सुखाचं मृगजळ
काही दिवसांपूर्वी एका मित्राची भेट झाली. थोडासा दुःखी वाटत होता. मी विचारलं काय झालं? तर म्हणाला बायकोशी पटत नाही. मी परत विचारलं, अरे हे काय अचानक? तर म्हणाला अचानक वगैरे काही नाही. तसं लग्न झाल्यापासूनच आमचं बऱ्याच गोष्टींवर पटत नाहीये. पण आता जरा त्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. त्याला म्हटलं अरे एकदा का कळलं ज्या गोष्टींवर पटत नाही की मग त्या गोष्टी उगाळा कशाला? ज्या गोष्टींवर तुमचं पटतं तेच बोलत जा ना तिच्याशी. तर मला म्हणाला ‘अरे तुला काय माहित आमचं कुठल्या गोष्टींवर पटतं ते.