काही लिहिण्यापुरती
काही वाक्यांपुरतेच
तिचे माझे संभाषण
पाडी घण
हृदयात
आत आत
काही शब्दांपुरताच
तिचा माझा स्नेहबंध
मी सबंध
असतोही
नसतोही
काही अर्थांपुरतेच
तिचे माझे नाते गूढ
जशी ओढ
नकळती
खळाळती
काही लिहिण्यापुरती
तिची माझी पाटी कोरी
आणि सरी
उराउरी
अक्षरांच्या !
~ मनमेघ