( News:10 लाख वारकऱ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'--मुख्यमंत्री)
विठूबंदी
धाडा रे कुणीतरी,
विठूला सांगावा,
आरक्षणाचा कांगावा,
फार झाला।
मागे होते एकदा
मराठा मंत्री सोळा,
आरक्षणाचा गोळा,
तेव्हाका नाही।
मुख्यमंत्र्यांना यंदा,
नाही महापूजा,
कारण बलभूजा,
जातीभेद।
संत सांगो गेले,
वारकरी एकता धर्म
भेदाभेद अमंगळ जर्म
जळो जळो।
नावडतीचे तुम्हा,
जरी अळणी मीठ,
निषेधाचे व्यासपीठ,
इथे नव्हे।
समतेचे वाळवंट,
एकमेका लोटांगणे,
तिथे धटिंगणे,
कशासाठी?
जिथे सर्वकाळ
नामाचा जागर
सत्तेचे गाजर,
तिथे कायी?
किती काळ देवा
राहशील मूक
तिच तिच चूक
जन्मोजन्मी।
सांगे "बाजीगर",
म्हणोनी जगजेठी
धरु नका वेठी,
आर्जवूनी।
प्रतिक्रिया
22 Jul 2018 - 11:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वास्तववादी कविता आणि आशयाशीही सहमत.
-दिलीप बिरुटे
23 Jul 2018 - 8:18 am | शाली
+१
22 Jul 2018 - 11:58 pm | रमेश आठवले
मराठा आरक्षणा साठी विठुला वेठिस धरण्या पर्यंत मजल गेली.
23 Jul 2018 - 12:12 am | यश राज
आवडली..
विठ्ठलाला सुद्धा वेठीस धरणारे आरक्शणासाठीचे राजकारण.. उबग आलाय आता.
23 Jul 2018 - 11:08 am | श्वेता२४
आवडली
23 Jul 2018 - 11:25 am | तिमा
नाना फडणवीस कोणालाही हार जाणार नाहीत.
येसट्या फोडा, गर्दीत साप सोडा, परि याचे खापर मुख्यमन्त्र्यावर फोडा, हा डाव फुकट गेला.
23 Jul 2018 - 1:17 pm | सोमनाथ खांदवे
छान !!!!
प्रसंगानुरूप कविता .
23 Jul 2018 - 3:33 pm | सेरू०९२७
Publishing time of this poem on Misalpav is 10:24 pm.
However, this poem has been published in Loksatta yesterday at 7 pm in the readers' comments on the following news item.
https://www.loksatta.com/maharashtra-news/chief-minister-will-not-come-t...
Scroll down readers' comments at the bottom.
Initially one reader published it in readers' comments at 6 pm. Later on, another reader modified a bit and published modified version at 7 pm. The modified version is published on Misalpav.
23 Jul 2018 - 3:36 pm | सेरू०९२७
Click on "Load more comments" to read the poems.
23 Jul 2018 - 4:18 pm | सेरू०९२७
The last lines of the poem published in Loksatta are,
सांगे वारकरी,
म्हणोनी जगजेठी
धरु नका वेठी,
आर्जवूनी.
However, the last lines of the poem published on Misalpav are,
सांगे "बाजीगर",
म्हणोनी जगजेठी
धरु नका वेठी,
आर्जवूनी।
Clear case of poem theft.
23 Jul 2018 - 5:07 pm | बाजीगर
मीच तो .
investigation करायचे असेल तर mobile IMEI num शोधा सर.
23 Jul 2018 - 5:43 pm | सेरू०९२७
Okay
25 Jul 2018 - 1:40 am | प्रसाद गोडबोले
निषेध !
आरक्षणाचा कांगावा
>>> निषेध ! ठार निषेध !!
५८ मोर्चे अत्यंत शांततेत काढल्यानंतरही मागण्या मान्य न करता केवळ गाजरच दाखवले असेल तर शेवटी कोणीही पेटुन उठेलच ! इतक्या शांततेत आंदोनल केले आणि तरीही तुम्ही कांगावा हा शब्द वापरता ??? त्रिवार निषेध !!!
मराठा समाजाचा अंत पाहु नका !
आरक्षणाच्या बाबतीत अळंमटळंंम करण्याचे पाप भाजपा सरकारला भोवल्याशिवाय रहाणार नाही !
25 Jul 2018 - 4:53 am | नावातकायआहे
आरक्षण हा "अधिकार" आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
27 Jul 2018 - 11:54 am | नाखु
समयोचित
फडणवीस यांचा चाहता असल्याचा शिक्का बसलेला नाखु वाचकांची पत्रेवाला
27 Jul 2018 - 12:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
समयोचित आणि चपखल !