तुमच्या पिढ्यांच्या
अक्षम्य चुकांचे
पातक अम्हाला
रोज भोगायचे
रोज बघायचे
भेसूर रुपडे
भकास पृथ्वीचे
अभद्र कार्बनी
पाऊल ठशांचे
विटल्या फाटल्या
ओझोन थराचे
गटारगंगांचे
विखारी धुराचे
अवकाळी वृष्टीचे
जखमी सृृृष्टीचे
सिमेंटी जंगलांचे
भेगाळ भूमीचे
मरणपंथाच्या
हरितवनांचे
थांबा थांबा ऐका
चीत्कार कुणाचे?
पाण्याचा टँकर
पळवून आणल्या
मरणासन्नांच्या
आमच्या टोळीचे!
प्रतिक्रिया
30 Jan 2019 - 2:02 pm | प्रसाद गोडबोले
भारी कच्चा माल !
चोळीगीत इ.स. ३६३८ ? असे विडंबन येऊ शकते !
वि.सु. : लेखन किंव्वा आयडी उडवल्या गेल्यास आमची जबाबदारी नाही !
30 Jan 2019 - 4:56 pm | खिलजि
चोळीगीत तयार करून मिळेल पण ----- ?
31 Jan 2019 - 1:43 am | टवाळ कार्टा
यदाकदाचित बनवलेच तर अम्हाला व्यणीतून पाठवा
31 Jan 2019 - 10:09 am | ज्ञानोबाचे पैजार
चोळी ने आयडी उडणार असेल तर चोळी ऐवजी मोळी वापरा
हा का ना का
पैजारबुवा,
31 Jan 2019 - 1:01 pm | खिलजि
दोन्ही सूचना मान्य आहेत . बघू कसं होतंय ते ..