जसं जस वय वाढत जात तसा शरीरावर मनाचा अंकुश वाढत जातो.
मन शारीरिक क्रियांच दमन करू लागलंय.विशीतलं हस्तमैथुन आता मात्र उगाचंच अपराधी भाव मनात निर्माण करत.निव्वळ शारीरिक असलेली कामप्रेरणा नैतिकतेच्या बाता मारू लागते तेव्हा स्वतःलाच आश्चर्य वाटू लागतं स्वतःचच...एफ टीव्ही वरच्या मॉडेल बघण्याचा काळ होता एक...मॉडेलशी दूर दूरवर संबंध नसताना देखील काम प्रेरणा चाळवत होत्या. तिथून सुरू झालेला तो मनाचा खेळ आज इथवर येऊन ठेपलाय... आज
मैथुन झाल्यावर कळतो त्यातला विफलपणा.... जिला कल्पून किंवा सोबत होत मैथुन ती एवढी निरर्थक का वाटते मैथुन झाल्यावर???स्वार्थीपणाची अत्युच्य सीमा म्हणावी का ही ?की सगळेच पुरुष या ना त्या प्रकारे सारखेच असतात??
सेक्स अडकलेला चांगला या नैतिकतेच्या सीमांत की उधळलेला बरा चौफेर???की मीच म्हातारा झालोय??? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यातच आयुष्य संपणार बहुधा .....