कॉफी आणि बरच काहि .

लौंगी मिरची's picture
लौंगी मिरची in जनातलं, मनातलं
2 Feb 2019 - 5:38 am

सकाळच्या थंडगार वार्यासोबत तुझा “दहा वाजता भेट “ मेसेज वाचुन नाजुकसं हसु आलं ( नेहेमीप्रमाणे) सवयीनेच , तेच ठिकाण
वाट बघणं आलं .

कपाळावर आठ्या पाडत विचाराधीन होणहि झालं .भेटतोय यासारखं सुख कोणतं ?बघितली थोडी वाट , तर कुठे बिघडलं डोळ्यासमोर राहिल थोडावेळ ,ओंजळीत असतिल क्षण अधिकार गाजवु थोडा , थोडा हट्ट पूरवुन घेऊ .

त्याला नाहि आवडत माझं रुसणं.हसणं आवडतं.हसतानाच मला चोरुन पहाणंहि आवडतं . त्याच्यासाठी आज रेड कुर्ता घालु व्हाईट रंगाचा पायजमा न व्हाइटच स्कार्फ घेऊ . गाडीवरुन जाताना , थोडी बोलण्याची उजळनी करु. नेहेमीप्रमाणेच असेल सगळं .हो ! माहित आहे मला.. तरिहि .

तरिहि सगळं नव्यानं अनुभवु . पून्हा तो लेट .. तसा नेहेमीच लेट,
सवय झालीये वाट पहात रहाण्याची .आला की त्याच्या अधिकारवानीची .तो येण्यापूर्वी मी कधीच ऑर्डर दिली नाहि
“एकच कॉफी घेऊ “.त्याचा शब्द मी कधी डावललाहि नाहि.
आला ना तो , कि वादळासारखा येतो.क्षणार्धात माझं अस्तित्व
स्वताहात सामावुन घेतो. नेहेमीप्रमाणे एकाच कॉफीची ऑर्डर
एक सिप मी ,माझ्या लिप्स्टिकच्या खुना शोधुन दुसरा सिप तु..
एकदा माझ्याकडे बघत ,एकदा उगाच बघुन हसत .गुंतवुन ठेवशिल तुझ्यात .

तुझ्यात ? ह्या ! मीच गुंतुन राहिन .तुझे नुसते प्रयत्न . मीच आशावाद .एकेक घोट घेत कॉफी संपते .पण तुझ्यातला चार्म संपत नाहि . दुसर्या कॉफीची ऑर्डर जाते.अजुन थोडावेळ म्हणत
माझाहि पाय निघत नाहि .

शेवटी ऑर्डर चा खेळ संपतो आणि स्वताचं जग खुणावु लागतं .
एकमेकांच्या डोळ्यातली दहाची भेट हळुहळु निरोप घेते .
“ आता पून्हा केव्हा ?“ म्हणत हातांचं हलवणहि होतं .आणि वाट पाहुन पाहुन बोलणहि होतं. आतुर , तरि त्रुप्त , ओढ तरिहि शांत

“ आता पून्हा केव्हा ?“ उत्तर दोघांच्याहि डोळ्यातच असतं .

मुक्तकप्रकटन