मुक्तपीठ
प्रवास खडतर, सापडेना वाट ती.
वाटसरु नवे, हरदिवस भेटती.
रोज नवा प्रश्न उभा समोर ठाके,
थांब जरा, घे उसासा मन माझे सांगे.
जुळता बंध नात्यांचे, कधी हेच धागे गुंतता,
बाकी निसटून जाती एक सांधता साधता.
वाटे व्हावे फुलपाखरू, मनमोकळे हुंदाडवे.
स्वप्नांचे ओझे डोईपरी हलके व्हावे.
विशाल आसमंत फिरुनी यावा एकदा,
भरारीला बळ मिळावे मग पुन्हा एकदा.
भुईचा भूचर कधीतरी पाखरू व्हावा,
निर्भय, निश्चिंत, स्वच्छंदी, अनंत तो उडवा.
वाटे द्यावे झुगारून सारे बंध.
निखळून जावे साखळदंड.