लाख अंतरे..
लाख अंतरे अन् अंतरी तू
ऐलतिरी मी, पैलतिरी तू
म्हणाली विलग होता ओठ हे
झाले कॄष्ण मी, हो बासरी तू
आकाश.........
लाख अंतरे अन् अंतरी तू
ऐलतिरी मी, पैलतिरी तू
म्हणाली विलग होता ओठ हे
झाले कॄष्ण मी, हो बासरी तू
आकाश.........
आला आला पाऊस आला
येऊन माझ्या सोबत बसला,
ऐकून आपले प्रेम-तराणे
क्षणभर तो ही तुझ्यात रमला..
आला आला पाऊस आला
वाट तुझी मग पाहू लागला,
सोबत माझी करता-करता
तो ही झाला चिंब ओला..
आला आला पाऊस आला
मनात थोडा हिरमुसलेला,
तू नसल्याचे निमित्त सांगून
माझ्यावर मग रुसून बसला..
आला आला पाऊस आला
मनास माझ्या भिजवून गेला,
विरहाच्या या अवघड वेळी
तुझी आठवण देऊन गेला..
( News:10 लाख वारकऱ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'--मुख्यमंत्री)
विठूबंदी
धाडा रे कुणीतरी,
विठूला सांगावा,
आरक्षणाचा कांगावा,
फार झाला।
मागे होते एकदा
मराठा मंत्री सोळा,
आरक्षणाचा गोळा,
तेव्हाका नाही।
मुख्यमंत्र्यांना यंदा,
नाही महापूजा,
कारण बलभूजा,
जातीभेद।
संत सांगो गेले,
वारकरी एकता धर्म
भेदाभेद अमंगळ जर्म
जळो जळो।
नावडतीचे तुम्हा,
जरी अळणी मीठ,
निषेधाचे व्यासपीठ,
इथे नव्हे।
भिजून भिजून, गात्री-
झेलून झेलून पाणी
झाडाशी बसून, गोड-
सुरात गातोय कोणी.
कातर कातरवेळी
लकेर लकेर ओठी
पालवी पालवी जशी
पानाच्या फुलते देठी.
सळसळ सळसळ पानी
चाहूल, जिवाला भूल
मोकळ्या मोकळ्या वाटा
वाटांत ओलेते सल...
गारवा, गारवा रात्री
हवेत वेगळा नाद...
दुरून, दुरून आली
कुणाची? कुणाची साद?
... झाडाशी झाडाशी खोल,
थरथर थरथर देही
डोळ्यांत, डोळ्यांत दोन
पाऊस झाला प्रवाही !
~ मनमेघ
हरपले हे देहभान
ना उरले दिशांचे ज्ञान,
ना कसले अनुमान
हेच का प्रीतीचे प्रमाण..?
धुंद रूपाची तुझ्या
जणू भूलच ही पडली,
तुजवाचून सारी सुखे
का दिसती शुन्यासमान..?
सुंदरशा या कातरवेळी
मन सैरभैर का होई,
का होई तुझा भास
कसली ही अशी तहान..?
प्रश्न असा हा पडता
उत्तर आले त्वरीत मला,
तूच हवी या ह्रदयाला
देशील का ग साथ मला...??
नजर नव्हती मिळवायची
कुणाच्याच नजरेसोबत
तीच नजर तुझ्याच शोधात होती
यातच सारं काही आलं
माझ्या मनातला कोलाहल
न सांगता न बोलता
तुझ्या मनापर्यंत पोहचला
यातच सारं काही आलं
मी कोंडून घेतले स्वतःला
तेव्हा वाऱ्याची ती झुळूक
तुझा स्पर्श देऊन गेली
यातच सारं काही आलं
मी चुकीचा वागलो
तू मात्र कधीच विचारलं नाहीस
"का रे असा वागतोस "
यातच सारं काही आलं
तू सांग रे माझ्या प्रीत फुला
शब्दात कसे सांगू मी तुला,
प्रेम हे माझे अवखळ वेडे
कळेल का नजरेत तुला..
तू सांग रे माझ्या प्रीत फुला
नजरेत कसे सांगू मी तुला,
तुझीच स्वप्ने रंगवली मी
दिसेल का स्वप्नात तुला..
तू सांग रे माझ्या प्रीत फुला
स्वप्नात कसे हे दिसेल तुला,
तुझ्याचसाठी झुरणे माझे
कळेल का सत्यात तुला..
अगदी अचानक काहीच न कळवता आपण मित्राच्या घरी धडकावं.
त्याने दरवाजा उघडताच त्याला बाजूला सारून आत शिरावं.
चपला पर्स फेकून खिडकीजवळच्या मऊ गुबगुबीत माऊसारख्या खुर्चीवर धप्पकन बसावं.
आपलं अगडबंब वाढलेलं वजन, परीटघडीच्या ड्रेसला पडणा-या चुन्या, खांद्यावरून डोकावत असलेला किंवा नसलेला चुकार पट्टा कसला कसला विचार मनात येऊ देऊ नये तेव्हा.
"तुझीच आठवण काढली होती मी आज बघ डेविलिणबाई" म्हणत हसत त्यानं ग्लुकोज बिस्किटं आणि पाण्याचा ग्लास पुढे करावा.
खरंतर मनात खुश होत पण वरवर "चल् काहीही खोटं" म्हणत त्याला उडवून लावावं.
आज हलके वाटले तर
चांदण्या तोलून धर
बोल.. पण नयनातुनी
उघडू नको देऊ अधर
उजळुनी हे विश्व अवघे
सावरिशी का पदर
होऊ दे गलका उसासा
मोकळे कर मूक स्वर
जीव घे हासून हलके
ओठ हेच धनु नि शर
ने कुशीतून कालडोही
गुदमरूदे रात्रभर
बरस आता अंतरातुनी
हो पुरी सारी कसर
व्यापूनिया ये तमासम
गात्र गात्र नि शांत कर
चांदण्या तोलून धर
बऱ्याच रात्री जातात
तुला आठवत आठवत..
आणि बसतो त्या बेहिशिबि
अश्रूंना साठवत..
हिशोब करतो त्याच
बेहिशिबि रात्रींचा ज्या
तुला कधी तरी मिठीत
घेतल्याची जाणीव ...
करून देतात ..
तू मांडलेल्या प्रस्तावाचा
विचारदेखील केला कि
पुन्हा नव्याने एक सुरुवात करू
पण अजूनही हृदयाचे ठोके
वाढत बसतात
परत त्याच विचारात
कि
शेवट देखील पदरी येईलच
पुन्हा नव्याने..
रुद्र (उमेश)