मतदार हुशार झालेत का ?

विवेक9420's picture
विवेक9420 in जनातलं, मनातलं
28 Feb 2020 - 12:15 am

मतदार हुशार झालेत ?

दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर.
आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे.

असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे.
कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे. जर तो कळाला असता तर असे विश्लेषन केले नसते किंबहुना परिस्थिती मधील फरक नक्कीच केला असता.

पन ह्या सगळ्या वृत्त कथनात भाजपचा कायमच विरोध करणारे एका पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे एक ट्विट खुप बोलके आहे व ज्यावर आजचा हा मेसेज मला करावासा वाटतो अर्थात तो ट्विट मि शेवटी टाकतो

मतदार हुशार झाला का ?

हो. मतदार हुशार झाला आहे व एकदम समजदार पन झाला आहे. मतदार राजा हा प्रत्येक निवडणुकीत आपला मतदान करताना एक ठराविक पॅटर्न ने मतदान करत आहे

मग ती निवडणुक ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, राज्याची असो वा देशाची
* त्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे ?
* मुख्य प्रतिस्पर्धी मधील लोकांचा मागील काळात केलेली काम कोणती
* निवडुन आलेला लोकांचा कामातुन व्यक्तीगत ,समूहाला,जातीला झालेला फायदा व त्या पलिकडे देशाला झालेला फायदा

तो ह्या सर्व फॅक्टर मनात ठेवुन मतदान करतो व प्रत्येक निवडणुकीत ह्या वरील गोष्टी विचारात घेतो पन निवडणुकी प्रमाणे त्याचे हे फॅक्टर कमी अधिक होत असता

उदाहरण द्यायचे झाले म्हणजे

* ग्रामपंचायतीचा ईलेक्शन असताना माझा समुह माझी जात भाऊबंदकी फॅक्टर जास्त असते व महत्वाचे असते माझा फायदा कोण करवुन देणार माझा भाऊबंदकी मध्ये,समुह,जाती,समाजपैकी ह्याचा विचार जास्त असतो व देशाचा विचार थोडा कमी असतो पन

* राज्यांचा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी पैकी राज्याचा हिताच कोण, राज्यामधील प्रतिस्पर्धी , पार्टींची विशिष्ट समूहाने झालेली ओळख ह्या पद्धतीने जास्त विचार केला जातो व ह्या निवडणुकीत पन देशाचा विचारापेक्षा राज्याचा विचार जास्त केला जातो व व्यक्तीगत फायदा कोन जास्त करून देईल ह्यावर लक्ष असते

* देशाचा निवडणुकीत मात्र मतदार देश आणि देशाचा विचार करतात त्यात समुह,जात,राज्याचे नेतृत्व हे विषय गौण असता पन देश,धर्म व प्रतिस्पर्धी पैकी देशा साठी कोन चांगले हा विचार केला जातो

हि मानसिकता सर्वप्रथम वाचकांचा नजरेत आणुन द्यायची आहे

आता हे एवढे सांगण्यामागे तात्पर्य एवढेच आहे कि आता मतदार झाला आहे जागृक व तो आता ह्या पुर्वीचा जात पंथ धर्म ह्याचा सिमा ओलांडायला लागला आहे त्याला महत्व कमी द्यायला लागला आहे व आपल्यासाठी (देश व स्वतः) उपलब्ध पर्यायांपैकी कोण जास्त चांगले ह्याचा विचार तो करत आहे

दिल्ली राज्याचा विधानसभा व लोकसभेचा ईलेक्शन निमित्त तो पॅटर्न दिसला.

# 2019 लोकसभेचा निवडणुकीत भाजपने 2014 प्रमाणे 7 सीट घेत दिल्लीत 7-0 अशी धुळ विरोधकांना चारली

विशेष म्हणजे 56.68% टक्के मतदान भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला तर 22.46% घेत कांग्रेस दुसरा तर 18% मतदान घेत आप तिसरा

कारण लोकसभेत मुकाबला होता तो
नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी
व मतदारांना ह्या दोघापैकी कोन चांगला तो निवडायचा होता

दिल्ली चा मतदारांनी नरेंद्र मोदी एक सक्षम ऑप्शन स्विकारून 7 शीट मोदींचा नावाखाली भाजप ला दिल्यात

मात्र तेच दिल्लीचे मतदार,तीच यंत्रणा,तेच पक्ष व 6 महिन्याचा अवधीनंतर झालेला विधानसभा ईलेक्शन मध्ये आप पक्षाचा विजय होतो व 54% मतदान घेऊन आप पक्ष क्रमांक एकचा पक्ष होतो 40% मतदान घेऊन भाजप 2 नंबर तर कांग्रेस फक्त 5% मत घेऊन 3 नंबर मिळवते

म्हणजे लोकसभेतील क्रमांक एकचा भाजप विधानसभेत 2 नंबर जातो

लोकसभेत क्रमांक 2 चा कांग्रेस विधानसभेत 3 नंबर ला जात

लोकसभेत क्रमांक 3 चा आप पक्ष
विधानसभेत क्रमांक एकचा होतो

असा का झाल ? कारण विधानसभेत लढत झाली ते

अरविंद केजरीवाल विरूद्ध ईतर

ज्यात केजरीवाल समोर अतिशय कमजोर स्थानिक दिल्ली भाजप चे अध्यक्ष मनोज तिवारी व शोधुन पन सापडणार नाही लवकर असे कांग्रेस चे नेतृत्व

मतदारांनी नेहमीच एक सक्षम व कणखर नेतृत्व स्विकारले आहे म्हणुन ते वेगवेगळ्या निवडणुकीत उपलब्ध पर्यायांपैकी जो उत्तम पर्याय आहे त्याला निवडता पक्ष न बघता

ह्याला जोडुनच उदाहरण द्यायचे म्हणजे 2018 मध्ये राजस्थान , मध्य प्रदेश , छत्तीसगड निवडणुकीत भाजप चा सपशेल पराभव स्थानिक नेतृत्वा विरूद्ध असलेला नाराजी मुळे झाला. घोषणा दिल्या गेल्या वसुंधरा तेरी खैर नाही पर मोदी तुझसे बैर नाही

6 महिन्यानंतर 2019 मध्ये

त्याच राज्यांमध्ये लोकसभेत
राजस्थान - भाजप 24 कांग्रेस 1
मध्य प्रदेश- भाजप 28 कांग्रेस 1
छत्तीसगड- भाजप 6 कांग्रेस 5

एवढा दणदणीत विजय मिळवत भाजप ला सीट देऊन बहुमताकडे हे राज्य घेऊन गेले

हे सगळे सांगणे ह्या करिता आहे कि मतदार राजा हा फार हुशार झाला आहे त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा पॅटर्न वेगळा ठेवतो व एक सक्षम नेतृत्व निवडतो व तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो व ईव्हीम मध्ये मत देऊन हिशोब चुकता करतो

हे आज आपल्या देशातील मोठ्या मोठ्या पत्रकारांना कळु नये? मोठ्या मोठ्या पंतप्रधान चे स्वप्न पाहणारेंना कळत नाहीये का ?

जनतेशी नाळ जोडली गेली असेल तर ह्यापुढे आपण जनतेत रहाल. जनतेसाठी काम कराल तरच जनता मतदान करेल त्यामुळे आता सर्व राजकिय पक्षांनी आपला गिअर बदलला पाहिजे ज्यांनी तो बदलला ते आज सिंहासनावर आहेत. बाकीच्यांनी तो लवकर बदलायचा प्रयत्न करावा नाहि तर ह्या विकासाचा बदलत्या काळात दिसेनासे व्हाल व जनतेची फसवणुक करणारेंनी तर हे लक्षात ठेवावे

आपलाच मित्र
विवेक बधान
9420003175

मांडणीसमाजराजकारणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षालेखअनुभवमतमाहिती

प्रतिक्रिया

विवेक9420's picture

28 Feb 2020 - 12:27 am | विवेक9420

मतदार हुशार झालेत ?

दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर.
आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे.

असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोलत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे.
कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे. जर तो कळाला असता तर असे विश्लेषन केले नसते किंबहुना परिस्थिती मधील फरक नक्कीच केला असता.

पन ह्या सगळ्या वृत्त कथनात भाजपचा कायमच विरोध करणारे एका पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे एक ट्विट खुप बोलके आहे व ज्यावर आजचा हा मेसेज मला करावासा वाटतो अर्थात तो ट्विट मि शेवटी टाकतो

मतदार हुशार झाला का ?

हो. मतदार हुशार झाला आहे व एकदम समजदार पन झाला आहे. मतदार राजा हा प्रत्येक निवडणुकीत आपला मतदान करताना एक ठराविक पॅटर्न ने मतदान करत आहे

मग ती निवडणुक ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, राज्याची असो वा देशाची
* त्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे ?
* मुख्य प्रतिस्पर्धी मधील लोकांचा मागील काळात केलेली काम कोणती
* निवडुन आलेला लोकांचा कामातुन व्यक्तीगत ,समूहाला,जातीला झालेला फायदा व त्या पलिकडे देशाला झालेला फायदा

तो ह्या सर्व फॅक्टर मनात ठेवुन मतदान करतो व प्रत्येक निवडणुकीत ह्या वरील गोष्टी विचारात घेतो पन निवडणुकी प्रमाणे त्याचे हे फॅक्टर कमी अधिक होत असता

उदाहरण द्यायचे झाले म्हणजे

* ग्रामपंचायतीचा ईलेक्शन असताना माझा समुह माझी जात भाऊबंदकी फॅक्टर जास्त असते व महत्वाचे असते माझा फायदा कोण करवुन देणार माझा भाऊबंदकी मध्ये,समुह,जाती,समाजपैकी ह्याचा विचार जास्त असतो व देशाचा विचार थोडा कमी असतो पन

* राज्यांचा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी पैकी राज्याचा हिताच कोण, राज्यामधील प्रतिस्पर्धी , पार्टींची विशिष्ट समूहाने झालेली ओळख ह्या पद्धतीने जास्त विचार केला जातो व ह्या निवडणुकीत पन देशाचा विचारापेक्षा राज्याचा विचार जास्त केला जातो व व्यक्तीगत फायदा कोन जास्त करून देईल ह्यावर लक्ष असते

* देशाचा निवडणुकीत मात्र मतदार देश आणि देशाचा विचार करतात त्यात समुह,जात,राज्याचे नेतृत्व हे विषय गौण असता पन देश,धर्म व प्रतिस्पर्धी पैकी देशा साठी कोन चांगले हा विचार केला जातो

हि मानसिकता सर्वप्रथम वाचकांचा नजरेत आणुन द्यायची आहे

आता हे एवढे सांगण्यामागे तात्पर्य एवढेच आहे कि आता मतदार झाला आहे जागृक व तो आता ह्या पुर्वीचा जात पंथ धर्म ह्याचा सिमा ओलांडायला लागला आहे त्याला महत्व कमी द्यायला लागला आहे व आपल्यासाठी (देश व स्वतः) उपलब्ध पर्यायांपैकी कोण जास्त चांगले ह्याचा विचार तो करत आहे

दिल्ली राज्याचा विधानसभा व लोकसभेचा ईलेक्शन निमित्त तो पॅटर्न दिसला.

# 2019 लोकसभेचा निवडणुकीत भाजपने 2014 प्रमाणे 7 सीट घेत दिल्लीत 7-0 अशी धुळ विरोधकांना चारली

विशेष म्हणजे 56.68% टक्के मतदान भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला तर 22.46% घेत कांग्रेस दुसरा तर 18% मतदान घेत आप तिसरा

कारण लोकसभेत मुकाबला होता तो
नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी
व मतदारांना ह्या दोघापैकी कोन चांगला तो निवडायचा होता

दिल्ली चा मतदारांनी नरेंद्र मोदी एक सक्षम ऑप्शन स्विकारून 7 शीट मोदींचा नावाखाली भाजप ला दिल्यात

मात्र तेच दिल्लीचे मतदार,तीच यंत्रणा,तेच पक्ष व 6 महिन्याचा अवधीनंतर झालेला विधानसभा ईलेक्शन मध्ये आप पक्षाचा विजय होतो व 54% मतदान घेऊन आप पक्ष क्रमांक एकचा पक्ष होतो 40% मतदान घेऊन भाजप 2 नंबर तर कांग्रेस फक्त 5% मत घेऊन 3 नंबर मिळवते

म्हणजे लोकसभेतील क्रमांक एकचा भाजप विधानसभेत 2 नंबर जातो

लोकसभेत क्रमांक 2 चा कांग्रेस विधानसभेत 3 नंबर ला जात

लोकसभेत क्रमांक 3 चा आप पक्ष
विधानसभेत क्रमांक एकचा होतो

असा का झाल ? कारण विधानसभेत लढत झाली ते

अरविंद केजरीवाल विरूद्ध ईतर

ज्यात केजरीवाल समोर अतिशय कमजोर स्थानिक दिल्ली भाजप चे अध्यक्ष मनोज तिवारी व शोधुन पन सापडणार नाही लवकर असे कांग्रेस चे नेतृत्व

मतदारांनी नेहमीच एक सक्षम व कणखर नेतृत्व स्विकारले आहे म्हणुन ते वेगवेगळ्या निवडणुकीत उपलब्ध पर्यायांपैकी जो उत्तम पर्याय आहे त्याला निवडता पक्ष न बघता

ह्याला जोडुनच उदाहरण द्यायचे म्हणजे 2018 मध्ये राजस्थान , मध्य प्रदेश , छत्तीसगड निवडणुकीत भाजप चा सपशेल पराभव स्थानिक नेतृत्वा विरूद्ध असलेला नाराजी मुळे झाला. घोषणा दिल्या गेल्या वसुंधरा तेरी खैर नाही पर मोदी तुझसे बैर नाही

6 महिन्यानंतर 2019 मध्ये

त्याच राज्यांमध्ये लोकसभेत
राजस्थान - भाजप 24 कांग्रेस 1
मध्य प्रदेश- भाजप 28 कांग्रेस 1
छत्तीसगड- भाजप 6 कांग्रेस 5

एवढा दणदणीत विजय मिळवत भाजप ला सीट देऊन बहुमताकडे हे राज्य घेऊन गेले

हे सगळे सांगणे ह्या करिता आहे कि मतदार राजा हा फार हुशार झाला आहे त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा पॅटर्न वेगळा ठेवतो व एक सक्षम नेतृत्व निवडतो व तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो व ईव्हीम मध्ये मत देऊन हिशोब चुकता करतो

हे आज आपल्या देशातील मोठ्या मोठ्या पत्रकारांना कळु नये? मोठ्या मोठ्या पंतप्रधान चे स्वप्न पाहणारेंना कळत नाहीये का ?

जनतेशी नाळ जोडली गेली असेल तर ह्यापुढे आपण जनतेत रहाल. जनतेसाठी काम कराल तरच जनता मतदान करेल त्यामुळे आता सर्व राजकिय पक्षांनी आपला गिअर बदलला पाहिजे ज्यांनी तो बदलला ते आज सिंहासनावर आहेत. बाकीच्यांनी तो लवकर बदलायचा प्रयत्न करावा नाहि तर ह्या विकासाचा बदलत्या काळात दिसेनासे व्हाल व जनतेची फसवणुक करणारेंनी तर हे लक्षात ठेवावे

राजदिप सरदेसाई ट्विट करून म्हणतात

" To those who see this AAP win as the beginning of the end of MO-Shah, here is a statutory warning ;have LS election today and every chance that BJP will dominate Delhi. Voter is making a clear distinction between LS and VS polls "

हे ट्विट निकालाचे दिवसाचे आहे

आपलाच मित्र
विवेक बधान
9420003175

चौकस२१२'s picture

28 Feb 2020 - 3:10 am | चौकस२१२

फारसे झालेत असे वाटत नाही तसं असता तर महाराष्ट्रात असा त्रिशंकू नसत केलं स्वतःचं पायावर धोंडा ..अरे काँग्रेस तर कॉग्रेस ला १५० द्यायचे ना
भरपूर व्यक्तिपूजा, जात आणि धर्मवर आधारित मतदान हीच सर्वात मोठ्या लोकशाही ची लक्षणे आहेत

उत्तम झाले की महाराष्टात त्रिशंकू विधानसभा आली ते. कीत्येक गोष्टी समजल्या अथवा उघडकीस आल्या.

जसे की -
१. भाजपा साठी सुद्धा सुचिता चारीत्र्य या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. सत्तेसाठी वेळ आली तर ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्यबरोबर संसार करायला उतावळी आहे.
२. शब्द देउन मोडायला अजीबात शरम वाटत नाही.
३. उद्धवकडे असलेले नेतृत्वाचे गुण, व त्रिशंकू आघाडीचे नेतृत्व करायची क्षमता.
४. सत्ता गेल्यावर भाजपा नेत्यांचा सुटलेला तोल.

हे सगळे बघुन पुढच्या विधानसभेच्या वेळी भाजपाला मत द्यायचे की नाही याचा पुर्नविचार करायची वेळ आली आहे. लोकसभेसाठी सध्यातरी मोदीच.

दुर्गविहारी's picture

28 Feb 2020 - 12:33 pm | दुर्गविहारी

शतशः सहमत !

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Feb 2020 - 2:33 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत. केंद्रात मोदीना मत देऊ. राज्यात भाजपने चांगले नेतृत्व दिले तर राज्यातही.

Rajesh188's picture

29 Feb 2020 - 7:51 pm | Rajesh188

Bjp aani sena एकत्र लढली होती आणि त्या युती का निर्विवाद बहुमत मिळालेले आहे.
पण स्वार्थ आड आला आणि सर्व निती मूल्य गुंडाळून जनतेनी नाकारलेले सत्तेत आले

चौकस२१२'s picture

28 Feb 2020 - 9:27 am | चौकस२१२

हे आपण म्हणता तसे उघडकीला आले हे जरी खरे असले तरी माझा अर्थ वेगळाच होता ... लोकशाही आणि मतदाता सुजाण आहे का याचं वर चर्चआ चालली होती "त्यात काँग्रेस कि दुसऱ्या कोणाला १५०" याचा शब्दशः अर्थ घेतलात कि काय?
स्पष्ट बहुमत किंवा द्विपक्षीय तुल्यबळ हे सर्वसाधारण अनेक वेस्टमिनिस्टर संसदीय लोकशाहीत जगात बघायला मिळत ते ना दिसत असे त्रांगडे म्हणेज अपरिपक्वता असे मला वाटते ....आणि ते मी मांडत होतो
बरं ते बाजूला ठेवू माफ करा पण आपल्यासारखा जेव्हा म्हणतो कि :केंद्रात मोदींच" याचा अर्थ व्यक्तीला मत? कि पक्षाला? आणि पक्षाच्या धोरणाला... ?संसदीय लोकशाहीत जरी आजकाल पंतप्रधानांची निव्द्नुक जणू काही अमेरिकेतील अध्यक्षीय पद्धती प्रमाणे होत असली तरी तांत्रिक दृष्ट्या आपण पक्षाच्या धोरणांना मत देत असतो.. ना? निदान केन्द्र पातळीवर तरी
त्यामुळे अगदी भले भले म्हणजे परेश रावलं सारखे "मी मोदींचं बाजूने " असे म्हणतो तेव्हा मला आश्चर्य वाटते ..कारण शिकलेल्या माणसाने तरी "मी आधी पक्षाला पाठिंबा देतो" असे म्हणे अपेक्षित असते, परिपक्व मतदार असेल तर ! आणि मग "व्यक्ती पण चांगली असल्यामुळे त्याला पण" असे म्हणावे हवेतर ...
आपल्या समाजातील घराणेशाही आणि व्यक्तिपूजा हि जर बाहेरून पाहिलं तर खरंच खूप हास्यास्पद वाटते ,, "साहेब जिथे तिथे आम्ही" आणि मग एका रात्रीत जर "साहेबानी" १८०° पक्ष बदलला तर त्याचे आपल्याला काहीही वाटत नाही... काय हे ! हि कसली परिपकवता आणि सुजाण पणा?

नेत्रेश's picture

28 Feb 2020 - 12:22 pm | नेत्रेश

पण नंतर विचार केला की समहा जर उद्या मोदी काँग्रेसचे अध्यक्ष झाले व काँग्र्सकडुन पंतप्रधानपदासाठी उभे राहीले तर मी मत कुणाला देईन?
मला वाटते की मी त्या परीस्थीतीत काँग्र्सला मत देईन. कारण पक्षाची ध्येय धोरणे ठरवणे आणी रावबणे हे त्यांच्याच हातात असेल. व मोदीनीं माझा व मला वाटते बहुसंख्य लोकांचा विश्वास जींकला आहे. (तसेच उद्या मोदी जाउन दुसरा कुणी त्यांच्या जागी आला तर मी भाजपाला मत देइन याची खात्री नाही)

म्हणुन केंद्रीय निवडणुकीत आपले मत मोदींना, व पर्यायाने भाजपाला.

चौकस२१२'s picture

28 Feb 2020 - 6:24 pm | चौकस२१२

म्हणजे हि व्यक्तिपूजा नाही का? भाजप किंवा काँग्रेस च्या मूळ स्वभावाला तुम्ही मत देत नाहीत ...म्हणजे माझा मुद्दा सिद्ध झाला !

पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो. नेता बदलल्यावर पक्षाच्या ध्येय धोरणात फरक पडतो. पण तरीही कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली.

आपला ज्याचावर विश्वास आहे अशा नेत्याला निवडुन आणण्यासाठी त्याच्या पक्षास मत देणे ही ही व्यक्तीपुजा असेल तर ठीक आहे.

मुळात माझा प्रतीसाद तुम्हाला विरोध करायला नव्हता, तर फक्त माझी भुमीका स्पष्ट करण्यासाठी होता.

पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो!
१) थोड्या नप्रमाणात पण जर बळकट आणि प्रगल्भ "पक्ष रचना असेल" तर हे फारसे होत नाही, इतर देशात हे मी पहिले आहे म्हणून हा मुद्दा , भारतात व्यक्ती निहाय पक्ष असल्यामुळे जास्त होते .
"संधी नाही म्हणून माझा नवीन पक्ष" अशी जिथे व्यवस्था तिथे तत्व निहाय पक्ष कसे रुजणार ?
उदाहरण राज ठाकरेचा मनसे हा व्यक्तीनिहाय पक्ष आहेt कधी तो डावा असले कधी उजवा.. नेम नाही कारण एका व्यक्तीवर अवलंबून
तेच भाजप, मूळची काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे "विचार " निहाय पक्ष असल्या मुळे त्यात जरी नेता बदलला तरी धोरणात एकदम १८०° बदल होण्याची शक्यता कमी
कानडा , ऑस्ट्रेलिया सारख्या डावे उजवे असे सरळ भेद असलेल्या संसदीय लोकशाही असे होताना दिसत नाही कारण "डावे, उजवे आणि आज काल हिरवे ( पर्यवर्णवादी ) अश्या मूळ तत्वांवर अदाहरित पक्ष आणि त्यानुसार त्यांचे वागणे . कोणी इथे एकदम रेल्वे इंजिन सोडून एकदम भगवा पक्ष झेंडा बदलत नाही . आणि हे माझ्यामते परिपक्व समाजाचे आणि मतदारांचे लक्षण आहे ..
2) "कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली." बरोबर पण मी तसे कुठे म्हणतो आहे? मतदार म्हणून तुम्ही कोणालाही मत देऊ शकता . माझा मुद्दा केवळ हा आहे कि मत हे पक्षाच्या विचारसरणी ला देतो बहुतेक ... जर तुम्हाला भाजप हा फॅसिस्ट वाटत असेल तर मोदी असोत किंवा बाजपेयी एक पक्ष म्हणून तो फॅसिस्ट असला पाहिजे ना तुमचं मनात ! एकदम मोदी चांगले प्रशासक म्हणून तुम्ही हि मूळ गोष्ट कशी विसरू शकता ? आणि ती विसरयाला तयार असाल तर मग सरळ सरळ व्यक्तिपूजा हे मान्य करावे लागेल .
भारतीय संदर्भात म्हणायचे झाले तर जर कोणी एखाद्या वर्षी भाजप च्या मतांशी सहमत असेल तर नेता मोदी असोत किंवा महाजन असते किंवा सुब्रमण्यम स्वामी तो मतदार "पक्षाचा " विचार करून तसे मत देतो... अर्थात याचाच अर्थ दार वेळी त्याने भाजपलाच मत दयावे असे नाही.
म्हणूनच म्हणले मी आधी कि जेव्हा परेश रावळ सारखा सुजाण नागरिक फक्त मोदी म्हणून भाजप म्हणतो ते जरा विचित्र वाटते

मला वाटते हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा ..

महासंग्राम's picture

28 Feb 2020 - 12:01 pm | महासंग्राम

गणू एक चीज पॉपकॉर्न आण रे, धाग्याचं चीज करायचं आहे

आजचा मतदार शहाणा झाला आहे असे वाटत नाही.
स्वतःचे हित कशात आहे हेच मतदार ना माहीत नाही मग शिक्षित मतदार असतील किंवा अशिक्षित.
निवडणुकीचा प्रचार जेव्हा राजकीय पक्ष करतात तेव्हा लोकांची मानसिकता काय आहे ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो शास्त्रीय पने.
मग लोकांना जे आवडेल त्याची यादी केली जाते.
पण ती एकच नसते प्रत्येक भागातील ,जाती मधील,धर्मा मधील,आर्थिक वर्गा नुसार प्रयेकाची अपेक्षा वेगळी असते पण ह्या सर्व वर्गातील अपेक्षा ह्या कॉमन नसतात.
इथेच खरी मेख आहे.
मतदार हा विभागलेला असतो त्यांना एकमेकांना समोर उभे करून आणि कोणाचीच गरज पूर्ण न करता फक्त भावनिक आव्हान करून निवडणूक आरामात जिंकता येते .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Feb 2020 - 2:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मतदार वेगळ्या प्रकारे विचार करतो. मात्र मतदार टोकाच्या विखारी, विषारी प्रचाराला सहसा बळी पडत नाही असे दिसून येते.लोकांना त्यांच्या कपड्यावरुन ओळखा, निदर्शन करणार्या लोकांना करंट लागु द्या.. असली विखारी भाषा दिल्लिकर मतदाराला आवडलेली दिसत नाही.

चौकस२१२'s picture

28 Feb 2020 - 6:44 pm | चौकस२१२

जो समाज/ मतदाता केवळ भावने पोटी एखाद्य पक्षाला केंद्रात ४०० एवढे अति टोकाचे बाहुबल देतो ( राजीव गांधी , इंदिराजींच्या हत्येनंतर ) तो कसा काय सुजाण?
अजित पवारांनी जे काय इकडवून तिकडे केले ( स्वतःच्याच पक्षाला अडचणीत टाकले) त्यांना परत उप मुख्यमंत्री पदावर बसवल्यावर सुद्धा समाजाला काहीच वाटत नाही तो मतदार कसा सुजाण?
जिथे युनियन ( कामगार चळवळ ) हि मूळ तत्वापेक्षा व्यक्तीवर चालते ( डॉक्टर सामंत सेने) तो समाज कसा काय सुजाण?
एखाद्याला पोलिसांनी गुन्हा केल्याचं संदर्भत आरोप म्हणून पकडले तर तो लगेच दोषी आहेच असे गृहीत धरून समाज आणि माध्यमे वक्तवये करतात तो समाज कसा काय सुजाण? गुन्हा नायलायात सिद्ध होई पर्यंत आरोपी हा / हि निर्दोष समजली जाते हे माहित नाही?
"पुढच्या पिढीला राजकारणात एकाद्या nata सारखे "लाँच केले जाते आणि लगेच त्या अनुभव नसलेल्या केवळ वडिलोपार्जित खुर्चीत येऊन बसलेला किंवा बसलेली व्यक्तीला डोकयावर घेतो तो कसलं सुजाण मतदार??
आपली लोकशाही घराणेंशी आणि व्यक्तिपूजेवर आधारित आहे ते कमी होत नाही तो पर्यंत मतदार हुशार आहे असे गृहीत धरणे बरोबर वाटत नाही

शा वि कु's picture

28 Feb 2020 - 10:03 pm | शा वि कु

सुजाण कि अजाण हे व्यक्तिसापेक्ष वाटतं, पण प्रत्येक मुद्द्याशी पुरेपूर सहमत

देशाचं खंबीर नेतृत्व करणारा नेता चांगला का तुमचे वीज/ पाणी बील अर्धे करणारा नेता चांगला?
लोकल लेवलला हाच विचार असतो. पक्ष गेले उडत.

चौकस२१२'s picture

1 Mar 2020 - 3:35 pm | चौकस२१२

स्थानिक पातळीवर हे मुद्दे महत्वाचे ठरतात हे मान्य ( दिल्लीचे उदाहरण ) माझा मुद्दा हा लांबवरच्या पक्षीय धोरणांचा/ त्यावर बेतलेली मत देणे अथव ना देणे हि प्रक्रिय या सामाजिक "विचारसरणी " बाबत होता ... जेव्हा आपण म्हणतो "भारतीय मतदार जाणता झाला हो" तेव्हा या विधानाची पडताळणी मी करीत होतो होतो
आपण जेव्हा परिपक्व / जाणता मतदार म्हणतो तेव्हा केवळ भावनेवर / घराणेशाही वर आणि व्यक्तिपूजेवर अदाहरलेले मतदान करणारा मतदार हा "जाणता" कसा?
जागतिक पातळीवर जर बघायला गेला तर दुर्दैवाने असे दिसते कि जगातील सर्वात मोठीही लोकशाही हे बिरुद बिरवणारी भारतीय लोकशाही अजून हि "जाणती" झालेली दिसत नाही ... क्षमा यात परत भारत आणि भारतेतर हा मुद्दा आणला पण ४ देशातील लोकशाही अनुभवल्यावर बोलतो.. आधी दिलेली उद्धरणे मला वाटते बोलकी आहेत !
बरं स्थानिक मुद्दे इतर देशात नसतात असे नाही ... समजा एखादी खाण सुरु करणे यावर जर स्थानिक जनतेला ते नको असेल तर तेथील मतदार आपल्या पारंपरिक मतदानाच्या विरुद्ध मतदान करतो , किंवा जमेल तसे आपल्या आवडीच्या पक्षाला सांगू पाहतो कि हे करू नका... पण फारच कमी वेळा "हे साहेब / हे दादा " आणि ते कुठे का असेनात आम्ही जन्मभर त्यांनाच मत देणार असे फार कमी दिसते ... हीवृत्ती "जाणत्या " मतदाराची कशी काय?

एकेका भागाचा स्वार्थ असतो. तिथले मतदार तो स्वार्थ जपतात. मतदिर हचशार झालेले नाहीत, हुशारच आहेत.

*मतदार हुशार झालेले नाहीत, *हुशारच आहेत.