रंगआंधळा इंद्रधनुष्य,
शोधतो रंगाऱ्याला.
म्हणे माझे रंगव डोळे,
रंग येऊ दे जगायला.
रंगाऱ्याने मग पांढरा,
रंग लावला कुंचल्याला.
ओढता एकच फटकारा,
रंगारंग कुंचला झाला.
रंगारी मग शोधतो कुप्या,
सप्तरंग साठवाया.
रंगआंधळा इंद्रधनुष्य,
बाहेर पडला जग पहाया.