असाव कोणीतरी
वाटत रे कधीतरी
असावं आपलं कोणीतरी
नात्यांच्या बंधनात
समजुन घेणार कोणीतरी
एकटेपणा जाणवतो
तेव्हा असाव कोणीतरी
हवा असतो तुझा सहवास
तेव्हा जवळ घ्यावं कोणीतरी
वाटत सांगुन टाकावं
मनातलं सारकाही
पण ते ही ऐकायला
असावं कोणीतरी
आयुष्य हे असच असत
म्हणून आयुष्यभर
आनंदाने साथ देणार
हक्काच अस असाव कोणीतरी
प्रतिक्रिया
10 Jul 2018 - 3:11 pm | श्वेता२४
आवडली कविता