ट्रम्प व्हिझिट पुणे

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
24 Feb 2020 - 3:07 pm

माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन

मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत

रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद. शेवटी PMT ने शनवार पेठेतल्या खोलीकडे रवाना.

९ वाजता मोतीबागातील चहा आणि श्रीकृष्ण मिसळ यांचा नाश्ता आणि मेलानिया वाहिनी सोंबत तुळशीबागेत खरेदी.

११ वाजता पुणे मनपा मधील कर्मचायांसोबत सोबत कामचुकार पणा कसा करावा यावर २ तास चर्चा (यात फेरीवाले, वाढवलेले फुटपाथ, अवेळी सोडणारे पाण्याचे नळ इ. चा समावेश)

१२.५५ ला वाडेश्वर इडली सांबार.

एक ते चार झोप.

४.१५ तिलक चा चहा

४.३० वाजता कर्वे सस्त्यावर मेट्रोच्या गर्दीत ऑटोतून भव्य रोड शो द्वारे कोथरूड कडे प्रयाण.

५ वाजता कोथरूड चे निब्बा आजोबा यांच्याशी बे एरिया मधले होणारे संस्कृतीक अधपतन आणि उपाय यावर चर्चा

६ वाजता सुदामा बार अँड रेस्टॉरंट येथे लिटिल लिटिल श्रम परिहार

आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते नागपूर असा प्रवास

नागपुरास पहाटे लोकमत चौंकातला चना पोहा खाऊन दिल्लीस प्रयाण

#ट्रम्प_तात्या_जिंदाबाद

टीप : आपण पण यात आपल्या परीने भर घालू शकता

मांडणीभाषासमाजजीवनमानआईस्क्रीमआरोग्यइंदुरीप्रवासभूगोलदेशांतरराहती जागाव्यक्तिचित्रणविचारआस्वादशिफारससल्लामाहितीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

24 Feb 2020 - 5:13 pm | चौथा कोनाडा

हा .... हा ..... हा ..... !

शिवाजीनगर स्टेशन ते आकुर्डी रेल्वेस्टेशन लोकलने प्रवास याचाही अंतर्भाव करावा ही णम्र इनंती ! _/\_

मस्त !

महासंग्राम's picture

25 Feb 2020 - 9:43 am | महासंग्राम

तिकडची मेट्रो सुरु झाल्यावरच तिकडे चक्कर टाकू असं तात्यांच्या खासगी सचिवांनी कळवलंय

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Feb 2020 - 5:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सोने खरेदीसाठी मेलेनिया/इवान्का व मुक्ता बर्वे/म्रूणाल कुलकर्णीसोबत रिक्शाने लक्ष्मी रोडला रवाना. ईवांका पु.ना. गाडगीळमध्ये तर मेलेनिया रांकामध्ये.

महासंग्राम's picture

25 Feb 2020 - 2:48 pm | महासंग्राम

माई माई माई मृणाल कुलकर्णी म्हणजे आमच्या आप्पांची लाडकी नात आणि माधवरावांची सिरियलीत झालेली रमाबाई
तिला कुठे ट्रम्प च्या बायडीसोबत पाठवता

कंजूस's picture

24 Feb 2020 - 6:43 pm | कंजूस

१)अमृततुल्य नाही?
२)महाराष्ट्र एकस्प्रेस नागपूर ते सातारा -कोल्हापूर आहे ना?
डेक्कनने एमसटी डब्यात मारामारी नाही?
३)मंडईत भाजी खरेदी, अप्पा बळवंत चौकात अध्यात्मिक पुस्तक खरेदी?

श्रीरंग_जोशी's picture

24 Feb 2020 - 11:22 pm | श्रीरंग_जोशी

महाराष्ट्र एकस्प्रेस गोंदिया ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी आहे. तिच्या मार्गात गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, पुणे, मिरज, कोल्हापूर ही मोठी स्थानके आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीला वगळून देखील सर्वाधिक जिल्यांतून धावणारी ही ट्रेन असावी. पूर्व व पश्चिम विदर्भ, उत्तर, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र या भागांतून जाते. केवळ कोकण व मराठवाडाच सुटतात.

महासंग्राम's picture

25 Feb 2020 - 9:34 am | महासंग्राम

काका फक्त १८ तास होते आमच्या डोनु कडे त्यामुळे इतकंच

१)अमृततुल्य नाही?

तिलक चा उल्लेख केलाय ना

श्रीरंग_जोशी's picture

24 Feb 2020 - 11:27 pm | श्रीरंग_जोशी

माझीही भर -
संध्याकाळी कात्रजच्या राजीव गांधी सर्पोद्यानाला भेट व तिथल्या पांढर्‍या वाघाचे दर्शन घेऊन कात्रज तलावात नौकाविहार.
चि. बॅरनसाठी अप्पा बळवंत चौकातून अभ्यासाच्या पुस्तकांची खरेदी.
व्हाइट हाऊस, ट्र्म्प टॉवर अन मार (ए) लागो रिसॉर्टच्या कर्मचार्‍यांसाठी चितळ्यांच्या बाकरवडीची खरेदी लोकमंगलमसमोरच्या बाजीराव रस्त्यावरील चितळ्यांच्या दुकानातून खरेदी.

महासंग्राम's picture

25 Feb 2020 - 9:35 am | महासंग्राम

चितळ्यांनी पिशवीचे एक्सट्रा २० रुपये घेतले का त्यांच्याकडून :)

श्रीरंग_जोशी's picture

24 Feb 2020 - 11:30 pm | श्रीरंग_जोशी

>> आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते दिल्ली असा प्रवास

इ नॉ चॉलबे. आमार शोनार होवरा स्टेशन सोडून आझाद हिंद एक्स्प्रेस दिल्लीला ना चॉलबे ;) .

हत्ती पाहायला केरळात ( वाइनाड)जाणार नाही. हत्तींच्या ऐवजी काळी निशाणे पाहावी लागतील.

विजुभाऊ's picture

25 Feb 2020 - 9:17 am | विजुभाऊ

ते ज्ञानप्रबोधिनीसमोरचे अनारसे "सामोसेवाले: जिवाला खा जिवाला खा जिवाला खा.
ते राहिलेच की.
झालेच तर बादशाही मेस समोरच्या पाट्यांचे वाचन पण राहिलेय.

महासंग्राम's picture

25 Feb 2020 - 9:44 am | महासंग्राम

विजुभौ विजुभौ, अहो एकच पोट आहे माझ्या तात्याला इतकं खाल्यावर आग्ऱ्यास ताजमहाल ऐवजी फक्त पोटच दिसलं असतं त्यामुळे तूर्तास तो बेत रहित केलाय !

इति : मेलानिया वहिनी

श्रीरंग_जोशी's picture

25 Feb 2020 - 9:38 am | श्रीरंग_जोशी

सुर्यास्ताच्यावेळी पर्वती दर्शन व नंतर दूरवर पसरलेल्या पुण्याचे मनोहारी दर्शन.

मराठी आंतरजालावरचे जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2020 - 1:03 pm | चौथा कोनाडा


जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.


हे तर जबरदस्त अमीष आहे, आधी कल्पना दिली असती तर तात्यांनी आवर्जून मुक्काम वाढवला असता !

@श्रीरंग_जोशी _/\_

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Feb 2020 - 11:45 am | माईसाहेब कुरसूंदीकर

टिळक स्मारक मंदीरासमोर असणार्या 'व्हाईट हाउस' ह्या बिल्डिंग्समोर उभे राहून ट्रम्प ह्यांचा सेल्फी.
हिंजवडीला धावती भेट.

तिलक म्हणजे अमृततुल्य माहीत नव्हते.

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2020 - 1:20 pm | चौथा कोनाडा

TKT

ह्येच का त्ये ? गेलो आहे बहुतेक इथं एकदा !

महासंग्राम's picture

25 Feb 2020 - 2:44 pm | महासंग्राम

हो, हेच नाव जरी अमृततुल्य नसले तरी चव अगदी तशीच आहे. याच्याजवळच विनोदी अभिनेते स्व. शरद तळवलकर राहत होते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Feb 2020 - 3:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

येवले अमृततुल्य व सलगर अमृततुल्य हल्लि अनेक दिसतात. असो.
वैशाली व कॅफे गुडलकचा उल्लेख झाला नाही.

महासंग्राम's picture

25 Feb 2020 - 3:47 pm | महासंग्राम

माई, तात्या वैशालीत गेले होते, पण तिथे हि गर्दी होती, तेव्हा वाट पाहून गर्दीत मिळण्यापेक्षा आल्या पावली परत वाडेश्वरात गेले ते. आणि गुडलक ला मीच जाऊ नका म्हंटल. पूर्वीच गुडलक राहिलं नाही आता !

जुइ's picture

1 Mar 2020 - 1:41 am | जुइ

भारी आहे!

शशिकांत ओक's picture

1 Mar 2020 - 1:56 am | शशिकांत ओक

Namaste
विमाननगर, वडगाव शेरी भागातील ट्रंप टॉवर्स या आपल्या प्रापर्टीला भेट द्यायला विसरला!

मोठ्या आशेने बाकरवडी खरेदी करण्यास गेलेल्या ट्रम्प तात्यांना बाकरवडी संपली ! अशी पुणेरी पाटी वाचावयास मिळाली ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट

गामा पैलवान's picture

2 Mar 2020 - 1:45 am | गामा पैलवान

तात्याबांना लवाशात जाईचं न्हाई ? लव यू लवाशा कोण म्हन्नार मंग?
-गा.पै.