पावभाजी
घरात पावभाजी चा बेत असल्याने जोशीकाकूंच्या लक्षात येतेकी पावाची लादी घेण्यास त्या विसरल्या आहेत
लगबगीने त्या समोरच्या जनरल स्टोअर मध्ये गेल्या व पाव लादी व दुधाची पिशवी आदी किरकोळ खरेदी केली
दुकानदाराने ते सामान पातळ प्ल्यास्टीक च्या पिशवीत भरले व काकूंना दिले
बाजूलाच भाजेवाला असल्याने त्यांनी भाजी खरेदी केली व पिशवीत भरली व सॊसायटी कडे त्या निघाल्या
वाटेत वजन जास्त झाल्याने प्ल्यास्टीक ची पिशवी फाटली अन पावाची लादिने जमिनीकडे झेप घेतला पण जोशी काकूने चपळाईने पाव पडू दिला नाही अन सारे सामान छातीशी पकडत घर गाठले -