तारांमध्ये बारा राशी
सप्तवारामध्ये रविससी
यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया..
मिसळपाव परिवारातल्या समस्त मराठी जनांना मराठी राजभाषा दिनाच्या मऱ्हाटमोळ्या शुभेच्छा !
मराठी बोलूया, मराठी जपूया, मराठी वाढवूया !
हे आपलं मिसळपावडॉटकॉम चं ट्विटर खातं ज्यांना शक्य असेल त्यांनी लाईक आणि रिट्विट करा. आणि #मिसळपावडॉटकॉम हा हॅशटॅग वापरायला विसरू नका.
फोटो क्रेडिट : ट्विटर
सोबतच आपले मराठी बोलण्याचे अनुभवही पोस्ट करा, सगळ्यांना ऐकायला जरूर आवडेल.
माझा मराठीचा अनुभव :
आज मराठी राजभाषा दिनानिमित्त दोन वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला.
त्याचं झालं असं कि, त्या दिवशी रविवार होता. रामराया जन्मला अश्या त्या टळटळीत दुपारच्या वेळी बाजीराव रस्त्यावर सायकल वरून उंडगत होतो.
समोर विश्राम बाग वाडा दिसला, पुण्यात गेली ७ वर्षांपेक्षा जास्त ह.मु. असला तरी
'विश्रामबाग वाडा' पहायचा राहून गेला होता, तेव्हा तिथे आत गेलो. आत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं. भारतीय नागरिकणा 10 रुपये आणि परदेशी नागरिकांना 200 रुपये असा दर आहे. तिथे एक परदेशी मुलगी तिकिटासाठी भांडत होती.
तिचं म्हणणं होतं मी गेली चार वर्षे पुण्यात राहते, इतकं चांगलं मराठी बोलू शकते तरी मला दोनशे रुपये तिकीट का ? सवाल रोकडा होता.
शेवटी बरीच चर्चा झाल्यावर तिथला व्यवस्थापक नेहमीच्या दराने तिकीट द्यायला तयार झाला. आता यात तुम्ही म्हणाल वेगळ काय तर वेगळपण हे जितका वेळ ती तरुणी त्या माणसासोबत वाद घालत होती, तिचं ते संभाषण पूर्णपणे मराठीत झालं
माझ्यासाठी मराठी भाषेचा याहुन मोठा गौरव काय असेल
प्रतिक्रिया
27 Feb 2020 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
(मराठी भाषिक)
27 Feb 2020 - 11:24 am | तुषार काळभोर
रोचक अनुभव.
त्या तरुणीचे कौतुक व अभिनंदन.
27 Feb 2020 - 11:31 am | प्राची अश्विनी
+११
27 Feb 2020 - 11:51 am | कुमार१
वा, छान
+११११
27 Feb 2020 - 1:24 pm | चौथा कोनाडा
वा, भारी अनुभव !
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!
27 Feb 2020 - 1:35 pm | श्वेता२४
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!
27 Feb 2020 - 1:56 pm | प्रचेतस
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
27 Feb 2020 - 2:34 pm | नूतन
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
27 Feb 2020 - 2:46 pm | कुमार१
आवाहन
मी गेली ३० वर्षे माझी स्वाक्षरी मराठीत करतो.
असे मराठी लोक अगदी अल्पसंख्य आहेत, निदान शहरांत तरी असे निरीक्षण.
एक आर्थिक व्यवहारातली इंग्लीश सही सोडून द्या, पण अन्यत्र करतांना तुम्ही ती देवनागरीत कराल ?
27 Feb 2020 - 4:07 pm | महासंग्राम
मी एक दोनदा प्रयत्न केला होता मराठीतल्या स्वाक्षरीचा पण पुलंना जशी जमायची तश्या प्रकारची काही जमली नाही मला
27 Feb 2020 - 8:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सर्वाना शुभेच्छा.
अकुंचा एखादा लेख येइल असे वाटले होते-
परवा लखनौकर नावाचा मित्र भेटला...
प्रोपर लखनौचा ..
गप्पा मारताना त्याला म्हणलो माझे पण ३-४ लखनौकर आडनावाचे दोस्त आहेत..
काहि फेसबुकावर पण आहेत..
त्यावर तो म्हणाला ते लखनौकर वेगळे ,आम्ही वेग्ळे
म्ह्णजे??
ते हिंदीमिश्रीत मराठी बोलतात ..आमचे मराठीमिश्रीत हिंदी
त्यांच्या संधी/समास निराळे आमचे निराळे..
काका तुम्ही "अग्गबाई सासूबाई "सिरियल बघता का?
बघतो ना....
त्यातली आसावरी आनुनासिक मराठी बोलते तसे आम्हि घरी एकमेकाशी बोलतो...
भोजपुरी व मैथिली हा प्रकार बिहारमध्ये असतो..तसाच तो मराठीत आहे हे ऐकुन मजा वाटली..
किति विविधता आहे..ना?
27 Feb 2020 - 8:47 pm | सस्नेह
माई तुम्हाला आणखी किती मित्र आहेत ?
तुमचे 'हे' सोडून ?
27 Feb 2020 - 8:48 pm | सस्नेह
छान लिहिलंय.
सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.