मिरगाचो पाउस

Patil 00's picture
Patil 00 in जे न देखे रवी...
25 Jun 2018 - 3:15 pm

मिरगाचो पाऊस -मालवणी कविता
मिरगाचो पाऊस इलो
चाग्लो वाजत गाजत।
विजो कडाडले नी
ढगांचो गडगडाटय झालो।।१।।

तरी मिया म्हणतंय नायकाचो
बाबलो गायब ख्य झालो।
वाटच पावसाची बगी होतो
तेंनीच माझो कोम्बो पळवलो।।२।।

गावात कायव होयना माझ्या
कोंबड्यार सगळ्याचो डोळो।
फाटकी येव शिरा पडो मेल्यार
बोलवोन हाडा लगेचच त्येका।।३।।

येवदे त्येका चांगलेच
गाळयोे घालतेय।
सांगोती नी वडे
घराकडे पोचोवक सांगतंय।।४।।

कविता

प्रतिक्रिया

मालवणी कवितेचे स्वागत. थोडा अर्थ समजावल्यास बरे होईल.

आय डी पुढे दोन गोळे असण्याचे कारण समजू शकेल का ?

खिलजी सर ते गोळे नाहीत तर शून्य आहे

माझे औशीचो घर मका बोलावूक हाय

पाऊस पडताय पोरी पाऊस पडताय

घोवाक दिल्यानी कांबळी उडून खय जाय

वारं घोंगावताय पोरी वारं घोन्गावताय

मिरग्याला मेंढयांन शिंग मारलाय

पाऊस पडताय पोरी पाऊस पडताय

अहो सर वगैरे बोलावू नका ओ, मला आपला मित्रच समजा ... खिल्ली उडवण्यासाठीच मी हे नाव धारण केले आहे ..

पाटील ००७ असे का नाही ठेवले .. किंवा बॉण्ड पाटील पण चाललं असतं .. दोन शून्यामागे काही विशेष कारण आहे का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2018 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

तुम्ही फारच समंजस दिसता. 'नायकाचो बाबलो' ने तुमचा 'कोंबडा पलवला' तरी त्याका चार शिव्या घालून शेवटी 'सांगोती नी वडे घराकडे पोचोवक' सांगताय !!! ;) :)

आता, आपल्याला असा शेजारी मिळावा म्हणून प्रत्येक कोकणवासी 'देवाक गार्‍हाणं' घालेल. :)