हकिक़त

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
24 May 2018 - 4:57 pm

ये शायरी नही दोस्तो
हकिक़त है
------
अपने माझी को टटोलता हूँ कभी
तो गुजरे हुये सालो में
एक रुहानी कहानी दिखायी देती है
------
समंदर के किनारे
जानो पें सर रख्खे
बैठी हुयी
एक भोली, कमसीनसी लडकी
दिखती है
------
आज भी
उसके चेहरे को देखते ही
रुह को जो लम्स होता है
मानो ओस से भीगी मिट्टी
पैरोंको छू गयी हो
-------
उस रात अचानक एक बात
समझ आयी थी
रोशनी मोहताज होती नही
चाँद या सुरज की
-------
ये शायरी नही दोस्तो
हकिक़त है
------
गर जो वो पास ना हो
तो भी साथ रहती है
सच कहता हूँ
सासोंमे महकती रहती है
-------
पुरे बारा सालोंका साथ
रहा है उसका और मेरा
...
वही
भोली, कमसीनसी लडकी
...
पहचान तो थी
उसकी और मेरी
शायद पिछले किसी जन्म से ही
जानने अब लगा हूँ
ये शायरी नही दोस्तो
हकिक़त है
------
पता नही क्यु
लेकिन
मै बात उसकी करता हूँ
जब भी
तो लोग कहते है
मै शायरी करता हूँ
...
सच मे
ये शायरी नही दोस्तो
हकिक़त है

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
१८/०५/२०१८

जानो पें = (दुमडलेल्या) गुडघ्यांवर
लम्स = निसटता नाजुक स्पर्श
ओस = दव
मोहताज = लाचार, अवलंबून

................................................भावानुवाद................................................

खरं सांगू तुम्हाला ?
ही कविता नाहीये
हे सगळं आहे
मी पाहिलेलं,
एेकलेलं,
अनुभवलेलं
--------
कधी एकांतात
झरझर जातं डोळ्यासमोरून
हे सगळं
जणू कुणा सिद्धहस्ताने लिहिलेली एखादी कादंबरी
मी पाहिलेली
मी एेकलेली
मी अनुभवलेली
मीच जगलेली
माझीच कहाणी
--------
समुद्रकिनारी
पाय जवळ घेऊन
आणि
मुडपलेल्या गुडघ्यांवर चेहरा ठेवून बसलेली
निरागस अशी 'ती'
(आणि तिला पाहणारा घायाळ मी)
-------
आजही तिचा चेहरा पाहिला की,
एक अलवार शहारा जातो नखशिखांत
दवात भिजलेल्या ओलसर मातीचा कसा हळुवार स्पर्श होतो पायाला,
तसंच काहितरी
-------
आणि ती रात्र ?
त्या चांदणरात्री मला उमगलं होतं
की चांदणं पडायला
चंद्र-चांदण्या हव्याच असं काही नाही
-------
खरंच सांगतो
ही कविता नाहीये
-------
ती जवळपास नसली तरी
असतेच खरंतर आसपास
आणि दरवळत राहते आसमंतात
-------
एक तप झालं
तिच्या माझ्या नात्याला
...
तीच...समुद्रकिनारी बसलेली निरागस ती
(आणि आजही तितकाच घायाळ मी)
...
कदाचित, जन्मोजन्मांतरीची ओळख आहे आमची
आणि कदाचित,
मलाच आत्ता ओळख पटायला लागलीये तिची
---------
तिच्या बद्दल काही सांगायला गेलं
की लोक 'वाह वा' च करायला लागतात
...
पण खरंच सांगतो हो
ही कविता नाहीये
ही कविता, गजल, रूबाई काहीच नाहीये

--चाणाक्य
(२४/०५/२०१८)

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

रातराणी's picture

25 May 2018 - 2:53 am | रातराणी

खूप सुंदर!!
अवांतर : लग्नाचा वाढदिवस जवळ आला आहे का?

अभ्या..'s picture

25 May 2018 - 8:33 am | अभ्या..

अहहहहहह,
वेलकम बॅक मिका पाजी,
.
तू सचिन आहेस राव काव्यविभागाचा. नजाकत आणि तेच पृव्हन शब्दलालित्य. सिम्प्लि ग्रेट.

प्राची अश्विनी's picture

25 May 2018 - 9:27 am | प्राची अश्विनी

क्या बात मिका..
दिन बन गया!

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 May 2018 - 10:52 am | ज्ञानोबाचे पैजार

मोठ्या गॅप नंतर लिहीलीस पण काय लिहीले आहेस.... वा...जबरदस्त
परत वाचताना र्मै और मेरी तनहाई च्या चालीवर (आणि बच्चनच्या आवाजात (मनतल्या मनात)) वाचली, अजून मजा आली
अनुवादही चपखल झाला आहे. लिहीत रहा.
पैजारबुवा,

कवितानागेश's picture

25 May 2018 - 3:41 pm | कवितानागेश

फीस्ट!

गवि's picture

25 May 2018 - 4:34 pm | गवि

मिका परत आला. उत्तम.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 May 2018 - 8:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

द्येवा... __/\__

आवडला अनुवाद , अप्रतिम झाला आहे .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

आवडला अनुवाद , अप्रतिम झाला आहे .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मदनबाण's picture

25 May 2018 - 8:31 pm | मदनबाण

लयं भारी !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati

प्रमोद देर्देकर's picture

25 May 2018 - 8:51 pm | प्रमोद देर्देकर

मस्त आवडली.

मूळ नज्म आणि भावानुवाद, दोन्हीही तरल आणि सुंदर.

फिझा's picture

27 May 2018 - 4:50 pm | फिझा

वाह .....खूप सुंदर !