मुक्तक

तांब्याश्री

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
26 Aug 2018 - 7:38 pm

तांब्याश्री

ऋणनिर्देश : मिपावरील सूप्रसिद्ध ( कि शीप्रसिद्ध म्हणावे ब्रे) तांब्याश्रीं पासून प्रेर्र्रना घेऊन खटपट करून जमवलेले मोकल शौचाव्य.
थीमनिर्देश : अशा प्रकारच्या विषयासाठी मूळ कवीचा नामोल्लेख टाळला आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

मिशेरी लावता लावता, जोरात कळ आली
अरे पुन्हा उचल तांब्या, पोट कर ते खाली ॥धृ.॥

आम्ही दार उघडण्याची वाट किती बघावी
कडी वाजवुनी जोरात घाई सूचित करावी
साहवेना प्रेशर आता, कशी दाबूनी धरावी ॥१॥

काहीच्या काही कविताजिलबीमुक्त कवितामुक्तकविडंबन

संडास.

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
23 Aug 2018 - 7:16 pm

संडास

नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी मिपावर लेखन करतोय. आणि पुनरागमनासाठी विषय आहे संडास.
काहीलोक लेखाचं नाव वाचूनच नाकं मुरडतील. मला एक कळत नाही संडास सारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलायला लोक लाजतात किंवा घाबरतात का? तसं पाहायला गेल्यास संडास ही आपल्या रोजच्या जीवनातील अतिशय महत्वाची क्रिया पण त्यावर किंवा संडासच्या समस्यांवर बोलायला लोक तयार नसतात.

शी!!! संडास वर मेलं काय बोलायचं!!!

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविरंगुळा

ठाणे कट्टा २५ ऑगस्ट

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
23 Aug 2018 - 12:16 pm

आमंत्रणपत्रिका

बृहन्मुंबई (मुंबई ठाणे डोंबिवली बोरिवली नवी मुंबई अंतर्भूत) चा पावसाळी कट्टा २५ ऑगस्ट २०१८ रोजी मालवण तडका लुईस वाडी पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे पश्चिम येथे सायंकाळी १९. ३० वाजता साजरा करण्याचे ठरले आहे.

ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुहास्य वदनाने आणि रिकाम्या पोटाने आपली उपस्थिती लावावी अशी नम्र विनंती आहे.

बृहन्मुंबई च्या बाहेरील लोकांचे हि सहर्ष स्वागत आहे.

तरी वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा हि विनंती.

मुक्तकप्रकटन

अज्ञाताचा गड चढताना

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Aug 2018 - 7:04 pm

अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी आली
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतिस्तव बसली
उठून गड बेलाग लांघण्या कंबर कसुनी उठली
निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढली

जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले

माझी कवितामुक्तक

समाजरचना घडताना

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
31 Jul 2018 - 1:43 pm

काल पर्यंत
हेच समजत
होतो की अमुक समाजाने
तमुकांना वाळीत टकले.
इथे एकदा समता आली
की पुढे आदर्श समाज रचना असेल

पण आज बघीतले पुन्हा कुणाला तरी
संशयावरुन वाळीत टाकले जाताना
नव्या अस्पृश्यतेची समाजरचना घडताना

रतीबाच्या कवितामुक्तक

आभाळाची छत्री

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
29 Jul 2018 - 10:18 pm

आभाळाची छत्री

माझ्या कड़े आभाळाची छत्री आहे. गुलाबी रंगाची लांब दाण्डयाची. रंग बऱ्या पैकी मळलेला आहे. गंजलेल्या तारांच्या गंजा च्या छटा त्यावर उमटल्या आहेत. कधी कधी तारा सुटतात. त्या मी परत बसवून घेतो. पाऊस सुरू व्हायच्या आधीपासून म्हणजे में पासून ते पाऊस सम्पायच्या नंतर नंतर अगदी ऑक्टोबर पर्यन्त मी त्या आभाळा च्या छत्रीला अंतर देत नाही. विसरत नाही म्हटले तरी दोन तीन दा तरी असेल छत्री दुकानात खानावळीत विसरून आलोय पण तितक्या च प्रयत्नने ती शोधूनही आणालिये. छत्री ला मी जसा विसंबत नाही तशी छत्री सुद्धा मला कधी विसम्बत नाही.

मुक्तकप्रकटन

मैत्र..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
17 Jul 2018 - 6:59 pm

अगदी अचानक काहीच न कळवता आपण मित्राच्या घरी धडकावं.
त्याने दरवाजा उघडताच त्याला बाजूला सारून आत शिरावं.
चपला पर्स फेकून खिडकीजवळच्या मऊ गुबगुबीत माऊसारख्या खुर्चीवर धप्पकन बसावं.
आपलं अगडबंब वाढलेलं वजन, परीटघडीच्या ड्रेसला पडणा-या चुन्या, खांद्यावरून डोकावत असलेला किंवा नसलेला चुकार पट्टा कसला कसला विचार मनात येऊ देऊ नये तेव्हा.
"तुझीच आठवण काढली होती मी आज बघ डेविलिणबाई" म्हणत हसत त्यानं ग्लुकोज बिस्किटं आणि पाण्याचा ग्लास पुढे करावा.
खरंतर मनात खुश होत पण वरवर "चल् काहीही खोटं" म्हणत त्याला उडवून लावावं.

कवितामुक्तक