नजर नव्हती मिळवायची
कुणाच्याच नजरेसोबत
तीच नजर तुझ्याच शोधात होती
यातच सारं काही आलं
माझ्या मनातला कोलाहल
न सांगता न बोलता
तुझ्या मनापर्यंत पोहचला
यातच सारं काही आलं
मी कोंडून घेतले स्वतःला
तेव्हा वाऱ्याची ती झुळूक
तुझा स्पर्श देऊन गेली
यातच सारं काही आलं
मी चुकीचा वागलो
तू मात्र कधीच विचारलं नाहीस
"का रे असा वागतोस "
यातच सारं काही आलं
प्रतिक्रिया
20 Jul 2018 - 1:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
आलं थोड जास्तच झालय, कधी कधी लसुण, काळी मिरी, लवंगा ही वापरुन पहा जेवण रुचकर होईल.
पैजारबुवा,
20 Jul 2018 - 5:04 pm | Mak Mohan
खूप छान..
आवडली...
20 Jul 2018 - 7:28 pm | खिलजि
गेलं ते दिवस
झालं आता वय झालं
अश्याच कविता वाचून काढायचं दिवस आलं
यातच सार काही आलं
20 Jul 2018 - 8:44 pm | Secret Stranger
मस्त जमलंय..