भेटीगाठी पण समाजातील रंगांच्या
आपला देश आपली संस्कृती, आपला समाज याबद्दल आपल्याला इतक्यांदा अभिमानाचे डोस पाजलेले असतात किंवा ते आपल्या अंगात इतके भिनवलेले असतात की आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला त्याबद्दलचा अभिमान दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतोच.
खर तर आपला देश म्हणजे एक "खुली किताब" आहे ज्याबद्दल सर्वच व्यक्तींना सर्व काही माहीत आहे. असाच विचार करून मी newspaper वाचायला घेतला. त्याच त्याच टिपिकल राजकारणाच्या बातम्या...!! एक दोन अपघात, बलात्कार ,खून किंवा भ्रष्टाचार यापलिकडे नवीन अस काही नसतच हल्ली..!!