तिथे ओठंगून उभी...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
25 May 2018 - 8:23 pm

रानपाखरांची घरे अंगीखांदी जे माळते
असे झाड फुलताना पान पान किल्बिलते

क्षितीजाशी विझताना चांदणे जे उसासते
त्याचे पहाटे पहाटे जीवघेणे गीत होते

रानावनातून नदी जेव्हा खळाळत जाते
ऐलपैलतीरी तिचे पाण-पैंजण वाजते

फुफाटल्या मातीवर मृग शिंपण घालते
तेव्हा अत्तराची कुपी आसमंती ओसंडते

नाद-शब्द-ताल-गंध जिथे काळजा भिडते
तिथे ओठंगून उभी..

...एक कविता असते

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

विशेष काही टाळक्यात शिरले नाही... पण जे काय आहे ते छान आहे !

[ अत्तर कुपी प्रेमी ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati

एस's picture

25 May 2018 - 9:29 pm | एस

क्या बात है!

अनन्त्_यात्री's picture

27 May 2018 - 5:06 am | अनन्त्_यात्री

सर्वांना धन्यवाद!

चाणक्य's picture

27 May 2018 - 10:22 am | चाणक्य

म्हणजे ?

अनन्त्_यात्री's picture

27 May 2018 - 1:35 pm | अनन्त्_यात्री

आधार घेणे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2018 - 1:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !