समोरुन गोलंदाज धावत येतो आहे,
राईट हँड, ओव्हर द विकेट,
यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला,
फलंदाजाला अंदाज आला होता,
त्याने टप्पा पडायच्या आधिच
बॅटने चेंडू सीमापार केला,
आणि सहा धावा फलंदाजाच्या खात्यात जमा,
.
.
.
.
क्रिकेटचा नादच बेकार...
असे काही करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते. कविता म्हणजे काही सिनेसंगीत नाही की संगीतकाराने ठरवलेल्या चालीवर गीत बांधायचे.
कविता स्फुरलेली असते. त्या मुळे ती जशी आहे तशीच असावी. तिच्यावर भाषेची किंवा इतर कोणतीही बंधने लादली जाउ नयेत. दोन किंवा अधिक भाषांमधे कविता असायला काय हरकत आहे?
आतिफ अस्लमच्या "तेरा होने लगा हू" या गाण्या मधे येणारे "Shining in the shade in sun like, A pearl upon the ocean, Come and feel me.. How feel me" हे शब्द कुठेही खटकत नाहीत.
"लोग क्या कहेंगे?" असा विचार करत कविने कविता लिहू नये, किंबहूना असा विचार करत कविता पाडणारा कवी नव्हेच. अर्थात हे माझे व्यक्तीगत मत आहे.
तरी सुध्दा एक अल्पसा संस्कृतप्रचूर प्रयत्न.
त्या हस्तांचे कुर्वकयुक्त करतल
करतलात दिपक
दिपकात तेल
तेलात तैलमाला
तैलमालेची ज्योती
ज्योतीचा प्रकाश
अन प्रकाश थेट मुखमंडलावर
.
.
.
.
.
प्रकाशाचा वेगच अतिशिघ्र
समोरुन घडामोडी धागा तेवत येतो आहे,
कधी भलामण करणारा,कधी विखार ओकणारा,
वाचकाने विचार टाकायचा प्रयत्न केला,
(हुकुमी) प्रतिसादीला अंदाज आला होता,
त्याने मुद्दा पचनी पडायच्या आधिच
अवांतराने मुद्दा अगदी धागापार केला,
आणि पुन्हा हवा प्रतिसादीच्या भात्यात जमा,
.
.
.
.
राजकारणाचा नादच बेकार...
प्रतिक्रिया
23 Jun 2018 - 5:24 am | हरवलेला
जव्हेरगंज साहेबांनी 'मि. का.' हा आयडी हॅक करून हि कविता लिहिली की काय ?
23 Jun 2018 - 11:36 am | ज्ञानोबाचे पैजार
समोरुन गोलंदाज धावत येतो आहे,
राईट हँड, ओव्हर द विकेट,
यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला,
फलंदाजाला अंदाज आला होता,
त्याने टप्पा पडायच्या आधिच
बॅटने चेंडू सीमापार केला,
आणि सहा धावा फलंदाजाच्या खात्यात जमा,
.
.
.
.
क्रिकेटचा नादच बेकार...
पैजारबुवा,
23 Jun 2018 - 6:18 pm | एस
तुम्ही तुमच्या मराठी कवितांवरील ऊर्दूचा प्रभाव किंचित कमी करून पहा असे सुचवेन. मेहंदीभरले तळवे वगैरे एकदमच खटकतंय मराठीत. बाकी आशय पोहोचला.
25 Jun 2018 - 10:03 am | ज्ञानोबाचे पैजार
असे काही करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते. कविता म्हणजे काही सिनेसंगीत नाही की संगीतकाराने ठरवलेल्या चालीवर गीत बांधायचे.
कविता स्फुरलेली असते. त्या मुळे ती जशी आहे तशीच असावी. तिच्यावर भाषेची किंवा इतर कोणतीही बंधने लादली जाउ नयेत. दोन किंवा अधिक भाषांमधे कविता असायला काय हरकत आहे?
आतिफ अस्लमच्या "तेरा होने लगा हू" या गाण्या मधे येणारे "Shining in the shade in sun like, A pearl upon the ocean, Come and feel me.. How feel me" हे शब्द कुठेही खटकत नाहीत.
"लोग क्या कहेंगे?" असा विचार करत कविने कविता लिहू नये, किंबहूना असा विचार करत कविता पाडणारा कवी नव्हेच. अर्थात हे माझे व्यक्तीगत मत आहे.
तरी सुध्दा एक अल्पसा संस्कृतप्रचूर प्रयत्न.
त्या हस्तांचे कुर्वकयुक्त करतल
करतलात दिपक
दिपकात तेल
तेलात तैलमाला
तैलमालेची ज्योती
ज्योतीचा प्रकाश
अन प्रकाश थेट मुखमंडलावर
.
.
.
.
.
प्रकाशाचा वेगच अतिशिघ्र
पैजारबुवा,
23 Jun 2018 - 8:11 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर कविता मिका शेठ !
पण ह्यावर तांब्यासांप्रदायिक विडंबन येवु शकते असे सुचवुन काडी सारत आहे =))))
24 Jun 2018 - 10:48 pm | नाखु