ऍव्हेंजर आणि मी..
ऍव्हेंजर फॅन कोणी आहे का ?
एक प्रश्न आहे गरिबाला...
तो ऍव्हेंजर्स एन्ड गेम सिनेमा आलाय तो एकदम फायनल म्हणायचा का? म्हणजे विषय संपला का एकदाचा?
पुढचं लिहीण्याआधीच सांगतो, वर्षभराने 'ऍव्हेंजर्स उरलंसुरलं' नावाने सिनेमा येणार असल्यास माझी काहीही हरकत नाही. मी ऍव्हेंजर्स विरोधी नाही. आणि मार्व्हल व्हर्सेस डीसी वगैरे फंदात तर मला मुळीच पडायचं नाही. आमच्यालेखी मार्व्हेल, डीसी म्हणजे शिवसेना-मनसे आहेत. म्हणजे एकाला झाका दुसऱ्याला काढा फरक नाही.
असो.
मुद्दा एवढाच आहे की, साधारण अजून किती वर्ष हे बघायचं आहे ह्याचा एक अंदाज घ्यावा म्हटलं.