आमंत्रणपत्रिका
बृहन्मुंबई (मुंबई ठाणे डोंबिवली बोरिवली नवी मुंबई अंतर्भूत) चा पावसाळी कट्टा २५ ऑगस्ट २०१८ रोजी मालवण तडका लुईस वाडी पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे पश्चिम येथे सायंकाळी १९. ३० वाजता साजरा करण्याचे ठरले आहे.
ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुहास्य वदनाने आणि रिकाम्या पोटाने आपली उपस्थिती लावावी अशी नम्र विनंती आहे.
बृहन्मुंबई च्या बाहेरील लोकांचे हि सहर्ष स्वागत आहे.
तरी वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा हि विनंती.
https://www.google.co.in/maps/dir/''/malvan+tadka+thane/@19.1968751,72.8919969,12z/data=!4m8!4m7!1m0!1m5!1m1!1s0x3be7b9d2d4f56bed:0x4f96ca1879360691!2m2!1d72.9620374!2d19.1968884
प्रतिक्रिया
23 Aug 2018 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे वा ! कट्ट्याला अनेक शुभेच्छा ! सचित्र कट्टावर्णनाची प्रतिक्षा आहे.
24 Aug 2018 - 8:32 am | अत्रुप्त आत्मा
प्लस वन!
23 Aug 2018 - 12:41 pm | टवाळ कार्टा
कट्ट्याला शुभेच्छा
23 Aug 2018 - 12:58 pm | कंजूस
पावसाळी कट्टा पावसातच हवा. बारवी /लोणावळा/ खंडाळा
23 Aug 2018 - 1:20 pm | टर्मीनेटर
कट्ट्याला शुभेच्छा. उपस्थित राहायला नक्की आवडले असते परंतु २५-२६ ऑगस्ट ला रक्षाबंधन निमित्त पुण्याला जाण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ह्यावेळी शक्य होणार नाही. वरती डॉक्टर म्हणाल्या प्रमाणे सचित्र कट्टावर्णनाची प्रतिक्षा आहे.
23 Aug 2018 - 2:33 pm | प्रचेतस
कट्ट्यास शुभेच्छा.
23 Aug 2018 - 2:49 pm | नंदन
कट्ट्याला अनेक शुभेच्छा. सचित्र वृत्तांत येऊ द्या!
(सहाएक वर्षांपूर्वी पॉप टेट्समध्ये गवि, रामदासकाका, सर्वसाक्षी, प्रभूमास्तर, वरुण मोहिते, विमे, स्पा, किसन, विजुभाऊ, जयपाल, क्लिंटन इत्यादी महारथींसोबत जमलेल्या धमाल कट्ट्याच्या आठवणी या निमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या)
23 Aug 2018 - 3:00 pm | सतिश पाटील
मिपावर मोजक्या प्रतिक्रिया आणि 2-4लेख याव्यतिरिक्त माझं काही योगदान नाही, तसेच मी कुणाला व्यक्तिशः ओळखतही नाही.
त्यामुळे मी आलो तर चालेल का ? नाहीतर उगाच बेगानी शादी मे अब्दुल्लाह दिवाना असं व्हायला नको.
बादवे काय काय असतं कट्टा म्हणजे ?
23 Aug 2018 - 3:27 pm | आदिजोशी
सगळे मिपाकस असेच एकमेकांना प्रथम भेटून मग मित्र झालेले आहेत. त्यामुळे नक्की या कट्ट्याला.
23 Aug 2018 - 3:27 pm | आदिजोशी
मिपाकर*
23 Aug 2018 - 6:03 pm | सुबोध खरे
@सतिश पाटील
साहेब
आपले सहर्ष स्वागत आहे. कोणताही कट्टा केला तरी त्यात दर वेळेस काही लोक अनोळखी असतातच. पण आपोआप कशी मैत्री होते ते पहा.
24 Aug 2018 - 1:39 pm | विनोद वाघमारे
पर॑तू श॑का दुर झाली.
23 Aug 2018 - 3:37 pm | सूड
शुभेच्छा!!
23 Aug 2018 - 4:42 pm | तेजस आठवले
श्रावणात सीफूड रेस्टोरंटमध्ये होणार कट्टा सात्त्विक असेल काय ? :)
23 Aug 2018 - 6:03 pm | सुबोध खरे
जो जे वांच्छिल तो ते खाओ
23 Aug 2018 - 8:41 pm | कपिलमुनी
कांदा लसूण ना घालता मासे करायला सांगा !
हाकानाका
23 Aug 2018 - 6:07 pm | यशोधरा
कट्ट्याला शुभेच्छा!
23 Aug 2018 - 6:14 pm | गवि
उत्तम.
बाकी अन्य मांसाहारी/शाकाहारी मिक्स हॉटेलांत सर्वांचं एकत्र चालून जातं पण सीफूड स्पेशल हॉटेलमध्ये माश्याचे पदार्थ चिकनपेक्षा जास्त प्रमाणात असल्याने हवेत गंध जास्त तीव्र आणि मुरलेला असतो जो शुद्ध शाकाहारी लोकांना त्रासाचा होतो असा अनुभव आहे. खुद्द अतिमत्स्यप्रेमी असूनही शक्यतो व्हेज लोकांना सोबत घेऊन मासळी फेम हॉटेल्समध्ये जाणं टाळतो.
या मुद्द्याचा विचार व्हावा.
23 Aug 2018 - 9:16 pm | सुबोध खरे
चौथा शनिवार संध्याकाळ ठरवली आहे (जेंव्हा बऱ्याच लोकांना मोकळा वेळ मिळतो) म्हणून आणि जेथे जागा भरपूर उपलब्ध आहे आणि जेथे जेवण चविष्ट आहे असे एकंदर अभिप्राय आहेत असे ठिकाण म्हणून याची निवड केलेली आहे.
याचा अर्थ सर्वंनुमतें ती बदलता येणार नाही असे नाहीच. याला चांगला पर्याय असेल तर जागा बदलता येईल.
चांगले पर्याय सुचवल्या आभारी आहोत.
मूळ हेतू लोकांना भेटणे आणि सुग्रास भोजन हा आहे.
जागा महत्त्वाची नाही
__/\__
24 Aug 2018 - 7:10 am | गवि
तुम्हाला तर माहीत आहे, मासेप्रेमी लोक एकत्र आले की हेमंतसारख्या ठिकाणीही इन्स्टंट कट्टा भरतो आणि एन्जॉयही फुलटू होतो.
ठिकाण उत्कृष्ट असेलच. ते मनापासून निवडलेलं असल्याने ते बदलण्याने नक्कीच विरस होऊ शकतो. पण योगायोगाने मजभोवती शाकाहारी लोक जास्त असल्यामुळे पूर्वी अशाच कट्ट्याचा अनुभव आणि अन्य काही मत्स्यआहारी हॉटेलांत भेट झाल्यावर पूर्णवेळ नाकाला रुमाल लावून अंकम्फर्टेबल होणं पाहिलं. एकदोघांनी स्पष्ट तसं बोलून दाखवलं. त्यांचा खुद्द काही शाकाहारी खाण्याचा उत्साह त्या वासात बसून मावळला. त्यातच खेकडा, शेवंड वगैरे मागावलेल्यांची फोडाफोडी, कवचाचे तुकडे , कड कड आवाज याने ते आणखीन अस्वस्थ होत होते.
मिश्र ग्रुप असताना असं होऊ नये इतकाच उद्देश सुचवणीमागे आहे.
शिवाय फिक्स कॉस्ट ठिकाण मिळाल्यास कट्ट्याला अजून चांगलं. (एकाच दरात अनलिमिटेड थाळी, बुफे, एन्ट्री बेस्ड जेवण (व्हिलेज, विष्णुजी इत्यादि इत्यादि)
24 Aug 2018 - 8:54 am | माझीही शॅम्पेन
मीपाकरांचे मागील काही कट्टे आयोजित / उपस्थित राहिलयवर एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती म्हणजे शाकाहारी लोक जास्त असतात त्यातून श्रावण चालू आहे , ठिकाण बदलण्याचा विचार व्हावा , पुन्हा पोप टेट्स किवा मॉल मधीलफूड कोर्टचा विचार व्हावा , पार्किंग समस्या येत नाही (इतर कामे पण होतात :) )
अर्थात तुम्ही कट्टा आयोजित करत आहात म्हणजे तुम्हीच सर्वेसर्वा आहात :)
24 Aug 2018 - 9:36 am | सुबोध खरे
घोडबंदर रोड हे लोकांना जाण्यायेण्यासाठी फार अडचणीचे होते.
यास्तव ठाणे शहर/ स्टेशनपासून रिक्षाने जाण्याच्या अंतरात जेथे शनिवारी संध्याकाळी अर्धा पाऊण तास रस्त्यावर न थांबता जागा मिळेल असे एखादे थाळी किंवा तत्सम रेस्टोरंट असेल तर त्याला आमची कुणाचीच हरकत नाही.
24 Aug 2018 - 7:11 am | प्राची अश्विनी
"मालवण" तडका म्हणजे चांगलंच असणार.:)
बाकी शाकाहारी , अतिशय चविष्ट , नेहमीपेक्षा जरा वेगळे पदार्थ, किंमती जास्त महाग नाहीत आणि सहसा ८ वाजेपर्यंत आरामात जागा मिळणारं अजून एक हाॅटेल म्हणजे मानपाड्याचं 27यार्डस.
कट्ट्याला सुरवातीला थोडा वेळ यायचा मानस आहे. 8.15 पर्यंत निघावं लागेल. त्याआधी कोणीतरी तर असेल ना?
25 Aug 2018 - 6:03 pm | सुबोध खरे
श्री वरूण मोहिते सात वाजल्यापासून तेथे हजर आहेत. बाकी सर्व येतच आहेत.
25 Aug 2018 - 6:19 pm | अभ्या..
जोरात कट्टा करा डॉक, होऊद्या फुल्ल एंजॉयमेन्ट.
तुमच्या ऑफरबद्दल थ्यांक्स अ लॉट पण भेटू परत कधीतरी. सध्या नाही शक्य. :(
जमल्यास माझ्यावतीने टक्याच्या पाठीत एक जोरदार बुक्का हाणा. लै दिवस पेंडींग आहे. मोहित्यांना पण नमस्ते सांगा.
23 Aug 2018 - 9:20 pm | अभ्या..
कट्ट्यास शुभेच्छा.
.
पाताळेश्वर परत एकदा गजबजवण्याचे मा. एक्काकाकांनी मनावर घ्यावे ही नम्र विनंती.
.
(आता कट्टाच्या ठिकाणी माझा मी येऊ शकतो ह्याची सर्व पुणेकरांनी नोंद घ्यावी हि विनम्र विनंती.)
23 Aug 2018 - 9:23 pm | सुबोध खरे
मग मुंबईस पण या
वाट खर्च देण्यात येईल.
23 Aug 2018 - 9:26 pm | अभ्या..
डिअर डॉक,
मला ते वाटखर्च शब्द खर्चापान्यासारखा का दिस्तोय हो? ;)
23 Aug 2018 - 10:34 pm | नाखु
अभ्या पुण्यात कट्ट्याला येणारे म्हणजे भारीच कि, पिंपरी-चिंचवड कर हैस ना मग ठेवू पिंपळे सौदागर नायतर प्राधिकरणात!!
23 Aug 2018 - 11:37 pm | सुबोध खरे
आता आम्ही सरळ लिवलंय त्यात बी तुम्हांसनी वाकडं दिसतंय व्हय?
24 Aug 2018 - 1:52 pm | टवाळ कार्टा
काय ते नखरे....एखादा पुणेकर तुला PMT चे तिकीट तरी काढून देईल का कट्ट्याला यायला
24 Aug 2018 - 3:41 am | कंजूस
>>माझा मी येऊ शकतो>>
पूर्वी बोट धरून यावं लागायचं?
24 Aug 2018 - 8:29 am | प्रचेतस
पुणेकरांचाही एखादा कट्टा झालाच पाहिजे.
24 Aug 2018 - 10:00 am | यशोधरा
त्या आधी तीन धागे यायला हवेत ना?
24 Aug 2018 - 10:12 am | प्रचेतस
आमचे तर धागेविरहित खाजगी कट्टे होतात ब्वॉ, तेदेखील मुक्कामी.
24 Aug 2018 - 11:04 am | यशोधरा
ब्वॉर्र हो!!
24 Aug 2018 - 8:21 pm | नाखु
मनोरंजन,विरेचन,विवेचन आणि प्रवचन करण्यासाठी अवकाश मिळावा या उद्दात्त हेतुनेच पुणे कट्टा साठी दोन तीन धागे प्रयोजन असते याची नोंद घ्यावी ही विनंती!!!
सदस्य अखिल पुणे महानगर मिपाकर गाठभेट क्षेमकुशल संघ
24 Aug 2018 - 10:21 am | टर्मीनेटर
मी पुणेकर नसलो तरी उद्या पुण्याला येणार आहे. एवढ्या शॉर्ट नोटीस वर आणखीन कोणाला जमणार असेल तर ठरवा उद्या संध्याकाळी. पुणे भेट सार्थकी लागेल.
24 Aug 2018 - 10:23 am | प्रचेतस
उद्या उशिरापर्यंत ऑफिसातच काम असल्याने उद्याचे शक्य दिसत नाही.
24 Aug 2018 - 10:27 am | टर्मीनेटर
हरकत नाही, पुन्हा कधीतरी... सध्या एक २ मेम्बर्स चा छोटा कट्टा ठरलाय वाकडला :)
24 Aug 2018 - 1:59 pm | कुमार१
24 Aug 2018 - 2:06 pm | कुमार१
24 Aug 2018 - 2:07 pm | कुमार१
24 Aug 2018 - 2:11 pm | कुमार१
सहा मासाअदुगार शनिवारवाड्या वरती
24 Aug 2018 - 1:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता तुम्ही पुण्यात उपलब्ध आहात तर, नव्या रक्ताला वाव देऊ इच्छितो. घ्या पुढाकार आणि करा जाहीर जागा व वेळ जाहीर... मिपाकर नेहमीप्रमाणे येतीलच !
24 Aug 2018 - 8:45 am | मुक्त विहारि
मी येत आहे..
24 Aug 2018 - 11:43 am | खटपट्या
अजून शाकाहारी लोक्स अस्तित्वात आहेत???
पळा....
25 Aug 2018 - 1:31 pm | कंजूस
मापं,माशाम्पेन आहे मी शाकाहारी.
भेटून परत जाईन.
24 Aug 2018 - 7:03 pm | सतिश गावडे
यानिमित्ताने मी ही बरेच दिवस मनात असलेला प्रश्न विचारून घेतो: हैदराबादला कुणी मिपाकर आहेत का?
25 Aug 2018 - 5:21 pm | नाखु
असलेल्या अज्ञात मिपाकरांना ,काही आंतरराष्ट्रीय, सामाजिक, वैश्विक आणि भाषाबंधन प्रतिबंध व सांकेतिक राजशिष्टाचार यामुळे प्रकट पणे संपर्क करु शकत नाहीत याची नोंद घ्यावी ही विनंती.
ते आपल्या समोर कुठल्याही रुपाने प्रकट होतीलच याबाबत उत्सुकता आम्हालाही आहे
नाखु पांढरपेशा मिपाकर
25 Aug 2018 - 4:55 pm | जीवना
मी व माझी पत्नी मिपाचे चाहते आहोत. आज कट्ट्यावर आलो तर चालेल का?
25 Aug 2018 - 6:00 pm | सुबोध खरे
नक्कीच
सर्वांचे स्वागत आहे. मालवण तडकाच्या गच्ची वर भेटण्याचे ठरले आहे.
25 Aug 2018 - 5:11 pm | यशोधरा
कट्ट्याचे धावते समालोचन होणार आहे का?
25 Aug 2018 - 6:01 pm | सुबोध खरे
कुणालाही लोकांशी संपर्क करण्यात अडचण आली तर मला ९८१९१७००४९ वर संपर्क करा --/\--
25 Aug 2018 - 7:29 pm | सुबोध खरे
कट्टा चालू झालाय. मी, मुवि, कंजूस भारत मुंबईकर आणि आ न गा पै आलो आहोत.
25 Aug 2018 - 7:54 pm | Nitin Palkar
कट्ट्याला गरमागरम आणि जोरदार शुभेच्छा.
25 Aug 2018 - 8:22 pm | मंदार कात्रे
कट्ट्याला शुभेच्छा.
25 Aug 2018 - 9:50 pm | ज्योति अळवणी
मनापासून शुभेच्छा... ठाणे फारच लांब आहे.... चर्चगेट ते बोरिवली भागात कधीतरी कट्टा ठरला तर नक्की आवडेल. सर्व मिपाकराना भेटायची इच्छा आहे....
सचित्र अनुभवाची वाट पाहते आहे
27 Aug 2018 - 12:33 pm | खटपट्या
वेस्टर्न वाल्यांना नेहमीच ठाणे लांब वाटत आले आहे. जसं काही आम्ही परग्रहावर रहातो.
25 Aug 2018 - 10:17 pm | निशाचर
अरे वा! कट्ट्याला शुभेच्छा.
26 Aug 2018 - 12:02 am | कंजूस
ठाणे कट्टा
१) मुवि आणि मी फारच लवकर जागेवर पोहोचलो. सहा वाजता. बस स्टॅापला टाइमपास. ठाणे टिएमटीच्या बसेस पाहत एक तास काढला.
२) पिंगू, मुवि , श्री ( आइडी - जीवना) व सौ पाडगावकर.
३) पिंगू, मुवि, सुबोध खरे. मागे बिल्डिंगच्या गच्चीवर नारळी पौर्णिमेचा चंद्र.
मी साडेआठला लवकर निघालो. हॅाटेल चांगले आहे.
गप्पांचा खास असा विषय नव्हता. तरुण मिपाकर मंडळी मला चालवतात हे समजून बरे वाटले.
४) सुबोध खरे, गामा पैलवान ( आपला नम्र इत्यादि), वरुण मोहिते, सुहास झेले आणि वरुणचा मित्र.
५) आठपर्यंत दहा मिपाकर आले.
26 Aug 2018 - 1:00 am | प्रचेतस
मस्त छोटेखानी वृत्तांत, सविस्तर येऊ द्यात अजून.
26 Aug 2018 - 1:42 am | अमरेंद्र बाहुबली
छान कट्टा. फार दूर असल्याने येऊ शकत नाही :( महाराष्ट्रात असतो तर नक्कीच आलो असतो.
27 Aug 2018 - 12:44 pm | खटपट्या
कोणतेच फोटो दिसत नाहीत
27 Aug 2018 - 1:00 pm | कंजूस
करतो ठीक. ( फेसबुकवरचे बऱ्याचजणांना दिसत नाहीत.)
27 Aug 2018 - 4:16 pm | इरसाल
दोन चंद्र आणी डॉ. खरे कॉम्प्लेक्स देत आहेत.
(बर्याच दिवसांनी मुविंचे दर्शन झाले, मुवि ह. घ्या.)
1 Sep 2018 - 2:29 am | ज्योति अळवणी
खर तर कोणत्याही मिपाकरांना मी वयक्तिक ओळखत नाही. त्यामुळे ठाणे किंवा पुणे लांब वाटते. कधीतरी सर्वांना भेटायला आवडेल. खरच वेस्टर्न बाजूला जे मिपाकर आहेत आणि एकमेकांना ओळखतात त्यांनी ठरवावे. भेटायला खूप आवडेल
27 Jul 2019 - 2:29 am | गामा पैलवान
वरुण मोहिते पाटलांनी हा कट्टा आयोजित केरण्यात बराच पुढाकार घेतला होता. त्यांनी खाण्याचा एक पैसाही घेतला नव्हता. मी पीत नसल्याने पिण्याबाबत माहीत नाही.
वरुण मोहिते पाटलांनी नुकताच इहलोकाचा निरोप घेतला. त्यावरनं हा कट्टा आठवला. त्यांना श्रद्धांजली.
-गामा पैलवान
20 Aug 2019 - 4:38 pm | स अर्जुन
गा.पै. या श्रावन महिन्यात कटटा भरवनार काय ठान्यामध्ये..
20 Aug 2019 - 4:44 pm | जॉनविक्क
सॉलिड यार. मिपा खरच बरच काही आहे याची जीवंत साक्ष मिळाली. अभिमान वाटतो मिपाकर असल्याचा :)