संदीप खरे यांची माफी मागून....

Primary tabs

उपेक्षित's picture
उपेक्षित in जे न देखे रवी...
16 Feb 2019 - 1:02 pm

संदीप खरे यांची माफी मागून....

पुर्वी कधीतरी २६/११ च्या आठवणीत खरडले होते आज दुर्दैवाने परत आठवायची वेळ आली आहे.

आज पुन्हा मेणबत्तीवाल्यांचा धंदा तेजीत येणार.
२/४ फोटो आपणही शेयर करून देशप्रेम आहे हे दाखवून देणार.
षंढासारखे आपण राजकारण्यांना शिव्या घालून ५/५० टाळ्या मिळवणार.
म्हराटी/ दाक्षिणात्य/ उत्तर भारतीय माणूस शहीद झालेले सैनिक आमच्या प्रदेशातील होते सांगून कॉलर ताठ करणार.
मग हिंदू-मुस्लीम तेढ कसे आणि किती वाढवता येईल याची गणिते बांधली जाणार.
या गुंत्यात गरीब अजून पिचला जाणार, मध्यमवर्गीय आपण या गावचेच नाहीयोत असे समजून वागणार आणि श्रीमंत पुन्हा एकदा इथल्या व्यवस्थेला भिकार ठरवून परदेशातील सुट्ट्यांचे प्लानिंग करणार.
आणि आपण ? आपण मात्र रात्री जेवताना बायकोवर आणि आईवर डाफरून त्याच त्याच रटाळ मालिके ऐवजी न्यूज च्यानेल वरची फुकाची चर्चा ऐकत बसणार.

उपेक्षित...

मुक्तक