त्या वाहत्या झऱ्याचा,
फेसाळल्या नभाचा
श्वासास गंध यावा
गंधाळल्या दिठीचा
तू भेटशी नव्याने
मी ही नवाच आहे
नात्यास रंग यावा
वेडावल्या जुईचा
तू चुंबशील का रे
वाऱ्यास धुंद ओल्या
वर्षेस मोह व्हावा
भेगाळल्या धरेचा
तो शुष्क कोरडासा
ओढा तसाच आहे
त्याला विसर पडावा
फेटाळल्या नदीचा
ओला वसंत म्हणजे
आमंत्रणे सुखांची
आनंद मग पहावा
मंदावल्या उन्हांचा
मग तृप्त अंबराला
हळवे उधाण यावे
जलदास स्पर्श व्हावा
धुन्दावल्या भुमीचा
© विशाल कुलकर्णी
प्रतिक्रिया
27 May 2018 - 6:50 pm | चांदणे संदीप
एक सुचवणी...
"धुन्दावल्या भुमीचा" ऐवजी
"धुन्दावल्या धरेचा" करून पहा.
Sandy
27 May 2018 - 6:52 pm | चांदणे संदीप
"भेगाळल्या भूमीचा"
Sandy
27 May 2018 - 6:50 pm | चांदणे संदीप
एक सुचवणी...
"धुन्दावल्या भुमीचा" ऐवजी
"धुन्दावल्या धरेचा" करून पहा.
Sandy
27 May 2018 - 8:03 pm | शाली
मस्त आहे कविता.
"धुन्दावल्या धरेचा" सुंदर लय साधते चांदणे संदीप.
27 May 2018 - 9:58 pm | चाणक्य
.
28 May 2018 - 10:22 am | रातराणी
सुरेख!!
28 May 2018 - 11:13 am | नाखु
रे
बाल्यकवी नाखु वाचकांची पत्रेवाला
13 Jul 2018 - 11:07 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी !
13 Jul 2018 - 3:01 pm | श्वेता२४
.