एकच वादा...कोहली दादा
कोहलीचा सकाळी सकाळी "टीम इंडिया मिशन २०१९" या व्हाट्स ऍप ग्रुपवर मॅसेज,
"पोट्टेहो, आयपीएल संपली. आता नाचगाने बंद करा सायचेहो. उद्या सकाळी पाच वाजता मले सारे मैदानात पाहिजे..."
तिकडून विजय शंकरने लगोलग अंगठ्याची स्मायली पाठवून दिली.
केदार जाधवचा पण लगेच रिप्लाय..."हाव भाऊ..येतो"
बाकी कोनीच अजून मॅसेज वाचला नाही हे पाहून कोहली चिडला.
"मॅसेजही वाचून नाही राहिले ना पोट्टे.... माया दिमाग खराब करू नका"
"भाऊ चिडू नका भाऊ...मी उठवतो साऱ्यायले..", केदार जाधव
स्क्रीनवर रोहित इज टायपिंग असा मॅसेज दिसतो.
"भाऊ..ते बघा..रोहित उठला वाट्टे.."