मुक्तपीठ

चुकार's picture
चुकार in जे न देखे रवी...
11 Feb 2018 - 12:42 am

प्रवास खडतर, सापडेना वाट ती.
वाटसरु नवे, हरदिवस भेटती.

रोज नवा प्रश्न उभा समोर ठाके,
थांब जरा, घे उसासा मन माझे सांगे.

जुळता बंध नात्यांचे, कधी हेच धागे गुंतता,
बाकी निसटून जाती एक सांधता साधता.

वाटे व्हावे फुलपाखरू, मनमोकळे हुंदाडवे.
स्वप्नांचे ओझे डोईपरी हलके व्हावे.

विशाल आसमंत फिरुनी यावा एकदा,
भरारीला बळ मिळावे मग पुन्हा एकदा.

भुईचा भूचर कधीतरी पाखरू व्हावा,
निर्भय, निश्चिंत, स्वच्छंदी, अनंत तो उडवा.

वाटे द्यावे झुगारून सारे बंध.
निखळून जावे साखळदंड.

हुंदडणाऱ्या अल्लड मनास...
मिळावे एक मुक्तपीठ....

अभय-काव्यकविताजीवनमान

प्रतिक्रिया

दमामि's picture

11 Feb 2018 - 7:21 am | दमामि

लुना आहे का हो?:)

चुकार's picture

11 Feb 2018 - 9:19 am | चुकार

?

पैसा's picture

11 Feb 2018 - 10:48 am | पैसा

मुक्तपीठ नाव बघून वेगळ्याच विचाराने उघडली होती. ब्रह्मे आणि गॅंग आले का काय म्हणून

दुर्गविहारी's picture

11 Feb 2018 - 12:33 pm | दुर्गविहारी

वेगळ्याच अपेक्षेने आलो, पण कविता चुकार निघाली. ह.घ्या.
मुक्तपीठ चा संदर्भ समजला नसेल तर ई-सकाळ उघडून मुक्तपीठ सदर वाचा म्हणजे तुम्ही किती अपेक्षा वाढवल्या ते कळेल. जमल्यास लुनावाले ब्रम्हे, पोतदार पावसकर मँडम यांची रत्ने वाचून काढा.