मुक्तक

राखी.

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
15 Aug 2019 - 10:42 am

ओळखीतल्या सगळ्या मुलांना राखी बांधणारी छोट्टीशी बाला,
काॅलेजमध्ये ज्याला टाळायचं त्यांनाच राखी बांधणारी मुग्धा.
रक्षाबंधनाचे मेसेज फक्त कझिन्स ग्रुपमध्ये टाकणारी प्रगल्भा..
आणि तो सरसकट सगळ्यांनाच फाॅरवर्ड करणारी प्रौढा..
"तिच्या" या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी,
ती राखी!

काहीच्या काही कविताकविताचारोळ्यामुक्तक

विळखा -५

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
2 Aug 2019 - 7:05 pm

विळखा -५
आज आमच्या आईला अति दक्षता विभागातून तिच्यासाठी खास खोलीत (स्पेशल रुम) आणण्यात आले. तिच्या शल्यक्रियेत आणि शल्यक्रियेच्या नंतर काय काय गुंतागुंती होऊ शकतील याची मला पूर्ण कल्पना होती. यामुळे काल रात्री सुद्धा मी शांतपणे झोपू शकलो नव्हतो. गेले काही दिवस चिंतेमुळे झोप सुद्धा पहाटे लवकर मोडत असे.आज पहाटे सुद्धा पाच वीस ला जाग आली आणि नंतर झोप लागली नाही ( अन्यथा मी सकाळी साडे सातला फार कष्टाने उठणारा माणूस आहे)

मुक्तकप्रकटन

आमच्या सीसीडीय आठवणी..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
2 Aug 2019 - 10:27 am

सध्या सीसीडीचं (कॅफे कॉफी डे) प्रकरण जोरात आहे म्हणून नाहीतर हे लिखाण तसं सीसीडी, बरिस्ता आणि तत्सम सगळ्या प्रकारांना उद्देशून आहे. आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये असताना शहरात सीसीडीचं पहिलं आउटलेट सुरु झालं. तेंव्हापासून ते नंतर कितीतरी वर्ष "हे आपल्यासाठी नाही" हे डोक्यात पक्कं बसलं होतं. कॉलेजसमोरच्या मामाच्या टपरीवर दोन रुपयात कटिंग चहा अन छोटा पारले जीचा पुडा घेणाऱ्या आमच्यासारख्यांना सीसीडीत जाऊन दीडशे रुपयाची कॉफी पिणे कधीच झेपणारे नव्हते. अगदी कमवायला लागल्यावरसुद्धा सीसीडीत जाऊन उधळावं असं कधीही वाटलं नाही. चहा किंवा कॉफी हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे.

मुक्तकविरंगुळा

कविता: आज्जी माझी…

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
30 Jul 2019 - 3:44 pm

आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या
प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला
आज्जी माझी...

मायेची पाखर, उडून गेली दूरवर
परी आठवण नाही पुसली कदापि
आज्जी माझी...

संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले
भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले
आज्जी माझी...

कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले,
डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले,
प्रयत्नांत कधी धडपडले, घडले
परी मी किंचित नाही घाबरले
आज्जी माझी...

आप्तांना भेटण्यास जीव कासावीस
दिसताच पाणावले डोळे आठवणीने
आज्जी माझी...

कविता माझीकवितामुक्तक

इंद्रधनू

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
28 Jul 2019 - 4:01 am

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले
अहा!
चला बाबा बघा
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा
आकाशी व्यापली प्रकाशमाला

मुक्त कविताशांतरसकवितामुक्तक

विळखा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
26 Jul 2019 - 11:15 am

माझा दवाखाना ज्या इमारतीत आहे त्यातच वरच्या मजल्यावर आमचे आई वडील राहतात. आमच्या वसाहतीचा पुनर्विकास झाला त्यात मी दवाखान्याची जागा घेतली आहे आणि वरच्या मजल्यावरचेच घर वडिलांना मिळाले.

मुक्तकप्रकटन

हा संभ्रम माझा

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
23 Jul 2019 - 8:45 pm

नकळत ओढून नेतो
मिचकावत सोडून देतो
स्वतःशीच खिन्न हसतो
हा संभ्रम माझा

स्वप्नांच्या झुळूकी मनाला
तप्त पाऊलवाटा पायाला
अनवाणी चालू पाहतो
हा संभ्रम माझा

अवखळ विचारांच्या वाऱ्यात
दात-ओठांच्या माऱ्यात
क्षणासाठी मलम होतो
हा संभ्रम माझा

- संदीप चांदणे

कविता माझीकरुणकवितामुक्तक