साथ
हरपले हे देहभान
ना उरले दिशांचे ज्ञान,
ना कसले अनुमान
हेच का प्रीतीचे प्रमाण..?
धुंद रूपाची तुझ्या
जणू भूलच ही पडली,
तुजवाचून सारी सुखे
का दिसती शुन्यासमान..?
सुंदरशा या कातरवेळी
मन सैरभैर का होई,
का होई तुझा भास
कसली ही अशी तहान..?
प्रश्न असा हा पडता
उत्तर आले त्वरीत मला,
तूच हवी या ह्रदयाला
देशील का ग साथ मला...??