनता आता निदान पोस्टरबाजीने तरी सुधारो हीच जगन्नियंत्याला प्रार्थना.

विशुमित's picture

9 Dec 2017 - 5:14 pm | विशुमित

तुमच्या या प्रतिसादामुळे मला प्रोहत्सान आणि हुरूप आला. पहिल्या मुली नंतर घरचे आणि आजूबाजूचे मागे लागलेत, दुसरं एक होऊ देत, त्यात हि पोरगा झाला तर दुधात साखर..!!
भारतचे प्रथम पंतप्रधान आणि माननीय शरद पवार यांचा आदर्श घेण्यात काही हरकत नाही.
...
((बाकी मुलीला अजून एक भावंडं असावे जेणे करून आपल्या पाश्च्यात/ व्यतिरिक्त ती आपले सुख दुःख शेर करू शकेल. ह्या बाजूने देखील विचार चालू आहे.
त्रिशंकू स्थिती आहे..!! )))

मला विचाराल तर दुसरे होऊ द्या,, आम्हाला आत्ता दुसरी मुलगी झाली, आणि आम्ही आमच्या दोन मुलींबरोबर अत्यंत आनंदात आहोत.. आणि सुखदु:खच नचे तर आपला खाऊ, खेळणी वगैरे शेअर करायची सवय लागावी म्हणून दुसरे हवेच.

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 11:18 pm | अँड. हरिदास उंबरकर

पवार साहेब याबबतीत ही आदर्श आहेत.. माझ्या लक्षातच आल नाही.. बढ़िया हा एंगल कधी साहेबांच्या बाबतीत विचाराच घेतला नाही.

सुबोध खरे's picture

13 Dec 2017 - 8:24 pm | सुबोध खरे

जाता जाता --आपले फडणवीस साहेबाना पण एकच मुलगी आहे.
नाही म्हणजे उगाच !!!

babu b's picture

9 Dec 2017 - 11:55 pm | babu b

सुखदुखे खाउ ख्व्ळणी शेअर होतात , हा एक मोठा भ्रम आहे.

२ एकर शेत , डिग्री , शिक्षण , संसार , १ bhk ची रूम , हे कसे शेअर करणार ?

मुलांचे पुढचे खर्च एक्स्पोनेन्शली वाढत जाणार आहेत. नोकरी उद्योगातून एका मुलाचे होमवर्क बघायला वेळ नसतो. तिथे दोन भिन्न इयत्तांची मुले कशी संभाळणार ?

शेअरिंगची सवय ... हेही एक भ्रामक कारण आहे. शेअरिंग कुणालाच आवडत नसते. वडिलधार्यांचा धाक , घर , समाज यांचे पीअर प्रेशर यामुळे लोक शेअरिंग करायला तयार होतात.

मुळात शेअरिंगची गरज ही रिसोर्स डेफिसिट दाखवते. अन्यथा आपापल्या वस्तूंचा उपभोग ते घेऊ शकतातच की.

पुरुषसत्ताक मनुवादी मनोवृत्ती, समाजात बिंबविल्या मुळेच,
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा (पुण्यात पोटाच्या मुलाने आई वडील यांची हत्या केली)
मुलगी दुय्यमच....
त्यामुळे मुलगाच हवा हा अट्टहास...
त्यामुळे गर्भलिंगनिदान करायला ही लोकं गावोगाव डॉ शोधत फिरतात...

सुबोध खरे's picture

9 Dec 2017 - 11:20 am | सुबोध खरे

मनुवादी मनोवृत्ती,
पगले बुवा
मी वर दिलेला दुवा वाचला का? स्त्रीभ्रूण हत्या हा प्रश्न जिथे मनुस्मृती हे नावही ऐकले नाही अशा देशातही (चीन कोरिया इ.) आहे.
जिथे तिथे आपलं तुणतुणं बंद करा बुवा.
https://en.wikipedia.org/wiki/Sex-selective_abortion

babu b's picture

9 Dec 2017 - 11:42 am | babu b

तिकडे ते पुस्तक नाही , म्हणून इकडच्या प्रश्नाला ते पुस्तक attributable धरु नये , हे लॉजिक पटले नाही.

हे म्हणजे नॉनडायबेटिसवाल्यानाही हार्ट अटॅक येतो . मग डायबेटिसवाल्याच्या हार्ट अटॅकला डायबेटिसला कशाला जबाबदार धरायचे ? असा युक्तिवाद झाला.

( वाद घालायची इच्छा नाही. )

सुबोध खरे's picture

9 Dec 2017 - 1:22 pm | सुबोध खरे

( वाद घालायची इच्छा नाही. )
काय सांगताय काय ?
तुम्हाला झालंय काय?
परवा मोदींची भलामण करत होतात?

प्रकाश घाटपांडे's picture

9 Dec 2017 - 11:49 am | प्रकाश घाटपांडे

अहो तो मनुवाद शब्द पंचिग बॅग म्हणून वापरतात किंवा समेवर येण्यासाठी वापरतात. जस की रामकृष्ण हरी! जगदंब जगदंब! श्री राम श्री राम!! शिव शिव! विद्रोही चळ्वळींची खासियत आहे. :)

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 12:05 pm | पगला गजोधर

मनुवादी मनोवृत्ती

हे स्थलकालपरत्वे वृत्ती निर्देशक आहे.
चीन कोरिया मधे सुद्धा अश्या वृत्तीची शुद्धीपत्रक देणारी बोवा मंडळी असतीलच की...
भलेही तिथे शुद्धीपत्रकाला गोंगक्साउचिंगमिंग असं म्हणत असतील...तिकडचे बोवा लोकं...
मुलीचे पाय मोठे म्हणजे संस्कृती बुडाली म्हणून तिचे पाय लाकडाच्या साच्यात बांधणारे सुबुद्ध बोवालोक असतीलच की....

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 11:14 am | पगला गजोधर

डॉ लोकं काही आकाशातून पडत नाही, ते समाजाचा हिस्सा आहे, त्यांची वृत्ती हे समाजाचेच प्रतिबिंब,
पुरोगामी विचारांच्या समाजात डॉ पुरोगामीच होणार...आणि व्हाइसवर्सा...
जो बिचारा डॉ चांगलं करायला जातो, त्याला श्रद्धानिर्मूलक
धर्मद्वेषी अश्या अनेक शेणगोळ्यांना सामोरं जावं लागतं तर कधी गोळ्या झेलाव्या लागतात...
का तर ह्यांची श्रद्धा दुखावली गेली...

तुषार काळभोर's picture

9 Dec 2017 - 11:42 am | तुषार काळभोर

शिक्षणासाठी केलेला खर्च, कष्ट, अभ्यास, वेळ याचा विचार करून...
आणि त्या शिक्षणानंतर जी नोकरी मिळेल/व्यवसाय करेल त्यातील जबाबदारी नुसार,
अंगी असलेल्या कौशल्यावरून,

दहावी/बारावी करून जर कोणी नोकरी करत असेल तर त्याला किती उत्पन्न मिळावे?

बीए करून किती उत्पन्न मिळावे?

बी कॉम करून?

सीए लोकांना किती उत्पन्न मिळावे?

डिप्लोमा इंजिनियर ला किती उत्पन्न मिळावे?

बीई प्रॉडक्शनला किती मिळावेत? बीई कॉम्प्युटरला किती उत्पन्न मिळावे?

अप्लाईड आर्टस् केलेल्या व्यावसायिकाला किती उत्पन्न मिळावे?

एमबीबीएस डॉक्टरला किती मिळावेत?

एमएस केलेल्या न्यूरोसर्जनला किती मिळावेत?

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 4:35 pm | अँड. हरिदास उंबरकर

डॉक्टर, पत्रकार, साधू, शिक्षक यांच्यांकडे समाज आदराने बघत असतो पण हेच लोक माणुसकी सोडून वागायला लागले की सामान्य माणसाचा माणुसकीवरचा विश्‍वास उडतो. सामान्य माणूस आपला जीव आणि आरोग्य डॉक्टरच्या हातात सोपवत असतो. ते डॉक्टर धंदा करण्याच्या नादात भलतेच काही करायला लागले तर पेशंटवर जीव गमवायचंी पाळी येते. म्हणुन या व्यवसायाची अन्य व्यवसायसोबत तुलना करता येणार नाही..

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 4:47 pm | पगला गजोधर

म्हणुन या व्यवसायाची अन्य व्यवसायसोबत तुलना करता येणार नाही..

पहिली गोष्ट, हा व्यवसाय नाही तर सामाजिक सेवा आहे...
वकिलीसारखं...(न्याय मिळणे)...
वैद्यकीय सेवेच समाजाने व्यवसायिकीकरण होऊ दिलंय...
डॉ झालं पोरगं की ९६ तोळे सोनं हुंडा मागणारी लोकं पण ह्याच समाजाची...
कॉपी करून , पेपर फोडून, उत्तर पत्रिका बदलून, जात प्रमाणपत्र फेरफार करून, उत्पन्न फेरफार करून, डोनेशन देऊन डॉ करणारे पण ह्याच समाजातले...

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 11:21 pm | अँड. हरिदास उंबरकर

सत्य आहे.. उगाच युक्तिवाद करुण ते बदलनार नाही.. पण बदलाव ही मनापासून इच्छा..

पगला गजोधर's picture

10 Dec 2017 - 11:28 am | पगला गजोधर

त्यासाठीच प्रबोधन, हाच उपचार...
कुठल्याही कायद्याद्वारे जोर देण्यापेक्षा,
आधी मातत्बर घरांनी प्रत्यक्ष कृती द्वारे आचरणात आणणे,
सिव्हिल सोयायटीने प्रबोधन घडवणे....

मोठ्या घराण्यांनी आधी आपापल्या मुलीला पुढे आणावे...
उरलेली जनता आपोआप फॉलो करेल...

पूर्वीच्या 60-70 च्या दशकात घरोघरी मुलींची नावे प्रियदर्शनी,
पुढे काही वर्षयांनी मुलाची नावे राजीव , संजय घरोघरी आढळू लागली, आजकाल आराध्या हे नाव नवजात मुलींच्या पालकांना प्रिय दिसतेय... आता हे नांव अचानक का लोकप्रिय होतंय ?
याचे कारण बहुतेकांना माहिती असेल...
तर थोडक्यात काय... जनता मुलांची नावं सुद्धा मोठ्या लोकांचं पाहून ठेवते...

सुबोध खरे's picture

9 Dec 2017 - 1:41 pm | सुबोध खरे

वैद्यकीय 'मेवा'
एमबीबीएस डॉक्टरला किती मिळावेत?
कर्नाटक सरकार च्या येऊ घालत असलेल्या कायद्यात एम बी बी एस ने ५० ते १५० रुपये फी घ्यावी( गाव ते शहर प्रमाणे) असे सुचवले आहे.
मुलुंड पूर्व येथे वातानुकूलित दुकानात केस कापायचे १५० रुपये घेतात.
८ वि पास मुलीने साधारंण फेशियल केले तर कमीत कमी ८०० रुपये होतात.मग व्हिटॅमिन इ चे फेशियल १२०० रुपये, गोल्ड फेशियल २००० रुपये आहे.
कॉम्प्युटर/ फ्रुज टीव्ही चा तंत्रद्न्य आपल्या घरी येण्याचे ३५० रुपये सेवा शुल्क घेतो.
http://www.firstpost.com/india/karnataka-moves-to-regulate-cost-of-priva...

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2017 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी वैद्यक्य क्षेत्रातला तज्ञ नाही. पण लेखकाच्या भावनांशी सहमत आहे. अशा बातम्या वाचल्या की वाईट वाटते.

या गर्भलिंगनिदाना बद्दल अनेकवेळा वाचण्यात येते. डॉक्टर लोकांना सोनोग्राफी करताना गर्भाचे लिंग सांगण्यास मनाई आहे. जे डॉक्टरांना सहज पणे कळू शकते. मग डॉक्टरांचे हात ओले करुन गर्भाचे लिंग जाणण्याचा प्रयत्न करताना अनेक जण दिसतात व नको असलेल्या गर्भाचा त्याग करण्यासाठी अघोरी उपाय रचतात.

त्या ऐवजी सोनोग्राफी मशीन मधे एखादा मिटर बसवुन त्यावर किती चाचण्या झाल्या याची नोंद ठेवण्यात यावी.
सोनोग्राफिच्या रीपोर्टमधेच गर्भाचे लिंग लिहिण्याची डॉक्टरांवर सक्ती करावी, या रीपोर्टची प्रत व केलेल्या सोनोग्राफिंचा हिशेबाचे मासीक विवरण पत्र दाखल करणे डॉक्टरांना बंधन कारक करावे.

तसेच अशा नोंदणीकृत अर्भकाला त्याच्या जन्मा पर्यंत किंवा त्या नंतरही काही काळ ट्रॅक करावे

अशी काही यंत्रणा बनवता येईल का?

यात प्रत्येक गर्भाची ( स्त्री असो वा पुरुष) नोंद सरकार कडे आपोआप उपलब्ध होईल. व भॄण हत्यारे शोधायला अशा नोंदींचा उपयोग करता येईल.

या मधे गडबड घोटाळे करणार्‍या डॉक्टरांवर तसेच असा लिंगसापेक्ष गर्भपात करुन घेणार्‍या मातापित्यांवर सदोश मनुष्यवधाचा खटला दाखल करता येईल इतपत कडक कायदा बनवावा.

पैजारबुवा,

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 4:22 pm | अँड. हरिदास उंबरकर

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचण्यांना बंदी घालण्यात आली. या सध्याच्या धोरणाला पूर्णपणे छेद देत अश्या चाचण्या सक्तीच्या करून स्त्री भ्रूणहत्या रोखता येतिल का? यावर मध्यांतरी राज्यसरकार विचार करत असल्याची बातमी होती. राज्यातील स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी गर्भलिंग चाचणी आवश्यक करण्याचा प्रस्ताव लोकलेखा समितीनं मांडला होता.

गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य केल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीच्या उपायांची जंत्रीही या प्रस्तावात सुचविण्यात आली होती. गर्भवती महिला मुलीला जन्म देणार असल्यास सोनोग्राफीच्या वेळी तिची नोंद करुन, मुलीचा जन्म होईपर्यंत तिची देखरेख करण्याची तरतूद प्रस्तावात करण्यात आली. मुलगी असल्यास गर्भपात होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्याचं प्रस्तावात सुचवलं. स्थानिक पातळीवर गर्भवती आणि तिच्या पतीचा फॉलो अप घ्यावा. त्यांनी चेकअपला गैरहजेरी लावल्यास त्यांच्या घरी जावं, असं म्हटलं आहे.. हा चांगला उपाय ठरू शकेल का??

विशुमित's picture

9 Dec 2017 - 5:04 pm | विशुमित

<<< हा चांगला उपाय ठरू शकेल का??>>>
==>> ह्या अंगेल ने विचारच नव्ह्ता केला. क्रिकेट मध्ये सट्टा अधिकृत करा असे म्हंटल्यासारखा होईल. लपवा छपवी प्रकार उरणार नाही. सगळे रडार वर येतील.

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 5:42 pm | पगला गजोधर

त्या ऐवजी प्रबोधनावर भर हवा...
कायदा / प्रोसेस यातून पळवाटा शोधणे, फार अवघड नाही लोकांसाठी..

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 5:55 pm | अँड. हरिदास उंबरकर

जनजागृतीतून अपेक्षित यश येत नसल्याने लोक लेखा समितिने हां प्रस्ताव मंडला होता..

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 6:01 pm | अँड. हरिदास उंबरकर

यामगिल काही धोके मला दिसतात. उदाहरणार्थ, गर्भाच्या लिंगाची माहिती मातेबरोबर कुटुंबीयांनाही मिळाली तर त्याचा दुरुपयोग होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. गर्भात मुलगी असल्याचे समजल्यावर कायद्याचा किती ही धाक असला तरी काही कुटुंबाकडून मातेलाच संपवण्याचा माथेफिरूपणा घडू शकतो. गर्भलिंगनिदानाची नोंद सरकार ठेवणार असेल तर या नोंदी बदलण्यासाठी भ्रष्टाचाराला चालना मिळण्याची दाट श्यक्यता आहे. सोबतच लिंगनिदानानुसार बाळ जन्माला आले अथवा नाही, यावर काटेकोर नजर ठेवणारी विश्वासार्ह यंत्रणा उभारण्याचे आहवण सरकारमोर राहील.

_*गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी याबाबत व्यक्तव्य केले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर गदारोळ झाला, आणि असा अधिकृतरीत्या कोणताच प्रस्ताव नसल्याचा खुलासा गांधी यांना करावा लागला होता. आता काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील लोकलेखा समितीने ही मागणी उचलून धरली आहे. तसा प्रस्तावही विधानसभेत सादर करण्यात आला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होण्याची श्यक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे गर्भ लिंग निदान चाचणी सक्तीची केल्यास त्याचे काय परिणाम होतील? यामुळे स्त्री भ्रूण हत्या करणे अजून सोपे तर होणार नाही ना ? या प्रस्तावात काही त्रुटी आहे का? यावर पूर्णपणे साधकबाधक चर्चा आणि एक व्यापक विचारमंथन व्हायला हवं..!!!

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 6:03 pm | अँड. हरिदास उंबरकर

कृपया हिवाळी अधिवेशानात असे वाचावे

कपिलमुनी's picture

9 Dec 2017 - 11:30 pm | कपिलमुनी

भारतात कोणते सेवादाते निष्कलंक आहेत ? फक्त डॉक्टरांवर का डूख ?
रस्त्यावर खड्डयात पडून काल एक डॉक्टर गेले , मुंबईत मॅनहोल मध्ये एक वाहून गेले , कोण गेले उद्धव ठाकरे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ? किंवा नगरसेवकाकडे ?
सुशिक्षित आणि सहज टार्गेट म्हणून डॉक्टरकडे पाहिले जाते. अपप्रवृत्ती सगळ्या लोकांच्यात आहेत , दुर्दैवाने आपल्या समाजाचा भाग आहेत

अँड. हरिदास उंबरकर's picture

9 Dec 2017 - 11:47 pm | अँड. हरिदास उंबरकर

डुख नाही..

आज काय चांगले, हे निवडायची संधी आपल्या जवळ राहिली नाही. कारण सर्वच ठिकाणी अपप्रवृत्तिनी शिरकाव केला आहे.. त्यामुळे कोण कमी वाईट, हे निवडायची वेळ आपल्यावर आली आहे..

परंतु ज्यांच्या कड़े समाज आदराने बघतो तेच लोक माणुसकी सोडून वागायला लागले की सामान्य माणसाचा माणुसकीवरचा विश्‍वास उडतो. सामान्य माणूस आपला जीव आणि आरोग्य डॉक्टरच्या हातात सोपवत असतो. ते डॉक्टर धंदा करण्याच्या नादात भलतेच काही करायला लागले तर पेशंटवर जीव गमवायचंी पाळी येते. म्हणुन या व्यवसायाची तुलना इतरांशी करता येणार नाही.. जबाबदारी वाढते.. तिची जान असावी ही अपेक्षा..

कपिलमुनी's picture

10 Dec 2017 - 12:29 pm | कपिलमुनी

>>>समाज आदराने बघतो

हा गैरसमज आहे . एक चूक झाली की जनावरासारखी मारहाण होते , आदर वगैरे चा जमाना संपला . शुद्ध व्यवहार राहिला आहे.

मार्मिक गोडसे's picture

10 Dec 2017 - 12:48 pm | मार्मिक गोडसे

एक चूक झाली की जनावरासारखी मारहाण होते
आदराने मारतात हो.

टर्मीनेटर's picture

10 Dec 2017 - 2:48 pm | टर्मीनेटर

लेखाचा विषय चांगला आहे, आणि अपप्रवृत्ती म्हणाल तर ज्यांना जवाबदार समजले जातात अशा सगळ्याच पेशात वाढलेल्या आहेत मग ते पोलीस असोत कि वकील वा डॉक्टर. वर कपिलमुनींनी म्हंटल्याप्रमाणे हल्ली ह्या सगळ्यांनाच जनावरांसारखी मारहाण होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढलेले आहे असे बातम्यांवरून लक्षात येते, ह्या मागची कारणे जर विचारात घेतली तर ह्या सर्व मंडळींनी लोकांच्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर बऱ्यापैकी गमावलेला आहे हे प्रामुख्याने जाणवते. अर्थात ह्या साठी सरसकट ह्या पेशातील सर्वांना जवाबदार ठरवणे चुकीचेच ठरेल कारण अनेक सन्माननीय अपवाद समाजात अजूनही आहेत. आणि समाज प्रबोधन अथवा जनजागृती करून ह्या गोष्टी थांबतील हा फारच भोळा विश्वास वाटतो.

पगला गजोधर's picture

10 Dec 2017 - 5:15 pm | पगला गजोधर

समाज प्रबोधन अथवा जनजागृती करून ह्या गोष्टी थांबतील हा फारच भोळा विश्वास वाटतो.

सक्तीच्या नसबंदीपेक्षा, कुटुंब नियोजन प्रबोधन व
पोलिओ संदर्भातील, दो बंद जिंदागिके प्रबोधन, याचे चांगले परिणाम आता हळूहळू दिसत आहेत...

भारतीय जनतेला जबरदस्ती पेक्षा प्रबोधनच तारून नेईल...

नाहीतरी माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने स्वतःच्या सरकारच्या पी आर साठी गेल्या 3 वर्षात ३८०० कोटींची रक्कम खर्च केलीये...
झैराती पेक्षा प्रबोधनावर केलं असतं तर बरं झालं असतं...

कोणत्याही धाग्यावर मोदी द्वेष आणून तेथे चाललेल्या चांगल्या चर्चेत विरजण घातलाच पाहिजे का?
इतका मोदी द्वेष की वृत्ती सुद्धा नकारात्मक व्हावी?

अधिक फायदा समाजाला च अंतिमतः होणार.
नविन तंत्रज्ञान वैद्यकीय वा कुठल्याही क्षेत्रातील जर नफ्याची प्रेरणा असेल तरच निर्माण होइल. त्या तंत्रज्ञानाच्या निर्माता व ग्राहकास फायद्याची प्रेरणा नसेल तर
नवनिर्मीतीचा ओघ आटेल.
डॉक्टर हा काहीतरी वेगळा पवित्र आहे त्याचे काम काहीतरी वेगळे पवित्र आहे हा आग्रह हा बघण्याचा दृष्टीकोण मुळात फारच बालिश आहेत.
डॉक्टरला सेवेच्या दर्जाप्रमाणे उत्तम किंमत मोबदला मिळणे आवश्यक आहे. मोठी व्यावसायिक अत्याधुनिक हॉस्पीटल्स ही काळाची आवश्यक गरज आहे. या हॉस्पीटल्सना दर्जानुकुल चार्जेस आकारण्याचे स्वातंत्र्य हवेच. सर्वात महत्वाचे म्हणजे पुर्वीची राजीव गांधी व सध्याची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सारख्या भंकस फुकट योजना तात्काळ बंद झाल्या पाहीजेत.
या फुकट योजनांमुळे वैद्यकीय क्षेत्राच्या विकासास व सेवेच्या दर्जास मोठाच धोका आहे.

गामा पैलवान's picture

11 Dec 2017 - 9:37 pm | गामा पैलवान

अवांतर :

पगला गजोधर,

पुरुषसत्ताक मनुवादी मनोवृत्ती, समाजात बिंबविल्या मुळेच,
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा (पुण्यात पोटाच्या मुलाने आई वडील यांची हत्या केली)
मुलगी दुय्यमच....
त्यामुळे मुलगाच हवा हा अट्टहास...
त्यामुळे गर्भलिंगनिदान करायला ही लोकं गावोगाव डॉ शोधत फिरतात...

मनु तर 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः' असं म्हणतो (संदर्भ : मनुस्मृती ३/५६). मनुस्मृतीतल्या कुठल्या श्लोकात स्त्री दुय्यम असल्याचं लिहिलंय? मनुने इतरत्र असे काही उद्गार काढलेत का त्याचा संदर्भ मिळाला तरी चालेल.

सांगायचा मुद्दा काये की कारण नसतांना मनुस नावे ठेवू नयेत.

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

एमी's picture

13 Dec 2017 - 4:34 pm | एमी

धन्य आहेत सगळेच _/\_

एमी's picture

15 Dec 2017 - 10:51 am | एमी

इच्छुकानी https://www.maayboli.com/node/64687 इथली चर्चा वाचावी.