क्रश !

लौंगी मिरची's picture
लौंगी मिरची in जनातलं, मनातलं
19 Jan 2019 - 9:29 pm

“ बघ हं .. वाटतं तितकं सोप्पं नसतं सगळं , नाई ! आत्ता हो म्हणशिल पण नंतर मन खाइल तुझं तुलाच .“ ह्यावर दरवेळेला माझं “बघु तेव्हाचं तेव्हा “ एवढच उत्तर असायचं . भरकटत चाललेय हे जाणवत असतानाहि स्वताहाला वाहवुन जाउ देत होते मी . तो माझी वाट बघायचा एवढं एक कारण पूरेसं होतं माझ्या बेताल वागण्याला . त्याला कळायचं , माझं जरा जास्तच मागे लागणं वगैरे , मला काहि फरकच पडत नव्हता . जेव्हा , जसं जमेल तसं भेटायचो . व्यसनाधीन झाल्यासारखं . त्याच्यासोबत रहाणं , वेळ घालवणं , हिंडणं , फिरणं . खर्या अर्थाने लाइफ जगले ,मुंबईचा एकहि बीच सोडला नाहि .
एकदा तर ट्रेन साठी प्लॅटफॉर्म वर उभं असताना , इकडच्या ट्रेन मधुन पलिकडच्या रुळावर उडी मारणारा त्रुतिय पंथी इसम , त्याच्या अंगावरुन त्याचे तुकडे करत निघुन गेलेली ट्रेन , हे सगळं पाहुन घाबरलेली मी , मला एवढ्या गर्दितहि त्याने घट्ट मिठी मारली होती . थरथरणारा देह मिठीत आधार शोधत होता आणि तो मिळालाहि . मग ऑफिसला गेलोच नाहि . दिवसभर भटकलो. गोरेगाव , बोरीवलीच्या आधल्या मधल्या रस्त्यावर ,कोणीच ओळखीचं भेटणारं नव्हतं तिथे याची खात्री होती दोघांनाहि .
मला कळलं होतं , त्याचा जीव अडकला होता माझ्यात पण कधीच माझ्या मागे येणं , मस्का मारणं , मागे पूढे करणं , सतत कॉल करणं असलं काहिहि त्याने कधीच केलं नाहि . हो , पण संधी साधुन घरी येणं , बहाणे करुन भेटणं , बोलताना पापणी न पडु देता डोळ्यात डोळे घालुन पहाणं , हळुवार स्पर्श पण नकळत झालाय बरका ! असा आव आणणं मात्र त्याला भारी जमायचं .

एकदा बोरिवलीच्या नॅशनल पार्कला गेलो ,अगदि पर्फेक्ट प्लानिंग करुन . दोघांनी ऑफिसात दांडी मारण्यापासुन ते कोणी भेटलच तर काय बोलायचं इथपर्यंत प्लानिंग. फारच स्मार्ट दिसत होता तो . व्यवस्थित ठरवुन केलेलं पहिलं डेटिंग . दिवसभराचा प्लान . सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत एकत्र वेळ घालवायचा . पार्कात एन्ट्री झाली . वयाची एकविस वर्ष मुंबईत घालवुनहि पहिल्यांदा मी त्या पार्कात गेले होते तेहि त्याच्या सोबत . घनदाट जंगल , जितकं आत जाऊ तितकी दाट झाडी . फारच सुनसान , वर्दळ फारच तुरळक .पण त्याच्यासोबत भिती नाहि वाटली . विश्वास होता माझा त्याच्यावर . बराच वेळ चालत गेल्यावर एका शांत रस्त्यावर थांबला तो . अगदि मधोमध . तिथे फक्त मी , तो आणि घनदाट झाडी ह्यापलिकडे काहिच नव्हतं . हातात हात घेऊन त्याने माझ्याकडे नेहमीच्या सवयीनेच डोळ्यात पाहिलं . तिथला एकांत त्याला झेपला नाहि . इतकावेळ धरुन ठेवलेला संयम सुटला , घट्ट बिलगला , त्याच्या श्वासांची लय जानवली .
ओठांवर ओठ टेकताच असंख्य शहारे फुटले . वेगळीच नशा होती ती .आयुष्यातला पहिला किस्स .. तोहि इतक्या रोमँटिक वातावरणातला ,एकांतातला . दोघांच्या संमतीनं घडलेला . आजहि तो स्पर्श माझ्या ओठात अडकलाय .. स्वताहाचं अस्तित्व ठेवुन माझ्या त्या सुंदर क्षणांना ताजं ठेवत जगलाय .

असं मग बर्याचदा ठरवुन भेटायचो , भटकायचो . बस च्या , ट्रेनच्या वेळा गाठणं , झालाच उशिर तर अंधेरीच्या गणपती मंदिरात भेटणं , तिथुन रिक्षाने घरी . एकाच तर एरियात रहात होतो , त्यामुळे दोघांनाहि ओळखणारी मंडळी , आम्हाला एकत्र पाहुन सहज “ लफडं “ असणार असा लेबल लावणार , म्हणुन सावधगिरी बाळगावी लागायची. मी बस स्टॉप वर उतरायचे आणि तो रिक्षाने चाळीच्या गेटवर जायचा . मग अगदि एकमेकांसमोर आलोच तर “ अरे ... आत्ताच आलास का ? कोणत्या बसने ? दिसला नाहिस तो ?? “ अगदि सहज डायलॉग मारायचे मी .

एकदा तो ऑफिसच्या गेटवर न्यायला आला , नवी बाइक घेतली होती त्याने , सर्प्राइझ द्यायचं होतं . “ मागच्या सीटवर बसायचा पहिला मान तुझा “ असं म्हणाला , मला खुप वेगळच वाटलं ..
आयुष्यात पहिल्यांदा बाइकवर तेहि त्याच्या मागे बसताना मी जरा जास्तच प्राऊड फील केला , तो मला सहारा एअर्पोर्ट वर घेऊन गेला .पहिली बाईक राईड . शांत रस्त्यावर फक्त रस्त्याकडेच्या लाईट्स , जागोजागी हिरवळीने भरलेल्या , फुलांनी लगडलेल्या छोट्या छोट्या बागा , मोठा उड्डान पूल आणि पुलाच्या एका कडेला बुटक्या कट्ट्यावर हातात हात घातलेले , खांद्यावर डोके टेकवलेले कपल्स , रीलॅक्स , कूल प्लेस टू मीट लवबर्ड्स . बाइकवरुन उतरुन आम्हिहि त्यांच्यातले एक झालो . त्यादिवशी त्याने खुप गप्पा मारल्या , फ्युचर बद्दल भरभरुन बोलला . आवडला होता मला तो त्यादिवशी , नेहेमीपेक्षा जरा जास्तच .

एकदा त्याने ऑल द बेस्ट नाटकाची तिकिटं आणली , फॅमिलिसोबत जायचा प्लान होता त्याचा , तरिहि एक तिकिट एक्स्ट्रा आणुन , मित्राने तिकिट्स काढुन झाल्यावर हातात ठेवलं असं सांगुन मला न्हेन्याचा फुल्प्रूफ प्लान बनवला . मी गेलेहि , पण बाजुबाजुला बसायला मिळेल का ?? हे टेंशन होतं , मग हलकाच हात दाबुन “ तु शेवटी रहा “ असा इशारा देऊन तो विंगेत सगळ्यात पहिला घुसला , सगळ्यांना सीटवर बसवत बसवत बाहेर आला आणि पटकन माझ्या शेजारी बसला , काय डोकं लावलं होतं , जबर्दस्त . कोणालाच त्याच्या प्रेमळ हेतु बद्दल शंका आली नसावी इतका सुंदर अभिनय . मी पून्हा प्रेमात पडले .लाईट्स डीम होताच हातात हात गुंफले , अन मी फक्त तुझीच .. एवढच काहिसं दर्शवता आलं .

आम्हि बर्याचदा एकमेकांच्या सहवासात रहाण्याचा प्रयत्न करायचो . मी त्याच्या घरी जायचे , तो माझ्या घरी यायचा . गर्दितहि आम्हि एकमेकांशी नजरेनं बोलायचो . सहज निसटता स्पर्श असायचा , बोलताना नजर चंचल झाली की समजुन जायचं, “ उद्या ८:३० , पहिली बस “ हा मेसेज . एकटक डोळ्यात बघणं , मी नजर चोरलीच तर “ तुझं लक्ष नाहिये माझ्याकडे “ असं सहज बोलुन जायचा तो , पण खरच सांगु का , प्रत्येकवेळी नव्यानं प्रेमात पडायचे मी त्याच्याकडे पाहुन .
वेडी होते त्याच्यासाठी . एखादा दिवस न भेटता जाणहि मंजुर नव्हतं मला .धडधडायचं काळीज त्याला दुसर्या मुलीसोबत साधं बोलताना बघितलं तरिहि .
आयुष्यातले ते सोनेरी दिवस आजहि आठवले तरी मी अलगद त्या क्षणांवर ताबा मिळवते .आपण इतकं कुणासाठी तरी वेडे होतो ?? आणि तो हि आपल्यात अडकला होता ? खुप प्रश्न विचारुन उगाच आनंदुन जाते . त्याला आजहि आठवुन ओठातला तो पहिला स्पर्श ताजा होतो , ओठावर हसु उमलतं . कधी निसटले हात हातातुन ते आठवण्यापेक्षा मी सहवासातले क्षण आठवते , खुश होते .
पण खरच तो माझा पहिला क्रश होता .
पहिला क्रश ..

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

20 Jan 2019 - 5:02 pm | ट्रम्प

छान लिहलय !!!

लौंगी मिरची's picture

22 Jan 2019 - 11:21 pm | लौंगी मिरची

:)

श्वेता२४'s picture

21 Jan 2019 - 5:16 pm | श्वेता२४

मला इतके दिवस वाटत होतं की क्रश म्हणजे कोणीतरी आवडणे किंवा अशा व्यक्तिबद्दल खूप आकर्षण वाटणे. हे "इथपर्यंत" पोचलेलं प्रकरणही "क्रश" च का?

लौंगी मिरची's picture

22 Jan 2019 - 11:23 pm | लौंगी मिरची

तिला तो आवडायचा म्हणुन तो तिचा क्रशच . त्यालाहि ती आवडायची , हे चेरी ऑन द केक असावं .

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)

छान लिहिलंय...थोडं नॉस्टॅल्जीक व्हायला झालं वाचताना!

लौंगी मिरची's picture

22 Jan 2019 - 11:23 pm | लौंगी मिरची

धन्यवाद .

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2019 - 1:20 pm | चौथा कोनाडा

वाह, क्लासिक. एक नंबर.
खुप इंटीमेट लिहिलंय. वाचताना त्या झुळुका जाणवतात, सुखावतात.

लौंगी मिरची, तुमच्या लेखनाला _/\_
पुढचा भाग कधी ?

लौंगी मिरची's picture

25 Jan 2019 - 12:23 am | लौंगी मिरची

धन्यवाद .

एकच भाग होता . ;)

शित्रेउमेश's picture

25 Jan 2019 - 8:38 am | शित्रेउमेश

अप्रतिम....

लौंगी मिरची's picture

25 Jan 2019 - 10:08 am | लौंगी मिरची

धन्यवाद .

बाप्पू's picture

25 Jan 2019 - 9:18 am | बाप्पू

खूप छान.. आवडले लेखन.. पण टेक्निकली ह्याला क्रश म्हणता नाही येणार असे वाटते

लौंगी मिरची's picture

25 Jan 2019 - 10:10 am | लौंगी मिरची

प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

तिला तो आवडायचा , त्याच्यासाठी ती वेडीच , पण त्याला ती आवडणं म्हणजे योगायोग असु शकतो ;)

क्रश हा शब्द योग्य नसावा याच्याशी सहमत. क्रश ही भावना तीव्र असली तरी ती क्षणिक किंवा अल्पकालीन आणि मुख्य म्हणजे वरवरच्या रंगरूपावरून किंवा दर्शनी व्यक्तिमत्वावरून पण फार मानसिक जवळीक किंवा संवाद झालेला नसताना आलेली भावना असते.

अर्थात लिखाण छान.

लौंगी मिरची's picture

28 Jan 2019 - 8:01 am | लौंगी मिरची

प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
ह्म्म शिर्षक चुकले बहुतेक माझे मग . :(

विक्रम चव्हाण's picture

26 Jan 2019 - 11:07 am | विक्रम चव्हाण

लिहिले आहे.अगदी अनुभवतोय असा फील आला.
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
छान लिखान.☺️

लौंगी मिरची's picture

28 Jan 2019 - 8:01 am | लौंगी मिरची

धन्यवाद विक्रम :)

समीरसूर's picture

28 Jan 2019 - 11:26 am | समीरसूर

मस्त लिहिलंय. फक्त थोडं शुद्ध लेखनाचं पाहिल्यास बरं होईल. इतक्या तरल भावना इतक्या नाजूक शब्दांत विणतांना शब्द बरोबर लिहिलेले नसतील तर थोडा रसभंग होतो...

लौंगी मिरची's picture

7 Feb 2019 - 8:04 pm | लौंगी मिरची

माफ करा .. प्रतिसाद आत्ता वाचला म्हणुन उशिरा रीप्लाय करतेय .

मी प्रयत्न करेन शुद्ध लिहिण्याचा .