टोळीगीत इ.स. २०५०?
तुमच्या पिढ्यांच्या
अक्षम्य चुकांचे
पातक अम्हाला
रोज भोगायचे
रोज बघायचे
भेसूर रुपडे
भकास पृथ्वीचे
अभद्र कार्बनी
पाऊल ठशांचे
विटल्या फाटल्या
ओझोन थराचे
गटारगंगांचे
विखारी धुराचे
अवकाळी वृष्टीचे
जखमी सृृृष्टीचे
सिमेंटी जंगलांचे
भेगाळ भूमीचे
मरणपंथाच्या
हरितवनांचे
थांबा थांबा ऐका
चीत्कार कुणाचे?
पाण्याचा टँकर
पळवून आणल्या
मरणासन्नांच्या
आमच्या टोळीचे!