कविता

अनोळखी वाट

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 May 2018 - 9:05 pm

अनोळखी वाट घनदाट वनी मला नेते
निब्बरल्या तनामना नितळ सावली देते

हिरव्या रंगाच्या छटा पानोपानी अगणित
सळसळ लहरते वार्‍यासंगे अविरत

विजनात दूरवर घुमतसे घुघुत्कार
पसरती अंधाराचे पडसाद रानभर

पाखरांनो घरट्यात पिले हळूच जोजवा
लखलख काजव्यांचा झाडाझाडावर दिवा

माझी कविताकविता

बाप ….

मनिष's picture
मनिष in जे न देखे रवी...
29 May 2018 - 4:35 pm

सगळ्या बापांसारखेच,
आपल्या बापालाही काही कळत नाही
याची खात्री पटल्यानंतर…

मला ह्याच शाळेत का घातलं?
फुटबॉल ऐवजी क्रिकेटला का नाही टाकलं?
असे आरोप केल्यानंतर…

बाप आहे ना, तो चुकतोच.
आपल्यासारखा स्मार्ट तो मुळात नसतोच
हे समजून चुकल्यानंतर…

मग तू स्वतः बाप झाल्यावर,
वैतागून पोरांना ओरडून झाल्यावर
प्रेमाने जवळ घेतल्यानंतर…

कविता

शीर्षक सुचले नाही ...सुचलं तर कळवा

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
29 May 2018 - 3:21 pm

मिपाकरांनो, या कवितेला शीर्षक सुचले नाही मला. कुणाला सुचलं तर कळवा.

--------------------------------------------------------------------------------------

मुक्त कविताकविता

पिंपळपान

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
29 May 2018 - 9:56 am

आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू
मग फुलांनी केलेला अपमान शोधू

दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची
अन्यथा रामायणात अज्ञान शोधू

सोसेना गलका सभोवती शांततेचा
दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू

बोलण्या आधीच सुरू होती लढाया
ऐकूनी घेतील असले कान शोधू

प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन
भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू

आदेश हा कारागृहे खुली करण्याचा
पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू

शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा
थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

ये पावसा ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
27 May 2018 - 12:59 pm

त्या वाहत्या झऱ्याचा,
फेसाळल्या नभाचा
श्वासास गंध यावा
गंधाळल्या दिठीचा

तू भेटशी नव्याने
मी ही नवाच आहे
नात्यास रंग यावा
वेडावल्या जुईचा

तू चुंबशील का रे
वाऱ्यास धुंद ओल्या
वर्षेस मोह व्हावा
भेगाळल्या धरेचा

तो शुष्क कोरडासा
ओढा तसाच आहे
त्याला विसर पडावा
फेटाळल्या नदीचा

ओला वसंत म्हणजे
आमंत्रणे सुखांची
आनंद मग पहावा
मंदावल्या उन्हांचा

मग तृप्त अंबराला
हळवे उधाण यावे
जलदास स्पर्श व्हावा
धुन्दावल्या भुमीचा

© विशाल कुलकर्णी

कविता माझीकविता

सूर्योदय

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
27 May 2018 - 12:57 pm

कुणा रातीला पडले कोड़े
कुठून येतसे सखी चांदणी
शीतल कोमल तरुही सजले
अंधार उजळण्या हो आतुर

गळामिठी मग समीराचीही
स्पर्शु पाहातो गात्रो-गात्री
दुरात कुठे चाहूल उषेची
शोधत चंद्र येई क्षितिजावर

कलकल कलरव पक्षी बोलती
लक्ष धुमारे फुटले पूर्वेला
दशदिशाही करतील पुकारे
हलकेच रवी येई समेवर

पानोपानी, मृदु गवतावर
थेंब दंवाचा तोल सावरी
अनवट अनघड पाऊलवाटा
नाजुक पाउले, घट डोईवर

हळुवार उजळे पुर्वा नभभर
आरक्त लाली क्षितीजावर
आसमंताला उजळीत येईल
घट तेजाचे घेवून दिनकर

© विशाल कुलकर्णी

कविता माझीकविता

तिथे ओठंगून उभी...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
25 May 2018 - 8:23 pm

रानपाखरांची घरे अंगीखांदी जे माळते
असे झाड फुलताना पान पान किल्बिलते

क्षितीजाशी विझताना चांदणे जे उसासते
त्याचे पहाटे पहाटे जीवघेणे गीत होते

रानावनातून नदी जेव्हा खळाळत जाते
ऐलपैलतीरी तिचे पाण-पैंजण वाजते

फुफाटल्या मातीवर मृग शिंपण घालते
तेव्हा अत्तराची कुपी आसमंती ओसंडते

नाद-शब्द-ताल-गंध जिथे काळजा भिडते
तिथे ओठंगून उभी..

...एक कविता असते

मुक्त कविताकविता

हकिक़त

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
24 May 2018 - 4:57 pm

ये शायरी नही दोस्तो
हकिक़त है
------
अपने माझी को टटोलता हूँ कभी
तो गुजरे हुये सालो में
एक रुहानी कहानी दिखायी देती है
------
समंदर के किनारे
जानो पें सर रख्खे
बैठी हुयी
एक भोली, कमसीनसी लडकी
दिखती है
------
आज भी
उसके चेहरे को देखते ही
रुह को जो लम्स होता है
मानो ओस से भीगी मिट्टी
पैरोंको छू गयी हो
-------
उस रात अचानक एक बात
समझ आयी थी
रोशनी मोहताज होती नही
चाँद या सुरज की
-------
ये शायरी नही दोस्तो
हकिक़त है
------

कवितामुक्तक

'कविता'

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
22 May 2018 - 4:58 am

दुःखाच्या डोहामधुनी
करुणेची येते गाज
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते व्याज

कलतात उन्हे सोनेरी
रंगांची उधळत माया
डोहावर पसरत जाती
वृक्षांच्या काजळ छाया

ती काठावरती बसते
बुडवून स्वतःचे पाय
अन् हा हा म्हणता येते
पाण्यावर मोहक साय

मी 'कविता',वाचत असता
ती शांतच असते बहुधा
जणु चंद्रसरींनी भिजते
नित-निळी सावळी वसुधा!

—सत्यजित

भावकवितामाझी कविताशांतरसकविता

बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक !

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
21 May 2018 - 6:41 am

प्रेर्ना : अर्थातच गायछाप

बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप...
सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक !

सात वर्ष हि जुनी, मोहन मिकीनची रमा...
हळूच ओत ग्लासात, एक शॉट ओल्डमंक !

नकोच व्हिस्की वा ब्रँडी, नसे कोणी या सम...
उद्या पिऊ विलायती, आज ओत ओल्डमंक !

मंद व्हॅनिला हा गंध, "रम"तो सवे तुझ्या प्रिये...
मम ओठी पहा कशी, मज प्रियरमा ओल्डमंक !

लार्ज पेग हा पतियाळा, कॉकटेल वा नीट...
हलकीशी किक सुखद, सख्या ओत ओल्डमंक !

तन मन रोमांचित, पिसा समान वाटते...
हळूच घे घोट घोट, एज्ड डार्क ओल्डमंक !

फ्री स्टाइलवाङ्मयकविताविडंबन