( सुरेश भट _/\_ )
चल उठ रे बेवड्या
झाली सांज झाली...
बाहेर दारू गुत्त्यांना
हलकेच जाग आली
उघडले कधीचे
गुत्त्यांचे द्वार बंद
अन् चोरपावलांनी
आला देशीचा गंध
गल्ल्यावरी गुत्त्याच्या
आंटी येऊन बसली...
बाहेर दारू गुत्त्यांना
हलकेच जाग आली
चल लवकरी आता
पहिल्या धारेचा सहारा
मोसंबी नारंगी ठर्रा
करती तुझा पुकारा
सज्ज साथ देण्या
पापड अंडी चकली...
बाहेर दारू गुत्यांना
हलकेच जाग आली
तव याद करिती सारी
बेवड्यांची मांदियाळी
घे एक घोट नवटाक
चिंता सर्व जाळी
तुज शोधण्यास वेडी
बायको पुन्हा निघाली...
बाहेर दारू गुत्यांना
हलकेच जाग आली
प्रतिक्रिया
28 Jan 2018 - 10:12 am | manguu@mail.com
छान
28 Jan 2018 - 12:51 pm | धर्मराजमुटके
लय भारी !
29 Jan 2018 - 11:52 am | दमामि
मस्तच!!!
29 Jan 2018 - 3:24 pm | विशुमित
मस्तच..
तुज शोधण्यास वेडी
बायको पुन्हा निघाली... हे दृश्य नेहमी पाहत असतो चौकात.
पदर खोचून त्याला उचलून नेताना हा अविर्भाव असतो '''बेवडा का असेना पण नवरा आहे माझा.""
30 Jan 2018 - 8:48 am | चामुंडराय
manguu@mail.com, धर्मराजमुटके, दमामि आणि विशुमित
आपण सर्वांचे प्रोत्साहनासाठी आभार _/\_
2 Feb 2018 - 1:09 pm | राजाबाबु
खुप मस्त......
3 Feb 2018 - 9:00 am | चामुंडराय
.