इंद्रधनू

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
28 Jul 2019 - 4:01 am

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले
अहा!
चला बाबा बघा
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा
आकाशी व्यापली प्रकाशमाला

पर्जन्याचा अधिपती नरेश
भेट जलाचे देई धरेस
त्याच समयी ये सामोरी भास्कर
किरणांस भिडता थेंब नीर
गोफ इंद्राचा घेई आकार

मज न ठावूक;
राहील न राहील ते काळ किती
ये वायू मग जाय क्षिती
साठवूनी घ्या लोचनी
त्वरा करा तुम्ही; बाबा या लवकरी

- पाषाणभेद
२८/०७/२०१९

मुक्त कविताशांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

फुटूवाला's picture

28 Jul 2019 - 7:10 am | फुटूवाला

मस्त

श्वेता२४'s picture

28 Jul 2019 - 1:53 pm | श्वेता२४

आवडली. याला चाल कोणती लागेल?

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jul 2019 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार

याला "आरती ज्ञानराजा" ची चाल फीट बसते आहे
पैजारबुवा,

पण ठीक आहे. भावना छान व्यक्त केल्यात.

मुलीने नाहीच केलेहो. लहान आहे ती.
तिच्या भावना मी व्यक्त केल्यात.

अन वर हरखली असा शब्द हवा. केदारनानांचे धन्यवाद.

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 8:35 pm | जॉनविक्क

अतिशय छान भावना समजून घेतल्या आहेत.

यशोधरा's picture

28 Jul 2019 - 3:08 pm | यशोधरा

मस्त!

पद्मावति's picture

28 Jul 2019 - 4:09 pm | पद्मावति

आवडली. मस्तं.