मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ट्रम्प व्हिझिट पुणे

महासंग्राम · · जनातलं, मनातलं
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद. शेवटी PMT ने शनवार पेठेतल्या खोलीकडे रवाना. ९ वाजता मोतीबागातील चहा आणि श्रीकृष्ण मिसळ यांचा नाश्ता आणि मेलानिया वाहिनी सोंबत तुळशीबागेत खरेदी. ११ वाजता पुणे मनपा मधील कर्मचायांसोबत सोबत कामचुकार पणा कसा करावा यावर २ तास चर्चा (यात फेरीवाले, वाढवलेले फुटपाथ, अवेळी सोडणारे पाण्याचे नळ इ. चा समावेश) १२.५५ ला वाडेश्वर इडली सांबार. एक ते चार झोप. ४.१५ तिलक चा चहा ४.३० वाजता कर्वे सस्त्यावर मेट्रोच्या गर्दीत ऑटोतून भव्य रोड शो द्वारे कोथरूड कडे प्रयाण. ५ वाजता कोथरूड चे निब्बा आजोबा यांच्याशी बे एरिया मधले होणारे संस्कृतीक अधपतन आणि उपाय यावर चर्चा ६ वाजता सुदामा बार अँड रेस्टॉरंट येथे लिटिल लिटिल श्रम परिहार आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते नागपूर असा प्रवास नागपुरास पहाटे लोकमत चौंकातला चना पोहा खाऊन दिल्लीस प्रयाण #ट्रम्प_तात्या_जिंदाबाद टीप : आपण पण यात आपल्या परीने भर घालू शकता

वाचन 20837 प्रतिक्रिया 0