काही वाक्यांपुरतेच
तिचे माझे संभाषण
पाडी घण
हृदयात
आत आत
काही शब्दांपुरताच
तिचा माझा स्नेहबंध
मी सबंध
असतोही
नसतोही
काही अर्थांपुरतेच
तिचे माझे नाते गूढ
जशी ओढ
नकळती
खळाळती
काही लिहिण्यापुरती
तिची माझी पाटी कोरी
आणि सरी
उराउरी
अक्षरांच्या !
~ मनमेघ
प्रतिक्रिया
29 Jun 2018 - 3:15 pm | चांदणे संदीप
सुंदर कविता!
Sandy
29 Jun 2018 - 7:08 pm | एस
कविता आवडली.
29 Jun 2018 - 9:13 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर कविता !
मिपावर प्रकाशित केल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! आपले साहित्य फेसबुक सोबत इथेही प्रकाशित करीत जावे ही प्रेमळ विनंती :)
1 Jul 2018 - 9:37 pm | शिवाय
सुंदर रचना हय मला की नै
3 Jul 2018 - 7:54 am | मनमेघ
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे _/\_
8 Jul 2018 - 2:30 pm | नाखु
कविता , अलगदपणे प्राजक्त फुलं झाडावरून ओघळत असल्यासारखी
मूक वाचक नाखु
8 Jul 2018 - 4:47 pm | ज्योति अळवणी
अप्रतिम!
12 Jul 2018 - 1:04 pm | राघव
फार सुंदर!! बंधू.. प्रत्येक कडवं कुठेतरी मनांत लागतं यातच काय ते आलं. नि:शब्द!
राघव