हिरवे सोने
एकल्या माझ्या घरट्यात नांदते लाखमोलाचे ऐश्वर्य
माणिक मोत्यांची ना रास तरीही बहरते सुखाचे माधुर्य
दारिद्र्याच्या चिंध्यात लपेटून जाते जीणे
कुजलेल्या छपरातून पाझरते वैभवाचे चांदणे
पोट जाळून घामाच्या धारांनी भिजती राने
फाटक्या स्वप्नांच्या भूमीवर अंकुरते हिरवे सोने
आयुष्याच्या उतरंडीत रीती रीती जिंदगी
जगाच्या भाकरीसाठी लढाया देते बळ अंगी