अए खुदा, अए परवरदिगार
अमेरिकेने इराणच्या आर्थिक नाड्या आवळल्यापासून इराणमधल्या लोकांना मोहम्मद रफीच्या एका गाण्याची वेळोवेळी आठवण येत असावी ज्यात "परवरदिगार"ने किती तऱ्हेतऱ्हेच्या संकटांतून भक्तांना वाचवले याचे वर्णन आहे (https://www.youtube.com/watch?v=Rad2gbRFY8w ).
अमेरिकेच्या प्रोत्साहनाने सुरू झालेल्या (आणि चालू असलेल्या) "जागतिक आर्थिक बहिष्कारामुळे" इराणमधील लोकांवर फक्त हे गाणे गातच जगण्याची वेळ आली होती. ही संधी साधत चीननेइराणमधले आपले आर्थिक व इतर हितसंबंध वाढवत, पसरवत इराणला मदतीचा हात पुढे केला.


