कविता

मुक्या पाखरा

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
22 Feb 2018 - 8:30 pm

मुक्या पाखरा नको जाऊ तिच्या गावी
ओघळणाऱ्या आसवांना प्रीत ना ठावी

स्वप्नातले चांदणे विखुरले सभोवती
जखमांवरची मेहंदी पुन्हा रंगून जाती

कंठात माझ्या फुटती ओळखीचे हुंदके
उमलत्या स्पर्शांचे रंग झाले फिके

गंध तुझे गेले वेचून वारे
जळत्या वेदनांचे उठले काळजात शहारे

कविता माझीकविता

अभ्यास चालू आहे

डॉ.नितीन अण्णा's picture
डॉ.नितीन अण्णा in जे न देखे रवी...
22 Feb 2018 - 4:37 pm

पुन्हा नव्या दमाने जातो कधी हसाया
दुखणे जुनेच पुन्हा मग लागते दुखाया

करून फस्त कणसे उडून गेले पक्षी
होतील चालू आता ह्या गोफणी फिराया

येतील न ते नक्की घेवून लिंबूपाणी
उंची उपोषणाची जाया नको ही वाया

सांभाळ लक्तरे तू धडूते तुझ्या कुडीची
अभ्यास चालू आहे त्याची गोधडी शिवाया

क्रांतीचे गीत आता ओठात घे तुझ्याही
झाल्या अति या गझला झाल्या पुऱ्या रुबाया

- नितीन अण्णा

कविता

मातृभाषा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
22 Feb 2018 - 12:19 am

तू
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
हळूहळू लिहित जातोस,
तेव्हा
मी तुझे
राजस हात
लोभस डोळे
पहात राहते.

तुझ्यात इतका जीव का गुंतावा?

तू माझ्या हातांचे
देवनागरी चुंबन
घेऊन म्हणावे,
मातृभाषा कि काय
तिच्यातच जीव अडकतो बघ,
आई गंssss म्हटल्याशिवाय
प्राणसुद्धा जात नाही....

शाईचे बोट धरुन
तू परत रात्रीच्या
शांतप्रहरी
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
तुझेमाझे हितगुज
हळूहळू लिहित राहतोस...

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताधोरणमांडणीसंस्कृतीवाङ्मयकविताभाषासाहित्यिकसमाज

पुन्हा एक स्वातंत्र्यासाठी..!!

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जे न देखे रवी...
17 Feb 2018 - 4:23 am

*****************
अजून एका स्वांतञ्यासाठी....!!
*************************
मातीची महती
गात.
तुक्याचे अभंग घोकत.
रक्ताचं पाणी करतं
नुसता घाम गाळत राहूनचं
रान हिरवं गार करायचं
पण
मातीचं तरी मोल
असत का आमच्या जिण्याला

तुमच्या बंगल्यातल्या कुत्र्या इतकं ही
नशिबवानअाणि महत्वाचं अाम्ही असू
नाही
तरी या देशाचा शेतकरीराजा
अाहे असं समजून
हा देश क्रषीप्रधान अाहे
म्हणून नुसत्या टिरी बडवून
का घ्यायच्या?

माझी कवितामुक्त कविताकविता

काही त्रिवेणी रचना...

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
16 Feb 2018 - 4:49 pm

सहज विचार करतांना उतरलेले हे काही शब्द..

============

सांगायचं कसं अन् लिहायचं कसं..
मनांतलं शब्दांत मांडायचं कसं?

त्या अग्नीपंखाचा तुटक्या पंखांना सवाल, "आता उडायचं कसं?"

============

लहान मुलं आणि त्यांची निरागसता..
वेड लावणारं त्यांचं निष्पाप मन..

पारिजाताच्या फुलांसारखं नितळ विश्व!

============

प्रयत्नांची कास सोडू नये.. कामनांची आस धरू नये..
ईच्छा अर्पण करावी.. निष्काम कर्म करावं..

गुंतागुंत आणि परस्परविरोध ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात!

============

मुक्त कविताकविता

॥ रमू नको या जगात ॥

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
16 Feb 2018 - 1:40 pm

रमू नको या जगात

दुःखांचा राजा तू

दुःख कनवटीला असे

घे दुःखांची मजा तू

विरह असो , प्रेम असो

असो प्रेमाचा भंग तो

कुणीही तुला काही म्हणो

तू मात्र अभंग हो

जळो कुणी , कुणी मरो

जगण्यात काय ते

जळीस्थळी दुःख ज्याला

त्याला मरण्यात काय ते

दुःख दुःख दुःख

कुणी पहिले नसेल ते

सुख सुख सुख

कुणी स्पर्शिले नसेल ते

वंद तू धर्मास या

कर्माचे मर्म जाण

मोक्ष असा ना मिळतो

विरहाचे कर्मकांड

अंतरी तू शोध घे

विरहाचे काय ते

सोड वस्त्र देहाचे

शिववंदनाकविता

<नाव सुचवा>

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जे न देखे रवी...
14 Feb 2018 - 9:49 pm

तुझ्या त्या निरागस आनंदामागेही थोडेसे बालिश शौर्य असेल बहुतेक
बागेत सापडलेल्या नारळाला धागे बांधून बनवलेले टेलिफोन
मी झोपी गेलो तू तरीही बोलतच राहिलास
तू बोललास मरणाला काय घाबरायचे?

मुलींचे कपडे घालून काढलेल्या फोटोंची मात्र तुला भीती वाटत असावी.
नाहीतर कुलूप लावून पेटीत का लपवले होतेस?

खरेतर ज्या दिवशी तू निघून गेलास,
तेव्हा मला वाईट वाटले नाही.
जेव्हा तू गाडीचा दरवाजा धाडकन बंद केलास
मी सुखावलो होतो जरासा.
पण मीही तरुण होतो, युद्धांवर विश्वास ठेवण्याइतका..

नंतर पुढे बरीच वर्षे तुझ्या विषयी काहीबाही ऐकायला मिळायचे..

कविता

सोनरंग

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
12 Feb 2018 - 9:04 pm

मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली
क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली

वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला
सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला

सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा
कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा

हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी
कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी

माझी कविताकविता

सुदाम्याचे पोहे

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
12 Feb 2018 - 5:39 pm

पुन्हा पुन्हा लिहितात,
अन पुन्हा पुन्हा खोडतात,
दिवसभर मोबाईलशी,
हात, खेळत बसतात.
मनातले शब्द शेवटी
मनातंच रहातात..

माणसं दूर जातात..
पण आठवणी जवळ राहतात
टाईमलाईनवर जाऊन,
डोळे नुसतेच रेंगाळतात.
सुदाम्याचे पोहे कधीकधी
कनवटीलाच रहातात..

काहीच्या काही कविताकवितामुक्तक

मी माझा

दिपोटी's picture
दिपोटी in जे न देखे रवी...
11 Feb 2018 - 4:09 pm

‘आणि अखेर
करुणेचा कटोरा घेऊन
उभे रहातो खालच्या मानेने
आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी’

बेलवलकरांच्या अस्तित्वाचा गाभारा
नीरव-अतीव शांततेने केव्हा भिजणार?
कोलाहल हा कधी थांबणार?
काळाचा ओघ कधी थिजणार?

सत्वाची विटंबना
स्वत्वाचे विडंबन
अजस्र महाकाय बीभत्स
प्रचंड गदारोळात जो तो आपला

मी माझा

- दिपोटी

हे ठिकाणकविता